Experiment 45. Make a rainbow!
You must have seen a rainbow during rainy days. When light passes through water drops, its colours are diffracted separately and a wonderful rainbow is produced. This sometimes also happens on the road, when Sunlight is reflected from oil. Even rainbow occurs near a waterfall. This happens due to the fact that light is made up of different wavelengths and they diffract differently. We had seen what diffraction is. Now let’s make the rainbow in our house. For this, you need a window with Sunlight entering your house. Now, take a bowl, add water into it and place a small mirror. Now put the bowl in the Sunlight and see its reflection on your wall. With slight adjustments, you will get a rainbow!
Activity 45. Multi- coloured wind mill
There are other ways to do the rainbow. If Sunlight is not available, you can use a bright torch or flash in the night and do the same thing. It will produce a rainbow. Also think about other ways of doing this. Now, we will do a different thing. Recently, we had made a paper windmill and also rotated it. Now, again make the paper wind mill. After its spades are ready, give different colour to each spade. Now hold it onto the pencil and put under a fan. It will rotate very fast and all colours will merge into white! When all colours are mixed, our eyes perceive it as white.
प्रयोग 45. इंद्रधनुष्य बनवा!
पावसात तुम्ही इंद्रधनुष्य बघितलं असेलच. जेव्हा प्रकाश पाण्याच्या थेंबांमधून जातो, तेव्हा त्याचे रंग वेगळे होतात, प्रकाशाचं अपवर्तन होतं आणि मनमोहक इंद्रधनुष्य तयार होतं. हे कधी कधी रस्त्यावरही दिसतं, जेव्हा प्रकाश तेलावरून परावर्तित होतो. कधी ते झ-याजवळही दिसतं. हे होण्याचं कारण हे आहे की, प्रकाश वेगवेगळ्या तरंगलांबीने बनलेला असतो आणि त्यांचं अपवर्तन (diffraction) वेगवेगळं होतं. अपवर्तन म्हणजे काय, हे आपण एका प्रयोगात बघितलं आहे. तर आता घरामध्येच इंद्रधनुष्य बनवूया. त्यासाठी आत सूर्यप्रकाश येईल अशी एक खिडकी लागेल. आता एक भांडं घ्या, त्यात पाणी भरा व आतमध्ये एक छोटा आरसा ठेवा. सूर्यप्रकाशाचं प्रतिबिंब भिंतीवर घ्या. थोडा प्रयत्न केल्यावर तुम्हांला इंद्रधनुष्य मिळेल!
गंमत 45. बहुरंगी पवनचक्की
इंद्रधनुष्य बनवण्याचे इतरही प्रकार आहेत. जर सूर्यप्रकाश नसेल तर तुम्ही रात्री एखादा चांगला टॉर्च किंवा फ्लॅश वापरूनही हे करू शकता. तिथेही इंद्रधनुष्य तयार होईल. हे करण्याचे इतरही मार्ग तुम्ही करून बघू शकता. आता आपण एक वेगळी गोष्ट करू. काही दिवसांपूर्वीच आपण कागदी पवनचक्की केली होती व ती फिरवली होती. आता परत तशी कागदी पवनचक्की बनवा. तिची पाती तयार झाली की, त्यांना वेगवेगळे रंग द्या. आता पेन्सिलीवर ती पवनचक्की (भिंगरी) उचलून पंख्याखाली धरा. ती खूप वेगाने फिरेल व सर्व रंग जाऊन पांढरा रंग दिसेल. जेव्हा सगळे रंग एकत्र येतात, तेव्हा आपल्या डोळ्यांना तो रंग पांढरा दिसतो.
Saturday, June 14, 2025
Fun and experiment no. 45
Wednesday, June 11, 2025
Fun and experiment no. 42
Experiment 42. Refraction of light
This is a very easy and wonderful experiment. It is suggested by my daughter Advika. It can be easily done in a minute. Take a glass or a jar made up of glass. On a paper make a clear arrow. You can use colour and sketch pen for this, so that it is bold and large. See the paper through the glass. Now fill the water till half the glass or the jar and see the paper through the water! You will see that direction of the arrow has been changed! If it was towards right → , now it is towards left ← ! This happens due to refraction of light. When light passes through different mediums, it changes its directions. This principle is used in lenses and telescopes. You will also notice that at a particular distance away from the glass, the changed image is more clear. It is due to focusing of light on that point.
Activity 42. Observe your observation!
This is a simple activity. Take a plain paper. It should be totally blank- nothing written or drawn on it. Now write a small but sharp dot on the paper. Now gather your friends. Show them this paper and ask them what they see. 99% of the time they will tell that they see the dot. Now ask them again, do you see anything else? They will probably tell that rest of the page is empty!
This can also be done by putting a white dot on the blackboard in your school. Here, practically we can observe three things. Firstly, we can observe the empty blackboard or the empty paper. Secondly we can observe the dot. And thirdly we can also observe the observer- we and our action of observing! The more we observe, the more we know! So always observe your observation!
प्रयोग 42. प्रकाशाचे अपवर्तन (refraction)
हा अगदी सोपा आणि आश्चर्यकारक प्रयोग आहे. माझ्या मुलीने- अद्विकाने तो मला सांगितला. अगदी एका मिनिटात तो करता येतो. काचेचा एक ग्लास घ्या. एका कागदावर रंग किंवा स्केच पेन वापरून ठळक प्रकारे एक बाण काढा. आता तो कागद काचेच्या ग्लासमधून पाहा. आता अर्धा ग्लास पाण्याने भरा व तो कागद पाण्यामधून पाहा! बाणाची दिशा बदललेली दिसेल! जर तो बाण उजवीकडे → काढलेला असेल, तर तो पाण्यातून बघताना उलटा म्हणजे डावीकडे ← दिसेल! हे होण्याचं कारण म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन (refraction of light). जेव्हा प्रकाश वेगवेगळ्या माध्यमांमधून जातो, तेव्हा त्याची दिशा बदलते. ह्याच तत्त्वाचा उपयोग भिंगांमध्ये व दुर्बिणीत केला जातो. तुमच्या हेसुद्धा लक्षात येईल की, ग्लासपासून काही अंतरावरून बदललेली प्रतिमा सर्वांत जास्त स्पष्ट दिसते. तिथे प्रकाश फोकस होत असल्यामुळे असं होतं.
गंमत 42. तुमच्या निरीक्षणाचं निरीक्षण करा (Observe your observation)!
हे अगदी सोपं आहे. एक कोरा कागद घ्या. तो अगदी कोरा असला पाहिजे- त्यावर काहीही लिहीलेलं किंवा ड्रॉ केलेलं नको. आता त्या कागदावर एक छोटा पण स्पष्ट बिंदू (डॉट) काढा. तुमच्या मित्रांना बोलवा. त्यांना कागद दाखवा व विचारा की, त्यांना काय दिसतं आहे. 99% वेळेस ते म्हणतील की, त्यांना तो बिंदू दिसतोय. त्यांना परत विचारा की अजून काही दिसतंय का. कदाचित ते म्हणतील की, बाकीचा रिकामा कागद दिसतोय!
हीच गोष्ट शाळेतल्या काळ्या फळ्यावर खडूने पांढरा डॉट काढूनही करता येऊ शकते. इथे प्रत्यक्षात आपण तीन गोष्टींचं निरीक्षण करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण रिकामा फळा किंवा रिकामा कागद बघू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण तो बिंदू बघू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण निरीक्षण करणा-या निरीक्षकालाही बघू शकतो- आपण निरीक्षण करत आहोत, हेही बघू शकतो! आपण जितकं जास्त निरीक्षण करू, तितकं आपल्याला उलगडत जातं! त्यामुळे नेहमी तुमच्या निरीक्षणाचंही निरीक्षण करा!