Hello. We know that Venus is known as an evening star or a morning star as it is generally seen in the evening or in the early morning. But both cannot happen simultaneously. Just think, if suppose Venus sets after the Sun, i.e. it is visible in the evening, then in the morning, the Sun would rise before Venus and therefore Venus would not be visible in the dawn. If Venus is in the east of the Sun, then it is visible only in the early morning.
But, in a rare condition, Venus has dual visibility- meaning it is visible in the morning and also evening in the same day! Yes, you read properly! In a rare condition, this happens and it is happening today, on 20th March and 21st March! Its reason is these days, Venus is having inferior solar conjunction, meaning it is almost close to the line connecting the Sun and the Earth. It is crossing the Sun from inner side and so now it is moving towards east side of the Sun. Therefore, it is no longer visible in the evening and after two weeks, it will be visible in the early morning. But, it is showing wonderful dual visibility!
Thursday, March 20, 2025
Wonderful dual visibility of Venus- A rare phenomenon!
Tuesday, March 18, 2025
अंजनवेलमध्ये आकाशदर्शन कार्यक्रम
Anjanvel = Weekend spent well!
नमस्कार. येत्या शनिवारी 22 मार्चला लोणावळ्याच्या जवळ असलेल्या निसर्गरम्य अंजनवेल फार्म हाऊस येथे आकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
* दोन टेलिस्कोप्स व बायनॅक्युलरच्या मदतीने आकाश दर्शन.
* अनेक ऑब्जेक्टस बघण्यासाठी स्वच्छ आकाश- संध्याकाळी गुरू, मंगळ, युरेनस, तारकागुच्छ व तेजोमेघ व रात्री अन्य ऑब्जेक्टस.
* पहाटे आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, अनेक तारकागुच्छ, जोडतारे आणि चंद्र.
* सकाळी ध्यान, ट्रेकिंग व सौर डाग निरीक्षण.
टेलिस्कोपिक फोटोज इथे उपलब्ध:
ठिकाण:
अंजनवेल एग्री टूरीझम, शिळिंब कामशेतपासून 27 किमी व पुण्यापासून 42 किमी.
मुंबई व पुण्यातल्या उत्सुक लोकांसोबत शेअर करू शकता.
कार्यक्रम अशा पर्यायांसह उपलब्ध आहे.
फक्त संध्याकाळचं सत्र त्यात चहा, स्नॅक्स, परिसर भ्रमंती, संध्याकाळचं आकाश दर्शन व भोजन: रू. 800 प्रति व्यक्ती. (संध्याकाळी 5 ते 9 )
रात्री टेंटमध्ये स्टे: रू. 1700/- प्रति व्यक्ती (चेक इन संध्याकाळी 5 वाजता)
रात्री रूममध्ये स्टे: रू. 2700/- प्रति व्यक्ती (चेक इन दुपारी 12.30 वाजता)
रात्री प्रिमियम रूममध्ये स्टे: रू. 3200/- प्रति व्यक्ती (चेक इन दुपारी 12.30 वाजता)
बूकिंगसाठी
विक्रांत महिंद्रकर- 7038639933
आकाश दर्शनाबद्दल माहितीसाठी
निरंजन वेलणकर- 9422108376
गिरीश मांधळे- 8600146981
Wednesday, March 12, 2025
Wonderful experience of watching the Space station and glorious night sky!
Hello. Last Saturday on 8th March, me and my friend Gireesh Mandhale conducted a sky watching programme at Anjanvel Agro Tourism near Lonavala. We had excellent skies with wonderful stars! On the women’s day, everyone was thrilled to see the Space station with Sunita Williams onboard! Also, crescent Venus, movements of moons of Jupiter, plenty of craters on the Moon, clusters in the dawn, white Milky way band, the morning trek, meditation and last but not the least, the Sun- spots! Overall it was so much of joy and satisfaction. Sharing its experience with you.
Monday, March 3, 2025
लातूरच्या पानगांवमध्ये आकाश दर्शन व विद्यार्थ्यांसोबत संवाद
विज्ञान प्रसाराची "सुदिशा"
नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच! लातूरमधल्या मित्रांच्या, स्नेही जनांच्या व आधीच्या लातूरला केलेल्या सायकल प्रवासाच्या आठवणीही ताज्या झाल्या.
कुलकर्णी सरांसोबत लातूरहून निघालो तेव्हा सरांनी सावध केलं की, पानगांवचा रस्ता इतका सोपा नसणार! आणि आकाशात अमावस्येमुळे चंद्र जरी दिसणार नसला तरी रस्त्यावरचे खड्डे चंद्रावरच्या विवरांची उणीव जाणवू देणार नाहीत! महाराष्ट्रातले जे अनेक रस्ते दुर्गम मनाली- लेह रस्त्याशी स्पर्धा करू शकतात, त्यात हाही रस्ता नक्कीच असेल! ह्या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे संयमाची कसोटी आणि ध्यानाचा धडा! चंद्रावरच्या विवरांना चुकवत व गुरूत्वाकर्षणासोबत घसरगुंडी करत जावं लागलं! पण सरांसोबतच्या गप्पांमुळे प्रवास छान झाला. पानगांवमध्ये सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचं केंद्र आहे. इथे मुलांसाठी "सुदिशा" म्हणजेच "सुट्टीच्या दिवशीची शाळा" हा उपक्रम राबवला जातो. आणि मराठी विज्ञान परिषदेच्या शाखेच्या स्वरूपात विज्ञान प्रसाराचं कामही केलं जातं. इथे सरांची खूप स्वप्नं साकार करण्याची धडपड सुरू आहे.
आकाश दर्शनाची सुरूवात दिवसा तारा बघून झाली! दिन में तारा दिखाने का मौका मिला! फिल्टर लावून सूर्य निरीक्षण. सूर्याचे 99.99% प्रकाश किरण शोषल्यानंतर सूर्य संत्र्यासारखा लालसर व सौम्य दिसतो. जणू "मार्तंड जे तापहिन!" अशा सूर्याचं व त्यावरच्या डागाचं निरीक्षण बाल तारे- तारकांनी केलं. हे डाग म्हणजे सूर्यावरच्या ज्वाळाच आहेत. पण इतर ज्वाळांपेक्षा कमी प्रकाशित असल्यामुळे काळसर भासतात. आणि दिसताना बिंदुवत दिसत असले तरी हे डाग पृथ्वीपेक्षाही मोठे असतात!
आकाशात चंद्राची व शनिची उणीव जाणवणार होती. त्यामुळे चंद्र व शनिचे माझ्या दुर्बिणीने घेतलेले फोटोज व व्हिडिओज दाखवले. चंद्र व शनिचं पिधान- चंद्रामुळे झाकला जाणारा शनिही पॉवर पॉईंटच्या मदतीने दाखवला. तसंच 2020 मध्ये झालेली शनि- गुरूची युतीही दाखवली. आकाशगंगेचा पट्टा कसा दिसतो हेही मुलांना सांगितलं. ह्यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद करता आला. विद्यार्थ्यांनी स्वत:चा परिचय करून दिला. त्यांना आकाशात काय बघायचं आहे, हे सांगितलं.
Saturday, March 1, 2025
इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war!
✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे
✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक
✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा
✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज
✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा
✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज
✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा
✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट
नमस्कार. "इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती" हे श्री. चंद्रशेखर वेलणकर लिखित व अमालताश बूक्सद्वारे प्रकाशित पुस्तक नुकतंच वाचून झालं. चंद्रशेखर वेलणकर म्हणजे माझा शेखर काका! त्यामुळे हे पुस्तक खरं तर वाचलं कमी आणि त्याच्या आवाजात व त्याच्या मिस्कील शैलीत ऐकलं जास्त, असंच वाटलं. ह्या पुस्तकावर ही प्रतिक्रिया आपल्यासोबत शेअर करतो आहे. सौ. वर्षा वेलणकर- माझी वर्षा काकू हिच्या आरोग्य समस्या- डायलिसिस ते किडनी ट्रान्सप्लांट व पुढे ह्या त्यांनी गेली अनेक वर्षं अनुभवलेल्या खडतर वाटचालीबद्दल आणि त्यातून त्यांनी रस्ता कसा शोधला हे सांगणारं पुस्तक आहे. आणि बारा वर्षांच्या ह्या एक प्रकारच्या तपश्चर्येमध्ये त्यांना जशी वाट मिळाली तशी ते इतर सहप्रवाशांसाठी कसे सोबती झाले हे वर्णन त्यात आहे. गंभीर व दुर्धर आजाराच्या स्थितीतील रुग्ण व रुग्णांची काळजी घेणारे सोबती ह्या सर्वांना उपयोगी पडेल म्हणून हे पुस्तक काकाने लिहीलं आहे.