Hello. Fauja Singh! When I came to know about him, I had thought it must be some social media hype. But no! It was so unbelievable, but it was true! A man starts to learn running when he is 89 not out! And soon at the age of 90, he starts running marathons- 42 km marathons! He finishes his first marathon in just over 6 hours. And later on he achieves best timing in marathons and running events in 90+ age group and later on 100+ age group! Yes, Fauja Singh born in India in 1911 and shifted to the U.K. in 1992. After deaths of his family members, he took to running, at so late stage. But for him, the AGE was just a STAGE! Remarkable is that as a child, he was bullied for being too weak!
Fauja Singh just tells us again and again that strength is there. It is already given. We just need to tap it. Even House of Lords has appreciated him. On his last birthday, he had received wishes from the British Queen. He was felicitated in many iconic running events in the world. You can just google Fauja Singh. He also had written his biography- Turbaned Tornado.
But the very sad part is that he died on 14th July in his native place near Jalandhar. Fauja Singh was walking on the road, yes he was 114 (his passport date of birth is 1911) and someone’s car hit him! Let us strive towards our fitness in his memory. He did this much at THAT STAGE! We can do a little at this age!
Thanks for reading. You can share with your near ones. - Niranjan Welankar 09422108376. Sky watching, meditation, fun learn and fitness sessions. Date of writing the article: 16 July 2025.
अविश्वसनीय फौजा सिंह!
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात! पण त्यांच्यासाठी AGE फक्त एक STAGE होतं! विशेष म्हणजे लहानपणी त्यांना बारीक असल्याबद्दल चिडवलं जायचं!
फौजा सिंह आपल्याला परत परत हेच सांगतात की, शक्ती आहे उपलब्ध. दिलेलीच आहे. आपण ती बस वापरायची देर आहे. हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये त्यांचा सन्मान गेला. त्यांच्या वाढदिवशी त्यांना ब्रिटनच्या राणींच्या शुभेच्छा मिळायच्या. जगातल्या अनेक रनिंग स्पर्धांमध्ये त्यांचा सन्मान केला गेला. गूगलवर माहिती आहे. त्यांनी त्यांचं आत्मचरित्रही लिहीलं होतं- टर्बन्ड टोर्नाडो.
परंतु अतिशय दु:खाची गोष्ट म्हणजे 14th जुलैला ते त्यांच्या जालंधरजवळच्या जन्मगावी सकाळी चालत होते. होय, त्यांचं वय ११४ होतं (त्यांच्या पासपोर्टवर जन्म वर्ष १९११ आहे)! ते चालत होते आणि कोणाच्या तरी कारने त्यांना उडवलं! त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून तरी आपण आपल्या फिटनेससाठी पुढे येऊया! *त्यांनी त्या STAGE मध्ये इतकं केलं! आपण ह्या age मध्ये तरी थोडसं करूया!*
वाचल्याबद्दल धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न, फिटनेस सत्रे. लिहीण्याचा दिनांक: 16 जुलै 2025. माझे फिटनेसचे अपडेटस इथे बघता येतील.)
No comments:
Post a Comment
Thanks for reading my blog! Do share with your near ones.