Wednesday, September 23, 2026

Karve Days 9: Participation in a street play on the Right to Information Act

✪ Street play- an effective medium for social awareness
✪ Joy of participation in a street play competition with friends
✪ Six sixes by Yuvaraj and "health for all!"
✪ Dialogue of field work guide with village women
✪ "Submission" days and race against time
✪ The hostel world!

December 2007! Around one and a half year completed in Karve Institute. Somewhere back of the mind, one feels that oh, now last six months remaining! And then it would be a tough time. In case work discussions, we were taught that conclusion of any partnership such as counseling should be done properly and in certain stages. It was the same feeling- Last six months. And then this- "कब कहाँ सब खो गई जितनी भी थी परछाइयाँ, उठ गए यारों की महफिल हो गई तन्हाइयाँ..." Of course, before that, there were plenty of things lined up. Many milestones were remaining. Slowly things started to become difficult. Submissions became slow. In a way, war fronts increased. As a result, along with the field work, research work also slowed down. 



Video summary of this article.  

Further stages were going on for the research work. Post data analysis. I had completed its categorization after giving codes to every response. Tables of responses were also prepared. Then graphs and pie- chart etc. Were made. The next work could be done through hand- writing or also on a computer. Of course, one had to go to a net cafe for that. As I had good typing speed, I typed it myself. Sometimes when the faculties would be traveling, we required to send reports on the mail also. Stages of thesis writing were going on. It included writing executive summary, conclusions, findings etc. One difficult part of that process was writing bibliography! One had to write information of the referred material in a very precise manner. One had to write it in technically appropriate language. Slowly it was done.

At that time, some of my friends were participating in one college competition organized by one newspaper. They told me to participate with them. It was the atmosphere there which made me join them. We three boys and two girls- we developed a street play. Its subject was “Right to Information.” Me, Triveni, Sinal, Manoj Margade and Kailas More were there. Kailas More wrote its skit and the theme. We had some rehearsals and then it was all fun! It was interesting one. A small street play was ready! The first scene in the street play was the joy and excitement of seeing six sixes by Yuvraj Singh! We would shout in joy and clap while watching it on TV, it was the scene. Then during the match, one advertisement would be shown on TV- “Health for all.” Then information about Government schemes related to health, education, agriculture etc. would be given. And then we would initiate the dialogue on “Right to information act.” Dialogue and question- answers in form of the skit. Then this act as new and it was discussed at large. 

With some preparation we participated at the district level competition organized by that newspaper and we won there. Then we got an opportunity to participate their State level Youth Festival. There we got persons to guide us. Then by around 12th January, we presented the street play at Jalgaon in north Maharashtra. Our friends and students from other colleges also participated in other competitions. We obtained one prize there. We could watch many performances. Students would work so hard for their performances. It was a sight to experience.

The college would give such opportunities despite the hectic schedule. Many students would participate in such activities or travel for study related projects. So education was much more than class room education. It also would help for personality development, skill development and increase in one’s confidence. It was the golden epoch in my college life. And as far as hostel mates are concerned, I would need to write separately about that fun. Everyone’s unique speaking style, flavour of dialects, radios playing till late night, someone would speaking for hours on phone, their quarrels and bullying! Also unique skills and qualities everyone had! And what about those memories which cannot be expressed in parliamentary parlance! Today without company of these friends I just cannot dare to go near the hostel.

... During the next term of the field work, tasks were different. I was working with youth groups in villages in rural Pune. It included forming self- help groups of youth and understanding work of women's self help groups. As a part of the field work process, once my field work guide Nagmani Rao madam also had come there for a visit. Despite her water- tight schedules, she found time and had a dialogue with the women. She also observed my work, my interactions with the villagers, their talking about me and also work of the members of my agency. This field work was good, but slowly stress of all submissions only went on increasing. As a result, it became difficult to do justice with all tasks. Later on all deadlines started coming simultaneously. Everything then got slightly hampered. When January 2008 was about to finish, we realized that the "burn out" situation we learned in the class was not far from us. 

Next part: Karve Days 10: Survey work in displaced villages near Narmada river

-Niranjan Welankar 09422108376. Date of writing- 23 September 2026.

 

कर्वेतले दिवस ९: माहितीच्या अधिकारावरील पथनाट्यात सहभाग

✪ पथ नाट्य- समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम
✪ मित्रांसोबत नाट्य स्पर्धेत सहभागाची मजा
✪ युवराजचे सहा सिक्सेस आणि "सर्वांसाठी आरोग्य!"
✪ गावातील महिलांसोबत फिल्ड वर्क गाईडचा संवाद
✪ "सबमिशन" पर्व आणि वेळेची शर्यत
✪ हॉस्टेलवरच्या जगातल्या गमती

२००७ चा डिसेंबर महिना! कर्वे संस्थेमध्ये शिक्षण सुरू होऊन दीड वर्ष होत आलं. मनामध्ये कुठे तरी जाणीवसुद्धा आहे की, बस आता फक्त सहा महिने! त्यानंतर मात्र- "कब कहाँ सब खो गई जितनी भी थी परछाइयाँ, उठ गए यारों की महफिल हो गई तन्हाइयाँ..." केस वर्क पद्धतीमध्ये शिकवलं गेलं होतं की, समुपदेशनासारखी एखादी प्रक्रिया संपण्याआधी त्या व्यक्तीची तयारी करून द्यावी लागते. टप्प्या टप्प्याने ती प्रक्रिया थांबवायची असते. तशीच ही भावना. त्यामुळे हे शेवटचे सहा महिने आहेत ही जाणीव होती. पण त्या आधी खूप गोष्टी बाकी होत्या. खूप टप्पे बाकी होते. दुसरं वर्षं अर्धं संपत आलं तेव्हा हळु हळु गोष्टी अवघड होऊ लागल्या. आणि कामं मागे पडायला लागली. सबमिशन्स संथ झाल्या. एक प्रकारे युद्धाच्या आघाड्या वाढल्या. त्यामुळे फिल्ड वर्कबरोबर रिसर्चच्या कामाचाही वेग कमी झाला. 

ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.

रिसर्चच्या संकलित माहितीवर पुढचं काम सुरू होतं. वेगवेगळ्या उत्तरांना संकेत म्हणजे कोड देऊन त्यांचं कॅटगरायजेशन झालं होतं. त्यानुसार प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांचे टेबल्स तयार झाले. मग त्यावरच आलेख (ग्राफ्स) आणि पाय चार्ट इ. तयार केले. तिथून पुढचं काम हाताने करण्याबरोबर कंप्युटरवरही करता येत होतं. त्यासाठी अर्थातच नेट कॅफेत जावं लागत होतं. माझी टायपिंग स्पीड चांगली असल्यामुळे मी स्वत:च टाईप करत गेलो. कधी कधी फॅकल्टीज प्रवासात असतील तर त्यांना रिपोर्टही मेलवर पाठवायचो. प्रबंध लेखनातील वेगळे टप्पे सुरू झाले. अभ्यासाचा सारांश (एक्झिक्युटीव्ह समरी), निष्कर्ष, महत्त्वाचे मुद्दे असे सगळे लिहीणं सुरू झालं. त्यातला एक अवघड भाग म्हणजे बिबलोग्राफी! संदर्भ साहित्याची माहिती अगदी ठरलेल्या नमुन्यात लिहीणं! तांत्रिक परिभाषा योग्य लिहीणं. ते हळु हळु होत गेलं.  

त्या सुमारास एका वृत्तपत्राच्या महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये काही मित्र- मैत्रिणी सहभाग घेत होते. त्यांनी मलाही ये म्हणून सांगितलं. आणि कॉलेजात वातावरणच असं होतं की, मी सहज तयार झालो. आम्ही तीन मित्र आणि दोन मैत्रिणी मिळून पथ नाट्य बसवलं. "माहितीचा अधिकार" हा विषय घेतला होता. माझ्यासोबत त्रिवेणी, सिनल, मनोज मरगडे आणि कैलास मोरे होते. कैलास मोरेने पटकथा म्हणजे थीम बनवली आणि स्किट बसवलं. जुजबी प्रयोग केले आणि मजा यायला लागली! मांडणी आकर्षक झाली. छोटेखानी नाट्य तयार झालं! त्या नाट्यातला पहिलाच प्रसंग म्हणजे युवराजचे सहा सिक्सेस बघून केला जाणारा जल्लोष, हा होता! एकदम आनंदाने ओरडून टाळ्या वाजवत ते सिक्सेस टीव्हीवर बघितल्याचा प्रसंग. आणि मग त्या खेळामध्येच टिव्हीवर जाहिरात येणार- सर्वांसाठी आरोग्य. आणि मग त्यानंतर आरोग्य, शिक्षण, शेती ह्या बद्दलच्या सरकारी योजनांची माहिती देऊन माहितीचा अधिकार कायदा असा विषय चर्चेत यायचा. अर्थात् संवादाच्या आणि प्रश्नोत्तराच्या स्वरूपात. तेव्हा माहितीचा अधिकार अधिनियम तसा नवीन होता. त्यामुळे त्याची बरीच चर्चा होती आणि त्याबद्दल जन जागरूकता केली जात होती.

आम्ही थोड्या तयारीने त्या वृत्तपत्राच्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात जिंकलो आणि मग त्यांच्या राज्य स्तरीय युवा महोत्सवामध्येही संधी मिळाली. त्यांच्याकडून मार्गदर्शकही मिळाले आणि मग १२ जानेवारीच्या सुमारास जळगांवला नाट्य सादर केलं. इतरही स्पर्धांमध्ये आमचे मित्र- मैत्रिणी होत्या आणि इतर कॉलेजचेही विद्यार्थी होते. तिथेही एक पारितोषिक मिळालं.  वेगवेगळे कार्यक्रम बघता आले. अनेकांचे परफॉर्मन्सेस छान होते.  किती मेहनत घेऊन विद्यार्थी सादर करतात, ते बघायला मिळालं. 

कॉलेजमध्ये व्यस्त वेळापत्रक असूनही अशा उपक्रमांसाठी संधी दिली जायची. अनेक विद्यार्थी अधून मधून असे अन्य काही उपक्रमासाठी किंवा अभ्यास प्रवासासाठी बाहेर जायचे. शिक्षण अनेक प्रकारे व्हायचं. शिक्षणापलीकडे व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास, आत्मविश्वास वाढणे अशाही गोष्टी त्यामुळे व्हायच्या. महाविद्यालयीन जीवनातला तो सुवर्ण काळ होता. हॉस्टेलच्या मित्रांसोबतच्या गमतींबद्दल तर स्वतंत्रच लिहावं लागेल. एकेकाचे आवाज, बोलण्याची शैली, त्याच्या गावानुसारची बोली आणि लहेजा, रात्री वाजत राहणारे रेडिओ, कोणाकोणाचं तासन् तास फोनवर बोलणं, एकमेकांच्या खोड्या आणि भांडणं! त्याबरोबर प्रत्येकाकडे असलेली वेगवेगळी कौशल्यं आणि गुण! आणि अशा तर किती आठवणी ज्या संसदीय भाषेत सांगता येणार नाहीत! आज हे मित्र सोबत नसतील तर हॉस्टेलच्या जवळ जाण्याची इच्छासुद्धा होत नाही.

... फिल्ड वर्कमध्ये दुसर्‍या टर्ममध्ये वेगळी कामं होती. पुण्यातल्या राजगुरूनगर- खेड जवळच्या गावांमधल्या गटांसोबत काम होतं. युवकांचे बचत गट बनवणं, महिला गटांचं काम समजून घेणं अशा गोष्टी होत्याच. एका वेळी फिल्ड वर्कचा भाग म्हणून माझ्या मार्गदर्शिका नागमणी राव मॅडमसुद्धा एका भेटीसाठी आल्या होत्या. त्यांच्या अति अति व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी नियोजन करून वेळ काढली आणि महिलांसोबत संवाद केला. त्याबरोबर माझं काम, माझं गावातल्या लोकांसोबतचं बोलणं, त्यांचं माझ्याबद्दलचं मत, संस्थेचे कार्यकर्ते ह्यांचंही सूक्ष्म निरीक्षण केलं. फिल्ड वर्क तसं छानच होतं. पण हळु हळु सगळ्या सबमिशनचा ताण वाढत गेला. त्यामुळे कामांना पुरेसा न्याय देणं कठिण झालं. पुढे तर सगळ्या सबमिशनची वेळ एकदमच जवळ आली. त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला. वर्गात शिकलो होतो ती "बर्न आउट" स्थिती फार दूर नाही, हे जानेवारी २००८ संपताना जाणवत होतं. 

पुढचा भाग: कर्वेतले दिवस १०: नर्मदा किनार्‍याजवळच्या विस्थापित गावांमध्ये सर्वेक्षणाचं काम

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 23 सप्टेंबर 2026. 

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.