✪ एक, दोन, तीन... “बाय!”
✪ थक्क करणारी मुलं आणि त्यांचा उत्साह
✪ निसर्ग रहस्ये उलगडणार्या व मुलांची "नस जाणणा-या" डॉक्टर स्नेहलताई
✪ किडे, वनस्पती, पानं, खेकडे अन् काजव्यांचं अद्भुत जग
✪ मुलांसोबत मोठ्यांचं लहान होणं आणि शिकणं
✪ पुस्तकवेडे आणि हॅरी पॉटरचे भक्त गण
✪ खजिन्याचा शोध आणि सोबत केलेली धमाल
✪ चंद्र- सूर्य, तारे आणि दोन गुरू
✪ “तुमच्यासाठी पण आईस्क्रीम आहे!”
✪ अविस्मरणीय जोडसाखळी, विष- अमृत आणि लंगडी
नमस्कार. नुकतंच मुलांसाठीचं अडीच दिवसीय शिबिर शिळिंबमधल्या अंजनवेलला झालं. मुलांचं शिबिर घेण्याचा अनुभव खूप आनंददायी आणि वेगळा होता. मुलांची विलक्षण ऊर्जा, उत्साह, त्यांची प्रसन्नता आणि मस्ती जवळून बघता आली. शिबिरामध्ये अविस्मरणीय अशा आठवणी मिळाल्या. त्या शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.
मुलांसाठी आकाश दर्शन, फन- लर्न किंवा गणित- विज्ञानातील गमती असे उपक्रम अनेक वर्षांपासून करत असलो तरी शिबिर असं हे दुसरंच. मागच्या वर्षी मुलांचं शिबिर जिथे झालं होतं त्या शिळिंबमधल्या अंजनवेलमध्येच हे शिबिर झालं. ह्यावेळी शिबिरामध्ये मुलांसाठी कला कौशल्य कार्यशाळा घेणार्या अमृताताई ढगे एका सत्रासाठी आल्या. पर्यावरण, शिक्षण आणि योग क्षेत्रात मोठा अनुभव असलेल्या व मुलांसाठी वाचन- निसर्ग भ्रमंती असे उपक्रम करणार्या डॉ. स्नेहलताई देवकर- पाठकसुद्धा पूर्ण वेळ शिबिरात होत्या. लहान मुलांसाठी सत्र घेणार्या नेहाताई देशपांडेसुद्धा शिबिरात पूर्ण वेळ होत्या. त्यामुळे कला कौशल्ये, रेखाटन, निसर्ग वाचन, अभिनय, परिसर भ्रमंती आणि अभ्यास अशी वेगळी मेजवानीही मुलांना मिळाली. आम्हा तिघांसोबत अंजनवेलमधले सर्व जणसुद्धा शिबिरामध्ये होतेच.
Wednesday, May 13, 2026
सुट्टीतलं शिबिर- आनंदाचे डोही आनंद तरंग!
Subscribe to:
Posts (Atom)