Monday, May 31, 2010

भावातीत ध्यान

महर्षी प्रणित भावातीत ध्यान आणि भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रम

महर्षींची भावातीत ध्यानाची विधी ही साधी, स्वाभाविक, सहज आणि प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पंधरा ते वीस मिनिटे डोळे मिटून आणि सुखासनात बसून केली जाणारी कृती आहे. ह्या कृतीच्या अभ्यासामध्ये करणार्या ची चेतना स्थिर होते आणि विश्रांत जागृतीची वैशिष्ट्यपूर्ण अनुभुती होते. त्या वेळी शरीर अंतरंगातून गहन विश्रांत होते आणि मन क्रियाक्षेत्राच्या पलीकडे जाऊन मानवी चेतनेच्या सर्वांत सरळ चेतनेला म्हणजेच भावातीत चेतनेला अनुभवते; जिथे चेतना स्वत:कडे उन्मुख असते. चेतनेची ही स्व-संदर्भित अवस्था होय.

भावातीत चेतनेचा अनुभव व्यक्तीच्या सुप्त सृजनात्मक सामर्थ्याला विकसित करतो आणि एकत्रित ताणाला आणि थकव्याला भावातीत चेतनेच्या अभ्यासाद्वारे प्राप्त विश्रांतीद्वारे मोकळे करतो. ह्या अनुभवामुळे व्यक्तीच्या चेतनेमध्ये सृजनीशलता, क्रियाशीलता, नियमितपणा आणि संघटनकारी शक्ती जागृत होतात; ज्यामुळे दैनंदिन जीवनात वाढलेली प्रभावकारिता आणि यश ह्यांचा लाभ होतो.

भावातीत ध्यान कोणीही सहज शिकू शकते. सर्व संस्कृती, धर्म आणि शैक्षणिक पार्श्वभूमीचे लोक ह्या पद्धतीचा अभ्यास करतात.

भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रम हा भावातीत ध्यान विधीचा प्रगत पक्ष आहे. ह्याचा अभ्यास करणार्यााला तो भावातीत चेतनेच्या पातळीवरून विचार आणि क्रिया करण्यासाठी प्रशिक्षित करतो आणि त्यामुळे मन आणि शरिरातला समन्वय फार मोठ्या प्रमाणात वाढतो. ह्यामुळे त्या व्यक्तीला तिच्या जीवनाच्या सर्व अंगांशी संबंधित सर्व इच्छा- आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी सर्व नैसर्गिक नियमांचे सहाय्य मिळते.

जीवनातील सर्वोच्च तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी भावातीत ध्यान विधी हा सर्वांत मोठा प्रत्यक्ष मार्ग आहे. ह्याद्वारे व्यक्तीला जे पाहिजे; ते प्राप्त होते; तो प्रबोधनाच्या प्रकाशात जीवन जगतो आणि त्याचे जीवन सृष्टीसारखे सुव्यवस्थित होते.


जीवनातील सर्वोच्च तत्त्वज्ञान साकार करण्यासाठीची विधी म्हणून महर्षी प्रणित भावातीत ध्यान हे सर्वांत स्वाभाविक (नैसर्गिक) असून ते सर्व व्यक्तींच्या भल्यासाठी आणि संपूर्ण समाजासाठी सर्व देशकालात उपयोगी आहे.


महर्षी प्रणित भावातीत ध्यान आणि भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रम; ह्यावरील वैज्ञानिक संशोधनाचे आद्योपांत अवलोकन


महर्षी प्रणित भावातीत ध्यान आणि भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रमाचा अभ्यास केल्यामुळे मिळणार्याल परिणामांना वैज्ञानिकसंशोधन प्रलेखनाद्वारे मांडते आणि त्यामुळे व्यक्तीला आणि समाजाला होणार्‍या लाभांचे प्रस्तुतीकरण करते.

भावातीत ध्यानाच्या अभ्यासाच्या काळात निर्माण होणार्या‍ शारिरीक बदलांमध्ये सखोल विश्रांती आणि मेंदुच्या कार्यक्षमतेमध्ये उच्च पातळीचा व्यवस्थितपणा ह्यांचा समावेश होतो. ह्या साधनेच्या नियमित अभ्यासामुळे मानसिक क्षमता विकसित होते, सामाजिक वर्तन अधिक लाभप्रद आणि समाधानकारक होते, आरोग्य सुधारते आणि त्या व्यक्तीचा सामंजस्यपूर्ण आणि पोषक प्रभाव संपूर्ण समाजावर पडतो.

समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत उपयोगात आणले असता भावातीत ध्यान विधीमुळे शैक्षणिक प्रावीण्य आणि उच्च कोटीचे जीवनमान विकसित होते; उत्पादनक्षमता, आरोग्य, व्यवसाय व कार्यक्षेत्रातील समाधान वाढते आणि वर्तनात सुधारणा होते तसेच तुरुंगातील बंदिवानांमध्ये अपराध- व्यसनाचे प्रमाण कमी होते आणि सर्व समाजात सकारात्मक प्रवृत्ती वाढते.

जेव्हा जास्त्तीत जास्त संख्येत लोकांनी ह्या विधीचा उपयोग केला; तेव्हा राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पातळीवर तिचे लाभदायक परिणाम दिसून आले आहेत. कमीत कमी लोकसंख्येच्या १% किंवा १% लोकसंख्येच्या वर्गमूळाइतके लोक जेव्हा योगिक उर्ध्वगमनातील (फ्लायिंग) भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रमाचा अभ्यास एका स्थानी करतात; तेव्हा त्यातून एक व्यवस्था प्रदान करणारा आणि पर्यावरणात सौहार्द निर्माण करणारा प्रभाव उत्पन्न होतो; जो जीवनमानातील प्रगतीमधून आणि समाज तसेच जगातील नकारात्मक घटकांच्या कमी होण्यातून दिसतो. ह्या घटनेला महर्षींच्या आदरापोटी महर्षी परिणाम असे म्हंटले गेले आहे. महर्षींनी ह्या परिणामाची पूर्वकल्पना ह्या चळवळीच्या (कार्यक्रमाच्या/ मोहिमेच्या) अगदी सुरुवातीच्या दिवसांत सांगितली होती.

महर्षीं सांगतात की, अस्तित्वाची सर्वांत प्राथमिक अवस्था जीवंत (साकार) करत असल्यामुळे ही साधी प्रक्रिया इतके वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे परिणाम साकार करते. ही प्रक्रिया संहितांइतक्याच पुरातन वैदिक काळापासून ज्ञात आहे. संहिता म्हणजेच एकात्मतेचे अंतिम क्षेत्रस्थान. ही प्रक्रिया तिच्यामधील आंतरक्रियांद्वारे प्रकृतीच्या अगणित नियमांच्या समुच्चयाला निर्माण करते. आत्ताच्या युनिफाईड क्वांटम फिल्ड थिअरीज म्हणजेच एकात्मिक पुंज क्षेत्रवादाच्या स्वरूपात आधुनिक पदार्थविज्ञानाला ह्या प्रक्रियेचा ओझरता परिचय झाला आहे. ह्या पातळीवरून (दृष्टीकोनातून) विश्वातील प्रत्येक गोष्ट कशाने तरी आधारित आणि जोपासलेली आहे. वैश्विक चेतनेमध्ये एकतेचा प्रभाव ह्या पातळीवरून निर्माण केल्यास प्रत्येक राष्ट्र विजयी, स्वावलंबी होईल आणि जागतिक शांतता साध्य होईल. वैश्विक शांतीसाठी वैश्विक चेतनेमध्ये महर्षी परिणामाने त्याची शक्ती ह्यापूर्वीच प्रदर्शित केली आहे. Journal of Conflict Resolution, Journal of Crime and Justice आणि Social Indicators Research आदि आघाडीच्या शास्त्रीय नियतकालिकांमध्ये महर्षी परिणामावर पन्नास संशोधन प्रबंध प्रकाशित झालेले आहेत; ज्यांनी घटलेले अपराधाचे प्रमाण, घटलेले अपघात, सर्वसाधारण जीवनमानात झालेली प्रगती, आर्थिक बाबतींतल्या प्रगतीची चिन्हे आणि घटलेले नागरी आणि आंतरराष्ट्रीय तंटे ह्यांचे प्रस्तुतीकरण केले आहे.

आरोग्य विज्ञान ऍकेडमी, रशियाची मॉस्को मेंदु संशोधन संस्था, जपानची राष्ट्रीय औद्योगिक आरोग्य संस्था, फ्रासची रोचेफोकॉ इन्स्टिट्युट, ऑस्ट्रेलियाचे न्यू साउथ वेल्स विद्यापीठ, हॉलंडचे ग्रोनिंग्टन विद्यापीठ, स्वीडनचे लंड विद्यापीठ, स्कॉटलँडचे एडिंबर्ग विद्यापीठ, कॅनडाचे यॉर्क विद्यापीठ, लॉस एंजल्सचे कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठ, मिशिगन विद्यापीठाची आरोग्य शाखा, शिकागो विद्यापीठ, स्टॅनफोर्ड आरोग्य विद्यालय, प्रिंसटाउन विद्यापीठ, हार्वर्ड आरोग्य विद्यालय आदि २५० पेक्षा जास्त स्वतंत्र संशोधन संस्थांमधील संशोधकांनी महर्षी प्रणित भावातीत ध्यान विधीवर ६०० पेक्षा जास्त संशोधन प्रबंध लिहिलेले आहेत.

सायंस, लँसेट, सायंटिफिक अमेरिकन, अमेरिकन जर्नल ऑफ फिजिऑलॉजी, इंटरनॅशनल जर्नल ऑफ न्युरोसायंस, एक्स्पेरिमेंटल न्युरॉलॉजी, एलेक्ट्रॉन-सेफालॉग्राफी अँड क्लिनिकल न्युरॉफिजिऑलॉजी, सायकोसॉमॅटिक मेडिसिन, जर्नल ऑफ द कॅनेडिअन मेडिकल असोशिएन, अमेरिकन सायकॉलॉजिस्ट, ब्रिटिश जर्नल ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी, जर्नल ऑफ काँसिलिंग सायकॉलॉजी, द जर्नल ऑफ माइंड अँड बिहेवियर, ऍकेडमी ऑफ मॅनेजमेंट जर्नल, जर्नल ऑफ कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, पेरसेप्ट्युअल अँड मोटर स्किल्स, क्रिमिनल जस्टीस अँड बिहेवियर, जर्नल ऑफ क्राईम अँड जस्टीस, प्रोसिडिंग्स ऑफ द एंडॉक्रिन सोसायटी, जर्नल ऑफ क्लिनिकल सायकॅट्री आणि सोशल इंडिकेटरस रिसर्च सारख्या आघाडीच्या कित्येक शास्त्रीय नियतकालिकांमध्ये संशोधन अभ्यास प्रकाशित झालेले आहेत.

कित्येक अभ्यास व्यावसायिक वैज्ञानिक परिचर्चांमध्ये सादर करण्यात आले आहेत आणि इतर आघाडीच्या विद्यापीठांमधील प्रबंध समितीच्या मार्गदर्शनाखाली केलेले डॉक्टरेट पदवीच्या प्रबंधांचा भाग आहेत. ह्यातील बरेचसे संशोधन महर्षी प्रणित भावातीत ध्यान आणि योगिक उर्ध्वगमनासह (योगिक फ्लायिंग) भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रम ह्यांवरील संशोधनाच्या ७ खंडांमध्ये (एकूण ५००० पृष्ठे) एकत्र करण्यात आले आहे.

महर्षी प्रणित वैदिक क्रियेमुळे – म्हणजेच प्राकृतिक नियमांच्या एकात्मिक कार्यक्षेत्राच्या क्रियेद्वारे, ऋषी, देवता आणि छंदांच्या संहिता, भावातीत चेतनेची क्रिया आदिंमुळे होणारे लाभ ह्या सात खंडांमध्ये विशद केले आहेत. त्यासाठी मनुष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांतील म्हणजेच शिक्षण, आरोग्य, सरकार, संरक्षण, पुनर्वसन, कृषी, व्यापार आणि उद्योग ह्यांमधील संशोधन निष्कर्ष सादर केले आहेत.
चेतना म्हणजे काय?

चेतना म्हणजे अशी गोष्ट जिला स्वत:ची जाणीव असते. स्वत:ची जाणीव असल्यामुळे चेतना स्वत:ला जाणणारी असते. स्वत:ला जाणणारी असल्यामुळे चेतना ज्ञेय आणि ज्ञाता; दोन्ही आहे. ज्ञेय आणि ज्ञाता; दोन्ही असल्यामुळे चेतना जाणण्याची प्रक्रियासुद्धा आहे. ह्याप्रकारे चेतनेमध्ये तिच्या स्व-संदर्भित अशा अद्वितीय अवस्थेत तीन गुणधर्म असतात – जाणणार्यावचा (ज्ञात्याचा) गुणधर्म, जाणण्याच्या प्रक्रियेचा गुणधर्म, आणि ज्ञेय असण्याचा गुणधर्म – म्हणजेच ‘विषय’ (ज्ञाता), ‘वस्तु’ (ज्ञेय) आणि ‘विषय’ आणि ‘वस्तु’ मधील परस्पर संबंध- जाणण्याची प्रक्रिया.

जेव्हा जेव्हा विषय- वस्तु परस्पर संबंध असतो; जेव्हा जेव्हा विषय हा वस्तुशी जोडलेला असतो; जेव्हा जेव्हा विषय वस्तु असल्याचे अनुभवतो; जेव्हा जेव्हा विषय (ज्ञाता) वस्तुला जाणतो; तेव्हा ह्या तीन गुणधर्मांचे एकत्र असणे चेतनेच्या अस्तित्वाचे निर्देशक आहे.

हे विश्व तिच्या निरीक्षकासह निरीक्षक, निरीक्षणाची प्रक्रिया आणि निरीक्षण केली जाणारी वस्तु हे तीनही गुणधर्म दाखवते. म्हणून ते चेतनेच्या अस्तित्वाचे निर्देशक आहे. निरीक्षक असणारे विश्व हे चेतनेच्या तिच्या स्व- संदर्भित अवस्थेची अभिव्यक्ती आहे. आणि निरीक्षक, विश्वाला जाणत असल्यामुळे त्याच्या स्व-संदर्भित अवस्थेला सुद्धा जाणतो.

हे विश्व वस्तुत: निरीक्षकच आहे; ही वस्तुस्थिती चेतनेच्या संपूर्ण गोपयनीयतेची वस्तुस्थिती आहे. ते चेतनेचे पूर्ण सामर्थ्य आहे आणि चेतनेची संपूर्ण वस्तुस्थिती आहे.

जेव्हा आम्ही चेतनेची संपूर्ण वस्तुस्थिती असे म्हणतो; तेव्हा आम्हांला चेतना स्व-संदर्भित अवस्थेत आहे; असा अर्थ अभिप्रेत आहे. त्यावेळी चेतना केवळ तिलाच जाणते आणि अन्य कशालाही जाणत नाही. चेतनेची ही अवस्था शुद्ध अवस्था आहे. चेतनेची दुसरी अवस्था म्हणजे ती अन्य गोष्टींना जाणत असते. त्यावेळी तिला वस्तु-संदर्भित चेतना असे म्हंटले जाते; कारण त्या अवस्थेत सर्व वस्तुंना चेतनेच्या बुद्धी ह्याच गुणधर्माद्वारे जाणल्या जाते आणि त्यामुळे चेतनेच्या एकमेव स्व-संदर्भित अवस्थेमध्ये निरीक्षक आणि निरीक्षणाची प्रक्रिया ह्यांची निर्मिती होते.

ह्यामुळे चेतनेची वस्तु-संदर्भित अवस्था ही सुद्धा चेतनेच्या स्व-संदर्भित अवस्थेमध्ये आहे; हे सिद्ध होते.

प्राकृतिक चेतनेनुसार चेतनेची वस्तुस्थिती एकाच वेळी स्व-संदर्भित आणि वस्तु-संदर्भित असते. ह्यावरून हे उघड दिसते की, चेतनेची प्रकृती एकमेव किंवा अद्वितीय (स्व-संदर्भित) आणि विविध (वस्तु-संदर्भित) आहे. चेतनेच्या ह्या कार्यक्षेत्राबद्दलचे सर्व ज्ञान हे अंतिम सत्याचे प्राथमिक ज्ञान आहे; जे सर्व निर्मिती साकार होण्याच्या मूळाशी आहे. एकातून अनेकात होणार्या; परिवर्तनाचे ते संपूर्ण ज्ञान आहे.
चेतनेचे संपूर्ण ज्ञान हे जीवनाच्या प्राथमिक वस्तुस्थितीचे संपूर्ण ज्ञान होय; जे भावातीत ध्यानामुळे भावातीत चेतनेच्या अवस्थेत प्रत्येकाला उपलब्ध असते. भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रमाच्या सहाय्याने कोणीही वर उल्लेखलेल्या परिवर्तनाच्या आणि क्रमविकासाच्या प्रक्रियेवर पूर्ण प्रभूत्व मिळवू शकतो.

संपूर्ण सजग- स्व-संदर्भित चेतना- शुद्ध संहिता; निरीक्षक, निरीक्षण केली जाणारी गोष्ट आण निरीक्षणाची क्रिया – ह्यांचे एकत्र असणे हे परमोच्च सत्याला साकार करणे आहे. महर्षी प्रणित चेतनेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे हे प्राथमिक कार्यक्षेत्र आहे.

चेतनेची परमोच्च वस्तुस्थिती अनुभवाच्या आणि बौद्धिक अशा दोन्ही पातळ्यांवर पूर्णपणे उपलब्ध आहे. महर्षी प्रणित चेतनेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा मुख्य विषय आहे. वेदिक वाङ्मय आणि सर्व वैदिक साहित्यामध्ये ह्याच कार्यक्षेत्राचे चित्रण केले गेलेले आहे. ह्या वस्तुस्थितीच्या म्हणजेच प्राकृतिक नियमाच्या विभिन्न गुणधर्मांना वैदिक वाङ्मयाचा प्रत्येक घटक प्रदर्शित करतो.

मी स्वत: हे माझे जगत् आहे – अहं ब्रह्मास्मि; अहं विश्वम् (तैतिरिय उपनिषद, ३.१०.६), अहं ब्रह्मास्मि (बृहद् आरण्यक उपनिषद १.४.१०); मी संपूर्ण आहे- मी एकमेव आहे – मी स्व-संदर्भित आणि सज्ञान (सचेतन) आहे.

वेदाची (श्रृतीची) निर्मिती सचेतन अवस्थेत झाली; ध्वनीची रचना सचेतन अवस्थेत झाली; चेतनेच्या स्वरचित प्रेरणेच्या क्रमविकासातून, स्वत:ला सदैव स्थिर आणि जागृत ठेवण्यातून ऐहिक कण (वस्तुमात्र) साकार झाले. श्रृती (एकात्मिक स्वर) हा चेतनेचा गुणधर्म आहे आणि स्मृती (आठवण) हाही चेतनेचा गुणधर्म आहे.



चेतना, अस्तित्व आणि बुद्धी

आपण आपल्या आजूबाजूला बघतो त्या गोष्टी अस्तित्वात असतात. आपण हेही पाहतो; की त्या गोष्टी बदलतात आणि विकसित होतात. आपण हेही बघतो की विकास क्रमवार होतो – सफरचंदाच्या झाडाच्या बीजाची सफरचंदाच्या झाडातच वाढ होते. त्यामुळे हे उघड आहे; की बुद्धीच्या गुणासहितच अस्तित्व साकार होते. अस्तित्व बुद्धीच्या सहकार्यानेच हर क्षणी जगते. बुद्धीच्या सहाय्यानेच निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट तिच्याबद्दल सजग/ जागरूक असते; तिच्या स्वत:च्या अस्तित्वाला जाणते. तिला तिच्याबद्दल जाणीव असते आणि त्याचवेळी ती तिच्या पर्यावरणाबद्दलही जागरूक आणि सजग असते. ती स्व-संदर्भित (स्वत:ला जाणणारी) आणि वस्तु-संदर्भित (जाणली जाणारी गोष्ट म्हणून स्वत:ला जाणणारी) असते. ह्याप्रकारे अस्तित्व बुद्धीमान आहे; अस्तित्व चेतना आहे. चेतना म्हणजेच प्रत्येकाचे अस्तित्व आणि सर्वांना व्यापणारी बुद्धी होय.

चेतना म्हणजे जागरूकता; असीमित सावधानता, शुद्ध बुद्धी, शुद्ध अस्तित्व, स्व-संदर्भित पूर्णत्व, सर्व ज्ञाता- ज्ञेयभाव – स्वयंपूर्ण आणि सर्व निर्मितीचा अमूर्त स्रोत, मार्ग आणि ध्येय होय.
जे महर्षी प्रणित भावातीत ध्यानाचा अभ्यास करतात; त्यांच्या भावातीत चेतनेमध्ये ते हे सर्व गुणधर्म अनुभवतात.
तिच्या ‘स्व-संदर्भित’ किंवा भावातीत अवस्थेत चेतना केवळ तिला एकटीलाच जाणते. म्हणजे तीच तिला जाणणारी ज्ञाता असते. स्वत:ला जाणणारी ज्ञाता असल्यामुळे; ती ज्ञानाचा विषय आणि ज्ञान होण्याच्या क्रियेचा भाग असते. म्हणून, तिच्या ‘स्व-संदर्भित’ किंवा भावातीत अवस्थेत चेतना ज्ञाता, ज्ञान होण्याची प्रक्रिया आणि ज्ञेय ह्यांची एकत्रित अवस्था असते.
वैदिक साहित्यामध्ये चेतनेच्या ह्या त्रिवेणी स्वरूपाला किंवा स्थितीला ऋषी, देवता आणि छंदाची संहिता म्हंटले गेले आहे. ऋषी (जाणणारा), देवता (जाणण्याच्या प्रक्रियेतील परिवर्तनशीलता) आणि छंदस् (जाणलेले) ह्यांची संहिता म्हणजेच एकता.


बुद्धीच्या परस्पर-विरुद्ध असणार्या् दोन गुणधर्मांचे एकत्र असणे म्हणजे चेतना होय. ते गुण- १.स्व-संदर्भित संहितेच्या अवस्थेची एकमेव स्थिती आणि २. ऋषी, देवता आणि छंदस ह्यांची विविधता.


तिच्या रचनेमध्ये असलेल्या ह्या दोन परस्पर विरुद्ध गुणांमुळे चेतनेची नैसर्गिक स्थिती जागरूकता आहे, हे समजून घेणे रंजक आहे. ह्या दोन विरुद्ध गुणांचे तिच्यामध्ये सोबत असणे चेतनेला जागृत, सजग आणि सजीव ठेवते. चेतना हे सर्व शक्यतांचे सजीव कार्यक्षेत्र आहे.

ज्ञाता, ज्ञान होण्याची प्रक्रिया आणि ज्ञेय ह्यांची एकता म्हणजेच एकत्र असण्याची स्थिती ज्ञानाशी एकरूप होते आणि चेतनेशीही एकरूप होते. ह्यातून अर्थातच पुढील निष्कर्ष निघतात:-

१. चेतना म्हणजेच ज्ञान आहे. २. चेतना म्हणजेच वेद आहे. ३. चेतना म्हणजेच संहिता आहे. ४. ऋषी, देवता आणि छंद ह्यांची संहिता म्हणजेच वेद आहे. ५. वेद म्हणजेच ऋषी, देवता आणि छंद ह्या तीन गुणांनी बनलेली संहितेची अमूर्त स्व-संदर्भित बुद्धी आहे. तिच्या एकात्मिक किंवा एकत्रित स्व-संदर्भित अवस्थेत विविधता असते.

६. चेतना ही एकसमयावच्छेदेकरून एकता आणि विविधता आहे. संहिता असल्यामुळे एकता आणि ऋषी, देवता आणि छंद असल्यामुळे विविधता आहे.

चेतनेच्या विसंगत गुणधर्मांच्या म्हणजेच एकता आणि विविधतेच्या एकत्र असण्यामुळे परिवर्तनाची सनातन आणि स्व-संदर्भित क्रियापद्धती अस्तित्वात असते; असे ह्यावरून समजते.

परम सत्याच्या रचनेचे हे स्वरूप आहे. स्व-संदर्भित बुद्धी तिच्या एकतेमध्ये सक्रिय असते आणि तिच्यामुळे निर्मिती आणि क्रमबद्ध विकासाला आरंभ होतो. शुद्ध बुद्धीचे एकात्मिक कार्यक्षेत्र स्वाभाविकत: किंवा आपोआप तिच्यामध्ये प्रकृतीतील सर्व नियमांच्या विविधतेला जन्म देते.

हे दृश्य म्हणजेच चेतना- स्व-संदर्भित आणि अमर्याद अशी एकत्र आणण्याची क्षमता; जी प्रकृतीच्या नियमाला साकार करणारी शक्ती आहे.


चेतनेचा क्रमबद्ध विकास

स्वत:च्या स्व-संदर्भित अवस्थेमधील संपूर्ण जागरूक चेतनेला एकतेतून विविधतेत आणि विविधतेतून एकतेत परिवर्तन होण्याची प्रक्रिया होतानाच्या नादाची जाणीव होते. ह्या अवस्थेला ऋषी, देवता आणि छंदस् ह्यांची संहिता असे ओळखले जाते. ह्या नादाला श्रृती (जे ऐकू येते ते) म्हणतात. वैदिक नाद, सतत प्रतिध्वनित होणार्याऋ चेतनेचा नाद, सक्रिय बुद्धीचा नाद (ऋषी, देवता, छंदस् ह्यांची संहिता- ऋग्वेद) आणि, क्रमबद्ध परिवर्तनाचा नैसर्गिक वेग नादाचा प्रकार प्रस्तुत करणार्यास ध्वनीमध्ये विकसित होतो – वर्ण (स्वर, व्यंजने), अक्षरे, शब्द, शब्दसमूह, वाक्य (वेदातील ओळींचा क्रमबद्ध विस्तार) आणि एका विशिष्ट सातत्यपूर्ण ‘हं’ असा ध्वनीचा प्रवाह साकार होण्याची ही प्रक्रिया, एका सतत ‘अ’ अशा ध्वनीसह, स्वत:ला भाषेची समूर्त किंवा सगुण संरचना म्हणून अभिव्यक्त करते आणि पुढे जाऊन भाषेच्या अधिक वैशिष्टयपूर्ण रचनांना व्यक्त करते. तीच प्रक्रिया आणि परिवर्तनाची तीच क्रिया परत परत ध्वनी (वारंवारते)ला स्थितीमध्ये परिवर्तित करत राहते. त्यामुळे भौतिक अणूरेणूंच्या निर्मितीला सुरुवात होते आणि ह्याच प्रकारे पुढेही चेतनेच्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू राहते आणि अनंत काळापर्यंत तिच्या अधिकाधिक विकसित अवस्था व्यक्त करत राहते.

क्रमबद्ध विकासाचे हे सातत्य आपण सतत विस्तारणार्‍या विश्वामध्ये व्यक्त झालेले पाहतो.

चेतनेचे तिच्या वस्तु-संदर्भित अभिव्यक्तीमध्ये होणारे क्रमबद्ध परिवर्तन, तिच्या स्व-संदर्भित स्रोताच्या स्मृतीसह सातत्यपूर्ण प्रकारे होणारे, चेतनेचे सतत विकसित होणारे स्वरूप, तिच्या स्रोताच्या स्मृतीसह स्व-संदर्भित आवर्तनांमध्ये प्रगती करत राहते – प्रगतीची प्रत्येक पायरी ही स्व-संदर्भित आवर्तनांमध्ये होत असते.
ज्याप्रमाणे चेतनेचा प्रत्येक बिंदु दुसर्‍या प्रत्येक बिंदुशी असीमितपणे जोडलेला असतो; त्याप्रमाणे चेतनेच्या संपूर्ण कार्यक्षेत्राची संरचना अनंत वारंवारतेच्या स्व-संदर्भित आवर्तनांद्वारे जोडलेले असते.
मूलभूत प्रक्रिया तीच आहे – प्रवाहित असणे आणि थांबणे... प्रवाहित असणे आणि थांबणे.. प्रवाहित असणे आणि थांबणे. बदल होण्याची ही प्राथमिक प्रक्रिया, परिवर्तन होण्याची ही प्राथमिक प्रक्रिया, विभिन्न पातळ्यांवरच्या अभिव्यक्ती चेतनेच्या क्रमविकासाची गती टिकवून असते आणि क्रमविकासाच्या प्रक्रियेला धरून अनेक निर्मितींद्वारे साकार होत असते.
ह्यामुळे अनंत अशा संहितेचे स्व-संदर्भित बदलते, गुणधर्म वाढीस लागतात आणि त्यातून क्रमबद्ध ध्वनी, भाषा, मूळाक्ष्ररांच्या भाषेतील पद्धती, शब्द, शब्दसमूह, ओळी आदि त्यांच्या मूर्त आकारांसह विकसित होतात. ह्या प्रक्रियेच्या अनंतकाळच्या सातत्यपूर्ण विकसनामुळे विश्व सतत वर्धमान राहते.

मूलत: सतत परिवर्तित होणार्याप ह्या स्व-संदर्भित बुद्धीच्या घटकांचे सतत वर्धमान विश्वात होणारे परिवर्तन ऋग्वेदामधल्या रचनांमध्ये मोजता येतील अशा टप्प्यांमध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे.
निर्मितीच्या सर्व भौतिक आणि अ-भौतिक अभिव्यक्तींना ठराविक वारंवारता (ध्वनी) असतो. ह्या मूलभूत वारंवारता म्हणजेच अ-भौतिक किमती वैदिक वाङ्मयातील नाद आहेत; बुद्धी, बुद्धीचा हुंकार आणि त्यासह चाललेली क्रमबद्ध प्रवाहित असण्याची आणि थांबण्याची क्रिया. संपूर्ण वैदिक वाङ्मयात साकार असलेली सुमधुर अभिव्यक्ती आपल्याला चेतनेच्या स्व-संदर्भित अवस्थेमधील परिवर्तनाच्या मूलभूत घटकांची प्रक्रिया समजावून सांगते.

त्याच्या परिवर्तित होण्याच्या वेगामध्ये, ऋषी, देवता आणि छंदस् मधील परस्पर-क्रिया (स्व-संदर्भित बदलणारे घटक) ध्वनी आणि ध्वनीपासून ध्वनी निर्माण करतात – एका ध्वनीपासून विकसित झालेला दुसरा ध्वनी आणि त्यापासून पुढील (तिसरा) अधिक विकसित ध्वनी (म्हणजेच ठराविक मूळाक्षरे –स्वर आणि व्यंजन). भौतिक आकाराच्या प्रगतीस सुरूवात (स्वर आणि व्यंजनांच्या) वारंवारतेपासून होते. त्याच्या रचनात्मक आकारामधून भाष्य नवीन वारंवारता आणि त्यांच्या संबंधित भौतिक आकृत्या निर्माण करण्यासाठी प्रगत होते.
निर्मितीमधील असीमित विविधता आणि बदलणारे घटक हे अनंतकाळ पर्यंत शांत, स्व-संदर्भित, स्वयंपूर्ण आणि असीमित अशा चेतनेच्याच अभिव्यक्ती आहेत- शुद्ध जागरूकता, असीमित सजगता, शुद्ध बुद्धी, शुद्ध अस्तित्व आणि त्यासह असलेले परम ज्ञान.

थांबणे आणि प्रवाहित असण्यामध्ये; ऋषी, देवता आणि छंदसच्या संहितेमध्ये स्वत: अंतर्गत कार्यरत असलेली चेतना म्हणजे सर्व जीवन आणि निर्मितीसाठी ‘सर्व असणे आणि सर्व संपणे’ आहे.

चेतना जीवनाचा पाया किंवा गाभा आहे. जीवनामधील सर्वांत महत्त्वाची ती प्रेरक गोष्ट आहे. आपण बोलतो तो प्रत्येक शब्द आणि करतो ती प्रत्येक कृती ही चेतनेचाच परिणाम आहे.

सर्व भाषा, कृती आणि वर्तन हे चेतनेचेच अपत्य आहेत. सर्व जीवन चेतनेमध्ये अस्तित्वात येते आणि चेतनेसह टिकून राहते. सर्व विश्व चेतनेचीच अभिव्यक्ती आहे. सर्व विश्वाचे सत्य स्वरूप कृतीमध्ये असलेला (कार्यरत) असा चेतनेचा महासागर हेच आहे.

चेतना हीच प्रत्येकाच्या जीवनातील मूलतत्त्व असल्यामुळे सर्व प्रकारच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक कार्यक्षेत्रांत अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी, जीवनातील असीमित सृजनात्मक सामर्थ्याचा पूर्णतेने आनंद घेण्यासाठी आणि सजगतेने आणि बुद्धीद्वारे जगण्यासाठी चेतनेचे ज्ञान हीच सर्वांत मूलभूत आवश्यकता आहे.

चेतनेसारखा सर्वाधिक महत्त्वाचा घटक दुर्दैवाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेलेला आहे. ह्यामुळेच पृथ्वीवरील जीवनरूपी वृक्ष चेतनारूपी मूळांपासून दुरावल्यामुळे त्याच्या महान उगमस्थानाला गमावून बसला आहे. त्याचे पोषण हरवले आणि तो निष्फळ बनला. प्रगाढ आनंद देण्याचा चेतनेचा गुणधर्म सुप्त झाला; मानवी चेतनेवर दु:खे प्रभावशाली बनली आणि विश्वात समस्या निर्माण झाल्या.
प्रत्येकाला माहित आहे की, आजच्या विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेले शिक्षण नोकरी मिळवून देणारे ज्ञान देते; ज्यामुळे चेतनेच्या उच्च अवस्थांचा विकास होत नाही आणि ते कोणाला जगताना सर्व क्षमतेला साकार करण्यासाठी सहाय्य करत नाही. लोकांना स्वयंस्फूर्तीने विचार करण्यास आणि प्राकृतिक नियमानुसार वागण्यास ते शिकवत नाही. त्यामुळे जगातील सर्व लोकसंख्या प्राकृतिक नियमांचे उल्लंघन करत आहे आणि त्यामुळे प्रत्येक देशात अनारोग्य आणि पीडा, तणाव आणि तंटे, अपराध आणि आतंकवाद आढळत आहेत; सर्वत्र मानवी जीवन समस्यांनी झाकोळलेले आहे.

ह्या संकटामधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्व विद्यापीठांमधून नोकरी मिळवून देणार्या ज्ञानाच्या जोडीने प्रत्येकाला महर्षींच्या वैदिक विद्यापीठातील जीवन- लक्षित शिक्षण मिळावे; जेणेकरून प्रत्येकाला चेतनेच्या प्रगत अवस्था विकसित करता येतील आणि प्रबोधनाद्वारे दैनंदिन आयुष्य पूर्णत्वाने जगता येईल आणि पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल.
प्रत्येक देशामध्ये महर्षी वैदिक विद्यापीठाची स्थापना ही प्रबुद्ध समाजाच्या निर्मितीसाठी आणि पृथ्वीवर स्वर्ग स्थापनेसाठी मूलभूत आहे. जरी जगातील प्रत्येक देशातील विद्यापीठात चेतनेवर शिक्षण देणारा विभाग निर्माण झाला; तरीही प्रत्येक देशातील येणारी पिढी प्रबुद्ध पिढी असेल. प्रत्येक देश प्रगती करून अपराध-मुक्त, समस्या-मुक्त राष्ट्र होईल. ह्यामुळे येणार्या सर्व पिढ्यांसाठी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल आणि तो जतन होईल.
ह्या चेतनेच्या विभागाद्वारे चेतनेचे ज्ञान आणि चेतनेवरील संशोधन देण्यात येईल. विद्यापीठातील अन्य प्रत्येक विभागांच्या ज्ञानाच्या जोडीला चेतनेचे संपूर्ण ज्ञान असेल आणि त्यामुळे सर्व ज्ञानशाखा एका एकात्मिक छत्राखाली येतील.

चेतनेचा विभाग, महर्षींच्या वैदिक ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा विभाग महर्षींच्या वैदिक गणिताद्वारे, महर्षींच्या वैदिक व्यवस्थापनाद्वारे आणि महर्षींच्या वैदिक राज्यशास्त्रा आदिंद्वारे ज्ञानाच्या प्रत्येक शाखेला बळकट पाया देईल.

प्रत्येक वर्तमान विद्यापीठात चेतनेच्या नव्या विभागाच्या आरंभामुळे विद्यापीठ- शिक्षणाचे ध्येय म्हणजेच प्रबुद्ध व्यक्तींची निर्मिती- हे साकार होईल



चेतनेमधील ज्ञान रचनात्मक असते
‘चेतनेच्या कार्यक्षेत्रात शिक्षणाची क्रिया घडते. सर्व शिक्षण, सर्व ज्ञान मिळवण्यासाठीची पूर्वअट, सर्व काही जाणण्यासाठीची, अनुभवण्यासाठीची आणि करण्यासाठीची पूर्वअट म्हणजे शुद्ध बुद्धीच्या पातळीपर्यंत आलेली चेतना, शुद्ध ज्ञान, स्व-संदर्भित बुद्धी, स्व-संदर्भित चेतना म्हणजेच भावातीत चेतना आहे.
‘म्हणून चेतनेचा संपूर्ण विकास- स्व-संदर्भित चेतना हीच संपूर्ण शिक्षणाची परिभाषा असली पाहिजे. चेतनेचा विकास, अत्युच्च पातळीची प्राप्त झालेली चेतना किंवा प्राप्त झालेली स्व-संदर्भित चेतना हेच संपूर्ण शिक्षण आहे; म्हणजेच परमोच्च ज्ञान मिळण्याची स्थिती, सर्व स्थल-काळामधील काहीही स्वयंस्फूर्तीने जाणण्याची क्षमता, सर्व काही योग्य करण्याची आणि केवळ इच्छेने सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता. केवळ इच्छेने सर्व काही प्राप्त करण्याची स्व-संदर्भित चेतनेच्या वेळची स्थिती, एकता म्हणजेच सर्व इच्छा- आकांक्षा ह्यांच्या पूर्ततेसाठी असीमित सृजनात्मक बुद्धी आणि वैश्विक सृजनात्मक बुद्धीचा वापर स्वयंस्फूर्तीने करण्याची क्षमता:

यतीनां ब्रह्मा भवति सारथि: (ऋग्वेद १.१५८.६)
स्वत:च्या स्व-संदर्भित अवस्थेमध्ये स्थित असलेल्यांसाठी सकारात्मक वैश्विक बुद्धी सतत स्वयंप्रेरणेने कार्यरत असते.
‘स्वत:ची स्वयंपूर्णता जतन करण्याच्या ह्या नैसर्गिक क्षमतेच्या संकृतीपेक्षा श्रेष्ठ अशी शिक्षणाची पद्धत असू शकत नाही. ही क्षमता म्हणजेच सर्व काही जाणण्याची क्षमता, स्वयंस्फूर्तीने सर्व काही योग्य करण्याची क्षमता आणि केवळ विचारांनी सर्व काही साध्य करण्याचे सामर्थ्य. शिक्षणाची हीच परम श्रेष्ठ पद्धत आहे; म्हणूनच ती महर्षींची परम- शिक्षणाची रचना आहे.
‘अशी व्यक्ती; जिची चेतना संपूर्ण विकसित झालेली आहे; प्रबुद्ध व्यक्ती असते आणि कोणतीही गोष्ट साकार करणारे हे संपूर्ण प्रबोधन शिक्षणाचे लक्ष्य असावे.
‘माहितीचे संकलन म्हणजेच आजच्या जगात प्रचलित असलेल्या शिक्षणाची शैली; हा कोणाला शिक्षण देण्याचा परिणामकारक मार्ग नाही. त्याद्वारे समस्या-मुक्त जीवन जगण्यासाठी सक्षम माणसाची निर्मिती होत नाही. ह्या पद्धतीत प्रत्येकात असलेल्या संपूर्ण सृजनात्मक असामान्य क्षमतेचाचा पूर्ण उपयोग केला जात नाही. त्यातून शिक्षणाचा मूळ उद्देश पूर्ण होत नाही.

‘आजच्या जगात प्रत्येक समाजात उभ्या असलेल्या समस्यांच्या पहाडावरून हे स्पष्ट आहे की आजची सर्व जागतिक शिक्षण पद्धती अपुरी आहे आणि तिला “फसवणूक” म्हणायला हवे.’

प्राकृतिक नियमानुसार जीवन

‘प्रत्येक विद्यार्थ्यासाठी “संपूर्ण ज्ञानाचे फळ” असे प्रबोधन देण्याची क्षमता असलेले शिक्षण म्हणजे आदर्श शिक्षण. “संपूर्ण ज्ञानाचे फळ” म्हणजे त्रुटि-मुक्त जीवन, संपूर्ण जीवन ज्यात रोजचे जगणे समाधानात आणि इच्छापूर्तिमध्ये जाते- म्हणजे प्राकृतिक नियमानुसार विचार आणि कृती करण्याची प्राकृतिक क्षमता; जेणेकरून प्रत्येकाला प्राकृतिक नियमांचे पूर्ण समर्थन मिळते.’

प्रकृतीचे संपूर्ण सहकार्य मिळवणे
‘आपल्यातील संपूर्ण सृजनात्मक चेतनेच्या क्षमतेचा विकास करून कोणताही विद्यार्थी प्रकृतीचे संपूर्ण सहकार्य मिळवतो आणि त्याच्या आयुष्याचा स्वामी बनतो. तो स्वयंस्फूर्तिने परिस्थिती आणि स्थितींवर नियंत्रण मिळवतो; तो स्वयंस्फूर्तिने पर्यावरणावर नियंत्रण मिळवतो; त्याचे वर्तन हे स्वयंस्फूर्तिने त्याचे आणि त्याच्या आसपास असलेल्या सर्वांचे पोषण करणारे असते. इतरांच्या इच्छा- आकांक्षांना हानी न पोचवता स्वयंस्फूर्तिने त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची इच्छा त्याला असते.
‘अशी आदर्श, प्रबुद्ध व्यक्ती माझ्या आदर्श अशा वैदिक विज्ञान आधारित शिक्षणाचा परिणाम (फलित) आहे.’

- महर्षी.



चेतनेच्या सात पायर्‍या

१. ब्राह्मी चेतना – चेतनेची एकता

२. भगवच्चेतना – दैवी चेतना

३. तुरीयातीतचेतना – वैश्विक चेतना

४. तुरियचेतना – भावातीत चेतना

५. जाग्रच्चेतना – चेतनेची जागृत अवस्था

६. स्वप्न-चेतना – चेतनेची स्वप्न अवस्था

७. सुषुप्तिचेतना- चेतनेची निद्रित अवस्था



‘प्रत्येकाची चेतनेची पातळी विचारात न घेता सर्व लोकांच्या क्रमबद्ध विकासाचे पोषण शिक्षणाच्या परिपूर्ण पद्धतीने करायला हवे. पृथ्वीवर जन्म झालेला प्रत्येक जण चेतनेच्या सर्व पायर्याक जगण्यासाठी शिक्षित झालाच पाहिजे; जेणेकरून दैनंदिन जीवनात चेतनेच्या सर्व पायर्यांमुळे* मिळणारा आनंद येईल.’

- महर्षी.

*: चेतनेची एकता ही येथे पहिल्या स्थानी दिली आहे; कारण ती प्रबोधनाची सर्वोच्च पातळी आहे.

सौजन्य: महर्षी परिवार

No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!