Wednesday, October 26, 2022

सूर्यग्रहण बघण्याचा थरार आणि दाखवण्याचं समाधान!


काल २५.१०.२०२२ चं खंडग्रास सूर्यग्रहण खूप मस्त बघता आलं. निसर्गाने पूर्ण साथ दिली. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये मुलं आणि मोठ्यांनाही टेलिस्कोप, सोलार गॉगल आणि आरशाची प्रतिमा असं तीन प्रकारे दाखवता आलं. बघताना मुलं आणि मोठे मुलंही खूप खुश होते! चेहरे बोलत होते, आनंदाचे चित्कार दिसत होते! आणि धन्यवादही देत होते! मोठेही Life time experience मिळाला म्हणत होते. ग्रहण अद्भुतच होतं अर्थातच. चंद्राचा स्पर्श झाला आणि सूर्याचा वर्तुळाकार भाग लगेच बदलत गेला. अद्भुत अनुभव होता! बघता बघता चंद्र सूर्यासमोर येत होता. तासभर हा सोहळा रंगला. हळु हळु सूर्य झाकला जात होता. बघणारा प्रत्येक जण ह्याचा आनंद घेत होता आणि राहून राहून धन्यवाद देत होता. पुण्यातून चंद्र २३% इतकाच झाकला गेला, पण आनंद मात्र १००% मिळाला. सूर्यास्ताच्या थोडं आधी हळु हळु चंद्र बाहेर जायला निघाला आणि ग्रहण लागलेल्या स्थितीमध्येच सूर्य मावळतानाचा अपूर्व नजाराही दिसला! छोट्या आरशाच्या प्रतिमेमध्ये ग्रहण बघतानाही मुलं खुश होती. ग्रहणाबरोबर सौर डागही बघता आले. त्यानंतर तिथेच रात्री गुरू- शनी हे ग्रह दाखवले, तेव्हाही लहान आणि मोठ्यांनी गर्दी केली!

आपण छोट्या कृतीतूनही इतरांना खूप मोठा आनंद आणि नेहमीसाठी लक्षात राहणारा अनुभव देऊ शकतो हे अनुभवता आलं! नुसतं दूरून स्क्रीनवर बघण्यापेक्षा किंवा थिअरी वाचण्यापेक्षा एखादी छोटी गोष्टही प्रत्यक्षात केलेली व अनुभवलेली किती सुंदर अनुभव देते, ह्याची प्रचिती आली! ह्यावेळी घेतलेले हे काही फोटोज-



सुरुवातीचा पूर्ण सूर्य व त्यावरील डाग


 


 

माझे हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर आपला नंबर आणि नाव वरील क्रमांकावर पाठवू शकता. धन्यवाद.)


No comments:

Post a Comment

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!