✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास
✪ ओळखीच्या चेहर्याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय
✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या
✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं!
✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!”
✪ “तुला मनलं होतं ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या!”
✪ “Soak the pressure and be there!”
✪ पुस्तकं व माणसं वाचणारा अवलिया
संकर्षण कर्हाडे! बस नाम ही काफी है! घराघरात पोहचलेला चेहरा! कलाकार, नाटककार, अभिनेता, सूत्र संचालक, लेखक आणि कवी! पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे असलेला माणूस म्हणून संकर्षण कसा आहे हे ह्या "व्हायफळ" पॉडकास्टमधून उलगडलं! Why फळ, म्हणजे फळाची चिंता कशाला, असं नावच असलेला हा पॉडकास्ट! इथे संकर्षण अगदी मित्रासोबत बोलावा तसा मनातून बोलतो आणि भेटतो. संकर्षण माझ्या परभणीचाच! गाववाला! आणि वयाने थोडा लहान! म्हणून "तो संकर्षण" असा एकेरी उल्लेख करतोय. त्याचं काम सगळ्यांनाच आवडतं. पण माणूस म्हणून संकर्षण कसा आहे हे माहिती नव्हतं. ते ह्या गप्पांमधून उलगडलं! गप्पा अर्थात् संभाषण, बोलणं व संवाद त्या अर्थाने खूप महत्त्वाचं माध्यम आहे. कृष्णाची गीता हेसुद्धा संभाषणच तर आहे.
ह्या गप्पांची सुरूवात होते संकर्षणच्या लहानपणापासून. त्याचं गाव परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी हे जगाला सांगणारा संकर्षणच! त्याचं आजोळ अंबेजोगाई. तिथला वाडा, तेव्हाच्या घरातल्या रीती व त्याचं परभणीमधलं लहानपण. लहानपणी त्याने केलेल्या "दलिंदर" खोड्या! सायकल चालवताना शनिवार बाजारजवळ लोकांच्या कानाजवळ जाऊन ओरडणार आणि लांब पळून जाणार! आजोबांच्या मित्राला जवळ जाऊन "ए केशव!" अशी हाक मारणारा संकर्षण! तेच मित्र संध्याकाळी घरी आल्यावर खूप घाबरलेला! पण ते काहीच बोलत नाहीत म्हंटल्यावर "केशव दुसर्या कामासाठी आला," असं मनात म्हणणारा संकर्षण! प्रशांत दामलेंचा "संक्या" आणि मकरंद अनासपुरेंचा "संकर्शन कराडे!"
Showing posts with label Prashant Damale. Show all posts
Showing posts with label Prashant Damale. Show all posts
Sunday, September 15, 2024
भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्हाडे
Subscribe to:
Comments (Atom)
