Experiment 22. Make your own magnet
It is easy to make your own magnet! Take a small iron rod. Rub it for a napkin for some minutes with force. Then get a small pin and take it near the rod. The pin will attach to the rod. Napkin has static electricity. When the rod is rubbed on the napkin, it gets magnetic property and it attracts the pin. This magnet works only for short time.
Activity 22. Hair getting straight
Many times we experience static electricity. Think a little and recall. Bring your hand near a plastic chair and see that hair on your hand is attracted. Even in a mosquito net, hair on head can be attracted. When hair is in contact with clothe, comb or wool, then they exchange electrons. Hair with similar charge repel each other and as a result then get straight and appear as attracted.
प्रयोग 22. चुंबक तयार करा
चुंबक बनवणं सोपं आहे. एक छोटा लोखंडी रॉड किंवा गज घ्या. त्याला काही मिनिटे नॅपकीनवर जोराने घासा. त्यानंतर त्याला बारीक टाचणीजवळ न्या. टाचणी गजाला चिकटेल. नॅपकीनमध्ये स्थितीज विद्युत असते. त्यामुळे नॅपकीनवर घासल्यानंतर रॉडमध्ये चुंबकत्व येतं व टाचणी त्याच्याकडे आकर्षित होते. हे चुंबकत्व थोडा वेळच टिकतं.
गंमत 22. खेचले जाणारे केस
स्थितीज विद्युतचा अनुभव आपल्याला अनेकदा येत असतो. थोडा विचार करा व आठवा. प्लास्टीकच्या खुर्चीच्या जवळ हात आणून पाहा की, हातावरचे केस खेचले जात आहेत का. मच्छरदाणीमध्येसुद्धा डोक्यावरचे केस खेचले जाऊ शकतात. जेव्हा केस कापडावर, कंगव्यावर किंवा लोकरीवर घासले जातात तेव्हा इलेक्ट्रॉन्सचं आदान प्रदान होतं. आणि समान प्रभार असलेले केस प्रतिकर्षणामुळे एकमेकांपासून लांब जायचा प्रयत्न करतात व त्यामुळे केस उभे राहिलेले किंवा खेचलेले दिसतात.
Thursday, May 22, 2025
Fun and Experiment no. 22
Thursday, May 8, 2025
Fun and Experiment no. 8
Experiment 8. One more thing creating sparks
Just like pebbles, there is one more thing which generates sparks! And you don't need much effort to do it. It almost happens on its own. You need darkness to experience this. In the night, just spread your blanket. After some time, fold it. While you fold it, there is static electricity in the blanket and you can clearly see sparks. For this, you need dry weather. If it is not automatically generated, you can rub and fold it again. You need total darkness to see it.
Activity 8. Using sparks
For this, you need help from elders. Pebble stone sparks or blanket sparks, you can use them to generate fire. Take a small piece of dry paper. Put it on one pebble stone. Then strike the other pebble stone over it. After some attempts, you can set it ablaze! Same with the blanket. But take care and do not do this alone. Do you know there is one more way to generate fire? You can use our Sun for this! Think. If you know, do it again with your friends.
प्रयोग 8. ठिणग्या तयार करणारी गोष्ट
गारगोटीप्रमाणेच अजून एक वस्तुही ठिणग्या तयार करते! आणि त्यासाठी फार प्रयत्नही करावा लागत नाही. आपोआप ठिणग्या तयार होतात. त्याचा अनुभव घेण्यासाठी अंधार लागेल. रात्र झाल्यावर तुमच्याकडे असलेलं ब्लँकेट पसरवा. थोड्या वेळाने त्याची घडी करा. तुम्ही घडी कराल तेव्हा त्यामध्ये स्थितीज विद्युत तयार होते आणि त्यामुळे तुम्हांला ठिणग्या दिसू शकतात. कोरड्या हवेत हे लवकर होतं. जर ठिणग्या आपोआप तयार झाल्या नाहीत तर तुम्ही तिची घडी परत करा, तिच्या एका भागाने दुस-या भागावर घासा. पूर्ण अंधार असेल तर ठिणग्या दिसतील.
गंमत 8. ठिणग्यांपासून आग
त्यासाठी तुम्हांला मोठ्यांची मदत लागेल. गारगोट्या किंवा ब्लँकेट वापरून तुम्ही आग पेटवू शकता. कोरड्या कागदाचा तुकडा घ्या. तो एका गारगोटीवर ठेवा. मग दुस-या गारगोटीने त्या गारगोटीला घासा. काही वेळ प्रयत्न केल्यावर तुम्ही तो कागदाचा तुकडा पेटवू शकता. आणि ब्लँकेट वापरूनही तुम्ही हेकरू शकता. पण हे करताना काळजी घ्या व एकट्याने करू नका. आग पेटवण्याचा आणखी एक मार्ग तुम्हांला माहिती आहे का? त्यासाठी तुम्ही सूर्याची मदत घेऊ शकता! विचार करा. जर तुम्हांला माहिती असेल तर मित्रांसोबत ते करून पाहा.