Showing posts with label भिंग. Show all posts
Showing posts with label भिंग. Show all posts

Wednesday, June 18, 2025

Fun and experiment no. 49

Experiment 49. Making a lens from water

This experiment is told to me by my niece Aatmaja. For this, you will need a paperclip, a small pot (katori), any oil bottle, a spoon, a soap bottle, newspaper and clothe piece. Straighten the paperclip and bend it like "P or Hindi 9." Cover the bent paperclip with little oil. Don't let the oil dry. Do it quickly. Take the pot/ container and pour some soap in it. Add two drops of oil into it and stir it with the spoon. Now dip the bent paperclip in the mixture. There will be a thin lens of water in the bent "P" shape. Now by using this "P shape" let's read some paper or newspaper. Get it close to your eyes. If the lens does not stay on the paperclip for long, spread some more oil and dip it into the mixture again.

Activity 49. One more property of water!

You can even use water drop as a mini lens. Get some laminated page or put transparent plastic on some page. Now add a small drop of water on the text. If the drop is proper round shape, then it will surely zoom the text! It is a mini lens only! Due to its shape lens focus light rays and gives a magnified image. You know how to form bubbles. When air gets inside soap liquid, bubbles are formed. Check, can you use the bubbles also as lens.

प्रयोग 49. पाण्यापासून बनवलेले भिंग (लेन्स)

माझी पुतणी आत्मजाने हा प्रयोग मला सांगितला आहे. हे करण्यासाठी तुम्हांला एक पेपरक्लिप, एक छोटी वाटी, कोणतीही तेलाची‌ बाटली, एक चमचा, एक साबणाची बाटली, वृत्तपत्र व जुनं फडकं लागेल. पेपरक्लिप ओढून सरळ करा व तिला वाकवा आणि “P किंवा ९” सारखा आकार बनवा. वाकवलेल्या पेपरक्लिपवर थोडे तेल टाका. तेल सुकू देऊ नका. लगेचच पुढची कृती करा. वाटी घ्या व त्यामध्ये थोडा साबण टाका. त्यामध्ये तेलाचे दोन थेंब टाका व चमचा वापरून ढवळा. आता त्या मिश्रणामध्ये ती पेपरक्लिप बुडवा. वाकवलेल्या क्लिपच्या “P किंवा ९” आकारामध्ये एक पातळ भिंग तयार होईल. हा “P किंवा ९” आकार वापरून आपण वृत्तपत्राचा मजकूर वाचूया. पेपरक्लिप तुमच्या डोळ्यांच्या जवळ धरून बघा. जर पेपरक्लिपवर भिंग (तेल साबणाचे मिश्रण) चिकटून राहिले नाही, तर आणखी तेल टाका व ते परत मिश्रणात ढवळा.

गंमत 49. पाण्याचा आणखी एक गुणधर्म!

पाण्याचा थेंब वापरूनही तुम्ही‌ एक छोटं भिंग (लेन्स) बनवू शकता. लॅमिनेट केलेला पेपर घ्या किंवा एखाद्या पानावर पारदर्शक प्लास्टीक ठेवा. आता मजकुरावर पाण्याचा एक थेंब येईल असा प्लास्टीकवर किंवा लॅमिनेट केलेल्या कागदावर ठेवा. जर थेंब बरोबर गोलाकार असेल, तर तो नक्कीच मजकूर मोठा (झूम) करेल! हे एक छोटं भिंगच आहे! त्याच्या गोलाकारामुळे भिंगामधून प्रकाश किरण एका बिंदूवर आणले जातात व मोठी केलेली प्रतिमा मिळते. तुम्हांला साबणाच्या पाण्यामध्ये हवा भरून बुडबुडे बनवता येतात. तर अशा बुडबुड्यांचंही भिंग बनतं का, हे जरा तपासून बघा.

Saturday, June 7, 2025

Fun and experiment no. 38

Experiment 38. Interesting concave shape

A simple question. What is common in these things- Our eyes, our ears, dish of dish tv, glass of a torch and glass of a spectacle? Think a little. There is one common thing and that is concave shape. All these things are spherical or half- spherical and having curvature. Concave shape is very useful for focusing. If there is a concave mirror, then it focuses all light rays on one point. That’s why concave mirrors are used in telescopes. Due to its curved shape, all rays gather at one point. This is the magic of focus. Our eyes are made of two concave natural lenses. Even our ear is concave in shape. And think, if you want to hear someone, but you cannot hear his or her voice. Then what you do by your hand? You create a ‘concave shape’ or a sort of C by using your hand for proper hearing. That helps for better voice. That means, we also at the back of mind know how these things work. And even mirrors of vehicles too have these properties. And to show broad view i.e. to zoom out, we use convex mirror. And even headlights of the vehicles too have concave glass!

Activity 38. Study like a concave mirror

Now remember this. Due to concave shape, a mirror becomes a part of a telescope and shows us details. But if the mirror had been plain, it would not show us details. So now onward when you study, think of this- are you studying like a concave mirror or a plain mirror? If you study like a concave mirror, you will get wonderful focus and its results will be great. Always remember this. Focus gives strength.

प्रयोग 38. जादुई वक्राकार (कॉन्केव शेप)

एक सोपा प्रश्न. ह्या सगळ्यांमध्ये काय समान आहे? आपले डोळे, आपले कान, डिश टीव्हीची डिश, टॉर्चची काच आणि चष्म्याची काच. थोडा विचार करा. ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहेत व हे सर्व वक्राकार किंवा अंतर्वक्र आहेत. कॉन्केव्ह शेप्सने बनलेले आहेत. ह्या सर्व गोष्टी गोलाकार किंवा अर्धगोलाकार आहेत व त्यांच्यात वक्रता आहे. अंतर्वक्र आकार खूप उपयोगी असतो, कारण तो सर्व किरण एका जागी आणतो. त्यामुळे दुर्बिणींमध्ये अंतर्वक्र आरसा वापरला जातो. वक्र आकारामुळे त्यावर येणारे सर्व किरण एका बिंदूवर येतात. एकाग्रतेमुळे ही (फोकस) जादू होते. आपल्या डोळा दोन नैसर्गिक अंतर्वक्र भिंगांनी बनलेला असतो. आपला कानसुद्धा अंतर्वक्रच तर असतो. आणि विचार करा. तुम्हांला कोणी सांगत असलेले ऐकू येत नाही तेव्हा तुम्ही हाताने काय कृती करता? तुम्ही हात खोलगट करून (C प्रमाणे) कानाजवळ धरता, म्हणजेच हाताने एक ध्वनीसाठीचं अंतर्वक्र भिंग तयार करता. त्यामुळे व्यवस्थित ऐकू यायला मदत होते. म्हणजे आपल्यालासुद्धा ही अंतर्वक्र आकाराची गंमत माहिती आहे कुठे तरी. वाहनांचे आरसेसुद्धा वक्र असतात पण ते मोठा व्ह्यू झूम आउट करून दाखवतात म्हणून बहिर्वक्र (कॉन्व्हेक्स) असतात. आणि वाहनांच्या हेडलाईटसवरही अंतर्वक्र काच असते!

गंमत 38. अंतर्वक्र आरशाप्रमाणे अभ्यास करा

आता हे लक्षात ठेवा. अंतर्वक्र आकारामुळे आरसा टेलिस्कोप बनतो व आपल्याला खूप गोष्टी दाखवतो. पण जर तो साधा सपाट आरसा असला असता तर हे करू शकला नसता. आता पुढे तुम्ही जेव्हा अभ्यास कराल, तेव्हा विचार करा की, तुम्ही अंतर्वक्र आरशासारखा अभ्यास करत आहात का साध्या सपाट आरशासारखा? जेव्हा तुम्ही अंतर्वक्र आरशाप्रमाणे अभ्यास कराल, तेव्हा तुमची एकाग्रता खूप वाढेल व तुम्हांला खूप मोठे परिणाम मिळतील. नेहमी लक्षात ठेवा. फोकस केला तर खूप बळ मिळतं.