Experiment 47. Balloon and chits
Take any old newspaper or any used paper. Make small pieces or chits. Now inflate a balloon. Tie it properly. Rub it to a napkin or blanket for 5 minutes. Now bring the balloon near the chits and the chits will be attracted to the balloon and they will stick to it! This happens due to static electricity.
Activity 47. Who gets maximum chocklets?
You and your friends will play this simple game. If you have date of birth as 1st (1 May for example), then you are supposed to get one chocklet. If your friend has date of birth as 2nd (2 April for example), then he or she will get two chocklets. If someone has 3, then he will get 4 chocklets. If someone has 4, then he or she will get 8 chocklets. That means for every day, you will double the number. This way-
1- 1
2- 2
3- 4
4- 8
5- 16
6- 32
Now check with yourself and your friends! Who will get the maximum number of chocklets? Who will be the most lucky and the most unlucky?
प्रयोग 47. फुगा आणि चिठ्ठ्या
कोणताही रद्दी किंवा वापरलेला कागद घ्या. त्यापासून छोटे तुकडे किंवा बारीक चिठ्ठ्या बनवा. एक फुगा फुगवा. तो योग्य प्रकारे बांधा. तो काही वेळ एका नॅपकीनसोबत घासा. आता फुगा त्या कागदी तुकड्यांजवळ आणा. ते तुकडे फुग्याकडे ओढले जातील व त्याला चिकटतील! हे स्थितीज विद्युतमुळे होतं.
गंमत 47. सगळ्यांत जास्त चॉकलेटस कोणाला मिळणार?
तुम्ही व तुमचे मित्र मिळून हा खेळ खेळा. समजा तुमचा वाढदिवस एक तारखेला आहे, तर तुम्हांला एक चॉकलेट मिळेल. जर दुस-याचा वाढदिवस दोन तारखेला असेल, तर त्याला दोन चॉकलेटस मिळतील. कोणाचा वाढदिवस जर तीन असेल तर तिला चार चॉकलेटस मिळतील. कोणाचा चार असेल, तर तिला आठ चॉकलेटस मिळतील. म्हणजे दररोज आधीच्या दिवसापेक्षा दुप्पट चॉकलेटस मिळतील. अशा प्रकारे-
1- 1
2- 2
3- 4
4- 8
5- 16
6- 32
तुमच्या वाढदिवसाला व तुमच्या मित्रांच्या वाढदिवसाला किती चॉकलेटस मिळतील ह्याचा विचार करा! कोण सगळ्यांत जास्त लकी असेल व कोण अनलकी असेल?
Monday, June 16, 2025
Fun and experiment no. 47
Friday, May 16, 2025
Fun and Experiment no. 16
Experiment 16. Floating potato!
This is a very easy experiment. Take one potato and two glasses of water. Fill both the glasses almost completely. Put the potato in one glass. It will submerge in the water. It will not float. Now, in another glass, mix three- four spoon salt. Then shake it. Now insert potato in this water of the second glass. It may submerge for a while, but later on it will float. If it does not float, then mix some more salt and shake it. Now it will float! This happens due to the fact that density of salty water is more than density of the potato. As we had seen in an earlier experience, the object with less density floats in the container with more density. Salt increases density of the water. To accelerate dissolution of salt, you can also heat the water a bit. This experiment is taken from Maha- Shikshan youtube channel of Shri. Kishor Borphale sir.
Activity 16. Company matters
Now think. Can we get back the salt that we had dissolved in water? How this can be done? Think. And now, you can do this experiment with other fruits/ vegetables which do not readily float on water. In the dead sea, salt is so high that one cannot submerge in this sea. In fact its name is so as due to high salt, no life is possible there. And due to high density, we automatically float on that water. Now, as far as potatoes are concerned, do you know this thing? If we want to preserve potatoes and onions for long time, we store it with a particular object. The company of this object helps for prevention of perversion or sprouting. Ask elders about this and observe.
प्रयोग 16. तरंगणारा बटाटा!
हा अगदी सोपा प्रयोग आहे. एक बटाटा आणि पाण्याचे दोन ग्लासेस घ्या. दोन्ही ग्लास पाण्याने भरा. एका ग्लासमध्ये बटाटा सोडा. तो पाण्यामध्ये बुडेल. तरंगणार नाही. आता दुस-या ग्लासमध्ये तीन- चार चमचे मीठ मिसळा. ते चांगलं ढवळा. आता दुस-या ग्लासात बटाटा सोडा. तो काही क्षणांसाठी बुडेल पण परत वर येईल. जर तो तरंगला नाहीतर अजून थोडे मीठ टाका व ढवळा. आता तो तरंगेल! मीठ असलेल्या पाण्याची घनता बटाट्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्यामुळे असं होतं. आपण आधीच्या प्रयोगात बघितलं होतं की, कमी घनतेचा पदार्थ जास्त घनतेच्या पदार्थावर तरंगतो. मीठामुळे पाण्याची घनता वाढते. मीठ लवकर विरघळण्यासाठी तुम्ही पाणी थोडं गरमसुद्धा करू शकता. हा प्रयोग महा- शिक्षण युट्युब चॅननवर श्री. किशोर बोरफळे सरांनी सांगितला आहे.
गंमत 16. सोबत महत्त्वाची
आता विचार करा. पाण्यात विरघळलेलं मीठ आपण परत मिळवू शकतो का? कसं करता येईल ते? विचार करा. पाण्यावर न तरंगणा-या इतर फळ/ भाज्यांसाठीही तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता. आणि मृत समुद्रामध्ये मिठाचं प्रमाण इतकं जास्त आहे की, कोणीच तिथे बुडू शकत नाही. इतकंच काय, की जास्त मिठामुळे तिथे काहीच जीवंत राहात नाही. म्हणून त्याला मृत समुद्र असंच म्हणतात. पाणी जास्त घनतेचं असल्यामुळे आपण त्यावर आपोआप तरंगतो. आता बटाट्यांबद्दल तुम्हांला एक गोष्ट माहिती आहे का? जर आपल्याला बटाटे व कांदे जास्त दिवस टिकवायचे असतील, तर ते विशिष्ट घटकाच्या सोबत ठेवले जातात. त्यांना अशी विशिष्ट सोबत मिळाल्यामुळे ते खराब होत नाहीत किंवा त्यांना कोंब फुटत नाहीत. मोठ्यांना विचारा आणि निरीक्षण करा.