Wednesday, April 28, 2021

Deep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान

सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो.

योगनिद्रा हा ध्यान म्हणजेच deep relaxation चा झोपलेल्या स्थितीमध्ये केला जाणारा प्रकार आहे. योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीर रिलॅक्स होतं व मन शांत होतं. शरीराचे ताण व मानसिक स्ट्रेससाठीही उपयोगी आहे. शक्यतो डोक्याखाली उशी न घेता झोपलेल्या स्थितीमध्ये ३५ मिनिट दिलेल्या सूचना ऐकून सहजपणे करता येणारा हा ध्यान प्रकार आहे. आपल्या सोयीने चटई, सतरंजी किंवा गादीवर झोपून सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा झोपतानाही आपण हे करू शकता. शवासनात आडवे होऊन फक्त सूचनांनुसार स्वतःला रिलॅक्स करत जायचं आहे.  इथून आपल्याला सूचना डाउनलोड करून ऐकता येतील. हे एक music असलेलं guided meditation आहे. https://drive.google.com/file/d/12Ll2_N0IQgXACOMMduHP59VSJQOUQ8ja/view?usp=drivesdk

त्याशिवाय कोणत्याही प्रकारे कंफर्टेबल स्थितीमध्ये बसून करता येणारा ध्यानाचा- deep relaxation चा एक सोपा प्रकारसुद्धा मी घेतला आहे. हे अर्धा तासाचं खोलवरचं रिलॅक्सेशन आहे. इथून म्युझिकसह असलेल्या सूचना डाउनलोड करून ऐकता येतील:
https://drive.google.com/file/d/1VIdQ2AtUMbdkJVdnPyGgg58YyIx0EnX8/view?usp=sharing

अनेक जणांनी ह्या दोन्ही प्रकारांबद्दल फीडबॅक दिला आहे. तणाव, शारीरिक वेदना व अस्वस्थता असतानासुद्धा हे ऐकून बरं वाटलेलं आहे. आणि रिलॅक्स होण्यासाठी मदत झाली आहे. हे ऐकताना आपण शांत होणार असल्यामुळे हे ऐकताना आपला मोबाईलही शांत ठेवावा लागेल. सध्याच्या कठीण काळात खूप उपयोगी राहील. आपल्या जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावं. धन्यवाद.


(योगनिद्रा व ध्यान निवेदक- निरंजन वेलणकर niranjanwelankar@gmail.com, 09422108376 सध्याच्या काळामध्ये अनेक लोकांच्या दु:खावर फुंकर घालणारा आणि मृत्युबद्दल विचारमंथन करणारा माझा लेख- http://niranjan-vichar.blogspot.com/2021/04/blog-post_28.html)

एक मृत्युपत्र


सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून इथे देत आहे.

|| ॐ ||

दि. २७ एप्रिल २०१६

ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता!

तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अगदी सविस्तर आणि मनमोकळेपणाने बोलायचं आहे. तुम्हांला माहितीच आहे की मी किती अबोल आहे! त्यामुळे समोरासमोर बोलताना मला कंठ फुटत नाही. म्हणून लिहून बोलतोय. खूप दिवसांपासून मनात होतं की तुमच्याशी बोलावं. अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी शेअर करायच्या आहेत. आणि तुमच्याशी बोलत असताना मी हे स्वत:शी सुद्धा बोलतोय. स्वत:ला ह्या गोष्टी परत सांगतोय.

मावशी आणि आजी, तुमच्याशी बोलताना जाणवतं की, तुम्ही सध्या स्वत:ला खूप कामात ठेवण्याचा प्रयत्न करता. सतत काही ना काही करता. प्रवचनं ऐकता. मावशीही म्हणते की, मनाला काही उद्योग हवा. मी समजू शकतो. पण त्याबरोबर हेही खरंच की आपण ज्या स्थितीतून जातोय, त्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतोय आणि त्या स्थितीतून बाहेर पडायला खूप वेळ लागेल. किंवा कदाचित आपण पूर्णपणे त्यातून बाहेरही पडू शकणार नाही. मला एक- दोन गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे.

मी बॉसना लिहिलेल्या पत्रातही म्हणालो होतो तेच इथेही म्हणेन. बॉस शरीराच्या रूपाने आपल्यामध्ये नाहीत. पण शरीर काही अंतिम सत्य नाही. शरीर हा एक मुक्काम, शरीर एक तात्पुरता निवारा ना. आणि शरीर व नाम- रूप हे तर अगदी क्षणभंगूर. चेतना त्याहून जास्त महत्त्वाची जी २५ फेब्रुवारी १९५६ च्या आधी अस्तित्वात होती आणि ३१ जानेवारी २०१६ च्या नंतरही अस्तित्वात आहे. Form is temporary, formless existence is permanent. त्यामुळे त्या शरीराचा; त्या मनाचा; त्या नाम- रूपाचा जास्त विचार करणं त्रासदायक तर आहेच पण त्या चेतनेसाठीसुद्धा योग्य नाही. थोडं सविस्तर बोलतो.

आपण समुद्र किनाऱ्यावर उभे आहोत. आपल्याला सूर्य मावळताना दिसतो. हळु हळु सूर्य क्षितिजाखाली बुडतो. आपल्या दृष्टीने सूर्यास्त होतो. पण हा खरोखर सूर्याचा अस्त आहे का, सूर्याचा अंत आहे का? आपल्या नजरेने नक्कीच आहे. पण जर थोडी दृष्टी व्यापक केली; समजा आपण स्वत:ला अंतराळाच्या पातळीवर नेऊन बघितलं तर काय दिसेल? तर कळेल की सूर्याचा अस्त होतच नाही. फक्त आपण ज्या अँगलने बघत होतो, तिथून तो आता दिसत नाहीय. पण तो प्रकाशित आहेच, दुसऱ्या अँगलने दिसतोय. काही दुसरे लोक असतील ज्यांना तो सूर्योदय म्हणून दिसेल. मावशी- आजी तुम्ही इतके प्रवचनं ऐकता, वाचता, मला सांगा जन्म आणि मृत्यु हे एकाच नदीचे दोन किनारे नाहीत का? जन्म होतो तेव्हा कोणाच्या तरी मृत्युनंतरच तो होतो आणि जेव्हा मृत्यु होतो, तेव्हाही ती पुढच्या जन्माची, पुढच्या गतीची नांदीच नसते का? म्हणून त्याचं इतकं दु:ख करायचं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाम- रूपावरची इतकी आसक्ती त्या चेतनेच्या पुढच्या प्रवासात बाधा आणत असते. तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेल की, जन्मलेल्या बाळाला पूर्व जन्माची स्मृती असते. किमान दिड वर्षापर्यंत. आणि मग हळु हळु नव्या जन्मातली नाती व प्रभाव त्याच्यावर असलेला मागच्या जन्माचा प्रभाव पुसून टाकतात. पण जेव्हा मूल बोलायला लागतं, तोपर्यंत ही पूर्वस्मृती काहीशी असते. आणि म्हणून आसक्ती असते. आणि ही आसक्ती त्या चेतनेच्या पुढच्या जन्मामध्ये बाधा निर्माण करू शकते.

Friday, April 23, 2021

जुन्या पिढीतली अभिनेत्री- विम्मी आणि तिची शोकांतिका

आज विमलेश अर्थात् विम्मी ह्या अभिनेत्रीचं नाव फारसं कोणाला आठवणार नाही. पण तिच्यावर चित्रित झालेली काही गाणी अजूनही प्रसिद्ध आहेत. सुनील दत्त आणि राजकुमारसोबतच्या "हमराज़" ह्या चित्रपटामधील तिच्यावर चित्रित झालेली ही गाणी आजही ऐकली- बघितली जातात आणि ह्या गाण्यांमध्ये एक हसरा चेहरा आपल्याला दिसतो.

हे नीले गगन के तले धरती का प्यार पले
ऐसे ही जग में आती हैं सुबहें ऐसे ही शाम ढले
 
तुम अगर साथ देने का वादा करो
मैं यूँही मस्त नग़मे लुटाता रहूं

आणि

किसी पत्थर की मूरत से मुहब्बत का इरादा है
परस्तिश की तमन्ना है, इबादत का इरादा है

पण तिच्या आयुष्यामध्ये ह्या गाण्यातली शेवटची ओळच खरी ठरली- वो क्या जाने की अपना किस क़यामत का इरादा है! अतिशय शोकांतिक तिचं आयुष्य ठरलं. पडद्यावरची एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही तिच्या आयुष्याचा शेवट अतिशय दुर्दैवी झाला. तिचं आयुष्य व तिच्या आयुष्याचा "हमराज़" जाणून घेण्याचा हा छोटा प्रयत्न.

१९४३ मध्ये पंजाबमध्ये एका शीख कुटुंबात तिचा जन्म झाला. पुढे शिवराज अग्रवाल नावाच्या एका उद्योगपतीसोबत तिने लग्न केलं आणि १९६१ मध्ये १८ व्या वर्षीच तिला मुलगा झाला. ह्या मुलाची कहाणीही अतिशय वेगळी आणि तीसुद्धा वेगळ्या प्रकारची शोकांतिका ठरली. शिवराज अग्रवालांच्या पार्ट्या कलकत्त्यामध्ये होत असताना एका पार्टीमध्ये विमलेशची भेट संगीतकार रवींसोबत झाली आणि त्यांनी शिवराज अग्रवाल आणि विमलेशला मुंबईला बोलावलं आणि बी आर चोप्रांसोबत तिची ओळख करून दिली. आणि बी आर चोप्रांच्या बॅनरचा चित्रपट तिला मिळाला! १९६७ साली आलेला "हमराज़" हा तो चित्रपट. ह्या चित्रपटामुळे ती सुप्रसिद्ध झाली आणि नायिका बनली! पदार्पणाच्या मॅचमधल्या शतकासारखी ही गोष्ट होती! परंतु काही‌ बॅटसमन पहिल्या मॅचमध्ये जितके रन्स करतात तितके कधीच पुढे करत नाहीत आणि त्यांना संधीही मिळत नाही. विम्मी म्हणून प्रसिद्ध झालेल्या विमलेशच्या बाबतीत तेच झालं.

Sunday, April 18, 2021

चंद्रमा और मंगल की लुका छुपी

सभी को नमस्ते| सब लोग ठीक होंगे ऐसी आशा करता हूँ| कल १७ अप्रैल की शाम को आकाश में चंद्रमा और मंगल ग्रह की सुन्दर लुका छुपी दिखाई दी| कुछ देर तक मंगल चंद्रमा के पीछे छुप गया था और बाद में बाहर आया| इसे वैज्ञानिक भाषा में occultation- पिधान कहते हैं| यह एक तरह का चंद्रमा ने किया मंगल ग्रह का ग्रहण ही था|

शाम को जब सूरज डूबा तब पहले से ही मंगल चंद्रमा के पीछे जा चुका था| ठीक ७ बज कर २१ मिनट पर वह चंद्रमा के बिम्ब के पीछे से दिखाई देने लगा| मेरी टेलिस्कोप से इस सुन्दर दृश्य के फोटो और विडियोज लेने का अवसर मिला| आँखों से भी यह दृश्य दिखाई दिया| लेकीन चंद्रमा मंगल से अत्यधिक तेजस्वी होने के कारण मंगल खुली आँखों से दिखाई देने के लिए और समय लगा और चंद्रमा से कुछ दूर आने के बाद ही मंगल दिखाई देने लगा| इन फोटोज और विडियोज का जरूर आनन्द लीजिए|



Tuesday, April 6, 2021

आकाशातील आश्चर्य: चंद्र मंगळाला झाकणार!

सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. येत्या १७ एप्रिल २०२१ च्या शनिवारी संध्याकाळी आकाशामध्ये एक आश्चर्य बघायला मिळणार आहे. जेव्हा चंद्र एखाद्या ग्रहाला किंवा ता-याला झाकतो तेव्हा त्याला पिधान असं म्हणतात. १७ एप्रिलच्या संध्याकाळी चंद्र मंगळाला झाकणार आहे आणि नंतर आपल्याला मंगळ चंद्राच्या मागून परत येताना दिसणार आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला चंद्राच्या मागे जाताना मंगळ दिसणार नाही, पण सायंकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी चंद्राच्या मागून तो परत दृग्गोचर होताना दिसेल. पूर्व भारतामध्ये आगरताळासारख्या ठिकाणी मंगळ चंद्राच्या अप्रकाशित भागाच्या आड जातानाही‌ दिसू शकेल. पण महाराष्ट्रामध्ये अंधार पडला असेल तेव्हा मंगळ आधीच चंद्रामुळे झाकला गेलेला असेल.

नुसत्या डोळ्यांनी आणि अगदी सहजपणे ही घटना बघता येईल. आकाशामधील किती तरी गमती नुसत्या डोळ्यांनी बघता येतात. अतिशय दूरवरचे तारे, तारकागुच्छ, आकाशगंगा आणि ग्रहण, पिधान, युती, ता-यांच्या पार्श्वभूमीवर ग्रह व चंद्राची हालचाल अशा गोष्टी नुसत्या डोळ्यांनीही बघता येऊ शकतात.

हे बघण्यासाठी सूर्यास्ताच्या सुमारास पश्चिम आकाश व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी जाऊन थांबावं लागेल. त्या दिवशी सूर्यास्त ६.५३ ला होईल आणि त्यानंतर थोड्या वेळात ७.२१ ला मंगळ चंद्राच्या आडून बाहेर येताना दिसेल. तेव्हा पुरेसा अंधार असेल व त्यामुळे १.५ इतक्या प्रतीचा व मध्यम तेजस्वी असा मंगळ चंद्राच्या आडून आलेला दिसू शकेल. चंद्राची पंचमीची कोर असेल. चंद्र व मंगळ हे वृषभ राशीमध्ये व अग्नी ता-यापासून दक्षिणेला साधारण साडेपाच अंश म्हणजे आपण बघताना हात पूर्ण लांब केल्यास हाताची तीन बोटे मावतील इतक्या अंतरावर असतील. ह्यावेळी आपल्याला मृग नक्षत्र, ब्रह्महृदय तारकासमूह, रोहिणी नक्षत्र, कृत्तिका नक्षत्र, व्याध, पुनर्वसू नक्षत्र, प्रश्वा, सप्तर्षी आदि ठळक तारे व तारकासमूह सहजपणे बघता येतील. ह्या घटनेच्या तांत्रिक तपशीलांसाठी ही वेबसाईट बघता येईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

चंद्राच्या पलीकडून बाहेर येणारा मंगळ