Saturday, June 9, 2012

जाऊया थोडे निसर्गाकडे

आपण निसर्गाच्या एकदम कुशीत जाऊ शकत नाही. सर्वच जणांना दरी- खो-यांमध्ये किंवा रानावनात फिरण्याचा आनंद घेता येऊ शकत नाही. परंतु शहरामध्ये पर्वती गांव सारख्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या परिसरात असूनही अगदी निसर्गाच्या जवळ गेल्यासारखा अनुभव पुण्यातील तळजाई टेकडी परिसरातील वनक्षेत्रात फिरताना नक्की येऊ शकतो...






मन शांत करणारे ठिकाण


जाऊ थोडे निसर्गाकडे



फिरण्यासाठी/ जॉगिंगसाठी उत्तम स्थान

ह्या परिसरात प्रचंड जैवविधता आणि अप्रतिम सृष्टीसौंदर्य आहे.


कोणत्याही ऋतूमधील अप्रतिम निसर्ग

कसे, कधी, का?सकाळी साधारण ५.३० ते ८ आणि संध्याकाळी ५ ते ७.३० हे सुरू असते. पुण्यात पर्वती गावातून पुढे टेकडीचा चढ सुरू होतो. प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे पुण्यात असूनही टेकडीचा पत्ता सांगितला जाईल, अशी अपेक्षा करता येऊ शकते.... टेकडीपर्यंत बस जात नाही; परंतु टेकडीचा चढ हासुद्धा रम्य परिसर आहे आणि कित्येक लोक तो पूर्ण चढ चढून नंतरही टेकडीवर फिरतात. टेकडीवर वनक्षेत्रात फिरण्याच्या कित्येक वाटा आहेत आणि सर्व परिसर अत्यंत नितांतसुंदर, शांत आणि रमणीय आहे. मनसोक्त चालल्यावर तिथेच नाश्त्याची सोयसुद्धा आहे. निसर्गापासून दूर राहणा-यांनाही निसर्गाच्या जवळ नेणारा हा एक सुंदर फेरफटका होऊ शकतो...


ही अप्रतिम प्रकाशचित्रं गिरीशने घेतली आहेत.



No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.