Sunday, September 22, 2024

Daughter's day is Everyday!


They say today is the daughter's day!





My little daughter celebrates it every day! So much joy of small things! Her joy after reading her tenth letter of her tenth birthday celebrated recently! His smiles and her mischievous response to that! Joy of playing with her and also studying! Her red face while I take her study and her getting delighted once she learns things! My learning from her about how to explain small things and also enjoy them! Her energy and charm! Her appreciation and encouragement from her! Her joyful enchanting face! Her writing down such funny things in her diary! When we experience all this, then we are bound to feel that our portion of happiness is everlasting!

Tuesday, September 17, 2024

दहाव्या वाढदिवसाचं पत्र: मस्ती की पाठशाला!

दि. १७ सप्टेंबर २०२४

प्रिय पाबई...

✪ वृक्षतोड, जंगल आणि शफाली वर्मा
✪ रवीन्द्रनाथ टागोर आणि हॅग्रिड
✪ बिच्चारे डोरेमॉन- शक्तीमॉन आणि तो पोकेमॉन
✪ "निनू, मला वाटलं तू सायकल मागून धरली होतीस!!"
✪ अंग्रेज के ज़माने के जेलर आणि “पारोसा”!
✪ गे नेक- एका कबुतराची व न वाचलेल्या पुस्तकाची कहाणी!
✪ एक साधू व त्याच्याभोवती स्तब्ध उभे असलेले अठरा लांडगे
✪ ॲलेक्सची धमाल, शोज, मस्ती आणि देवगड!
✪ तुम चेंदू‌ हो या चँपियन हो?
✪ बुद्धीबळ आणि वेटलिफ्टिंग!
✪ “दादा, तुझं नाव काय रे?”


आज तुझा दहावा वाढदिवस!!! चक्क दहावा! दहा वर्षं! "इतकी मोठी" तू झालीस! अर्थात् तू किती मोठी झाली‌ आहेस हे मला रोजच कळतं. मस्तीमध्ये तू मारामारी करतेस तेव्हा मला आता कधी कधी तुझे फटके जोरात बसतात! तुझ्यातली शक्ती चांगलीच कळते! आणि आता तुला कडेवर घेणं अशक्यप्राय होतंय! आपल्या डबल सीट राईडसही आता जवळ जवळ थांबल्या आहेत. तर वाढदिवसाच्या माझ्या पत्रांमधलं हे दहावं पत्र! तू माझ्याशी कधी कधी कशी भांडतेस, तसं मीसुद्धा तुझ्याशी भांडणार आहे ह्या पत्रातून! तेव्हा तयार राहा.

हे दहावं पत्र लिहीताना आनंद होतोय! दर वर्षीच्या पत्रातून मी त्यावेळच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्या त्या वर्षातल्या गमती! केलेली मजा, मस्ती, आठवणी आणि कधी कधी आजारपणाच्या आठवणीही. ह्या वर्षामध्ये अशा ब-याच गोष्टी झाल्या. हे लिहीताना ते सर्व आठवतंय. आणि त्याबरोबर गेली दहा वर्षंही आठवत आहेत! एवढसं सरपटत एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जाणारं ते बाळ! त्या बाळाची तू आता नक्कल मस्त करतेस! ते बाळ अजिबात ओरडायचं नाही! अजिबात त्रास द्यायचं नाही, मारामारी करायचं नाही! आणि हो, त्या बाळाला छोटसं जंगल होतं. आधी एक छोटं झाड होतं. आणि दोन- अडीच वर्षांपासून छोट्या छोट्या मस्त शेंड्या होत्या. अजून मोठं झाल्यावर तर एक गलेलठ्ठ उंदीर तर कधी दोन सापसुद्धा असायचे! आता त्या जंगलाला, त्या वृक्षांना मी जाम मिस करतो. एके काळी ते इतकं मोठं जंगल असायचं की, त्यात घनदाट झाडीतून जाणारी पायवाट असायची! एक चढाव चढून त्या जंगलात ती वाट जायची. पुढे फिरून मग एक मोठा उतार लागायचा. आणि त्या उतारावरून घसरलं की बरोबर ज्वालामुखी लागायचा! सतत स्फोट करणारा ज्वालामुखी! वृक्षतोड फार वाढलीय, त्यामुळे ते जंगल आता मला आठवणींमध्येच दिसतं आणि तू म्हणतेस तसं इन यूवर ड्रीम्स! ते जंगल नसल्याचा मला भयंकर त्रास ह्या वर्षामध्ये सुरू झाला. ते जंगल परत कधी उगवेल माहित नाही! आणि आता तर तुझं जंगल मिलिटरी कॅडेटसारखं आहे! त्यामुळे ती शफाली वर्मा आठवते सारखी! नाम तो बड़ा हो गया, बाल छोटे रह गए!  


Sunday, September 15, 2024

भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्‍हाडे

✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास
✪ ओळखीच्या चेहर्‍याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय
✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या
✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं!
✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!”
✪ “तुला मनलं होतं‌ ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या!”
✪ “Soak the pressure and be there!”
✪ पुस्तकं‌ व माणसं वाचणारा अवलिया

संकर्षण कर्‍हाडे! बस नाम ही काफी है! घराघरात पोहचलेला चेहरा! कलाकार, नाटककार, अभिनेता, सूत्र संचालक, लेखक आणि कवी! पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे असलेला माणूस म्हणून संकर्षण कसा आहे हे ह्या "व्हायफळ" पॉडकास्टमधून उलगडलं! Why फळ, म्हणजे फळाची चिंता कशाला, असं नावच असलेला हा पॉडकास्ट! इथे संकर्षण अगदी मित्रासोबत बोलावा तसा मनातून बोलतो आणि भेटतो. संकर्षण माझ्या परभणीचाच! गाववाला! आणि वयाने थोडा लहान! म्हणून "तो संकर्षण" असा एकेरी उल्लेख करतोय. त्याचं काम सगळ्यांनाच आवडतं. पण माणूस म्हणून संकर्षण कसा आहे हे माहिती नव्हतं. ते ह्या गप्पांमधून उलगडलं! गप्पा अर्थात् संभाषण, बोलणं व संवाद त्या अर्थाने खूप महत्त्वाचं माध्यम आहे. कृष्णाची गीता हेसुद्धा संभाषणच तर आहे.

ह्या गप्पांची सुरूवात होते संकर्षणच्या लहानपणापासून. त्याचं‌ गाव परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी हे जगाला सांगणारा संकर्षणच! त्याचं आजोळ अंबेजोगाई. तिथला वाडा, तेव्हाच्या घरातल्या रीती व त्याचं परभणीमधलं लहानपण. लहानपणी त्याने केलेल्या "दलिंदर" खोड्या! सायकल चालवताना शनिवार बाजारजवळ लोकांच्या कानाजवळ जाऊन ओरडणार आणि लांब पळून जाणार! आजोबांच्या मित्राला जवळ जाऊन "ए केशव!" अशी हाक मारणारा संकर्षण! तेच मित्र संध्याकाळी घरी आल्यावर खूप घाबरलेला! पण ते काहीच बोलत नाहीत म्हंटल्यावर "केशव दुसर्‍या कामासाठी आला," असं मनात म्हणणारा संकर्षण! प्रशांत दामलेंचा "संक्या" आणि मकरंद अनासपुरेंचा "संकर्शन कराडे!"


Thursday, September 5, 2024

Srikanth Bolla: An eye opener journey of the visually impaired person

 
✪ “I am not helpless, I don't need your mercy, I want equal treatment"
✪ 2% people don't have the eyesight, but 98% don't have the vision
✪ The boy being visually impaired, the father almost buried him
✪ Meeting with the scientist Dr. APJ Abdul Kalam and his help
✪ A teacher showing the way to realize potential
✪ First visually impaired Indian to learn science at the degree level after fighting with the system
✪ Higher education in the U.S.A. and then a businessman providing 80% jobs to the differently abled
✪ Courage to refuse a prestigious award "from the special category"
✪ Know us not for our disability, but for our abilities!

Hello. Yesterday saw recently released Rajkumar Rao starring "Srikanth" movie. Father, being a fan of Krishnammachari Srikanth, names his boy after him. But when he realizes that the boy is visually impaired, then feeling that the is future is dark, the same father decides to bury the boy! But his destiny had different ideas. The visually impaired boy born in a tribal region of Andhra Pradesh in 1991! The parents illiterate. Srikanth was brought up with other children in the village. He also went to the village school for some time. But he had to endure the discrimination done with visually impaired persons and lack of respect for his talent. Even if we just dare to try not to use our eyes for mere five minutes while doing our routine things, we would feel shattered. Even when we know that we have eyes, we cannot bear the darkness for just five minutes. His struggles were much more. Initially Srikanth had to strive through this. But the destiny had planned something different.