Tuesday, September 30, 2025

Water is receding, but...

Hello. In many parts of our country there are floods these days. People have been greatly suffered from this. It is going to take much time to recover rom this. After the climate change with changes in the landscape due to our new lifestyle, such floods are almost inevitable. How much difference the Government, NDRF and relief- organizations will be able to make is a huge question. Now water is receding, but we need to extend our help. I have made a contribution and you can also contribute. You can contribute to any deserving organization or any organization you know about. You can use the attached QR code to contribute to Seva Bharati, Deogiri which is working in central Maharashtra region for relief as well as reconstruction work.



The help may be small, but it shows our connectedness. Along with helping, this is also the time of reflecting and asking questions to ourself. For fitness and finance, it is said that little bit of discomfort is very good. Everything should not be very smooth. Some toiling is necessary. Little bit of discomfort is very comfortable in the long run. The same is true about our lifestyle. We destroyed trees for facilities, constructed and removed open land. We buried small water streams. We also encroached sea. It was the encroachment on the nature. But nature is repeatedly telling us that it can also not contain itself. What belongs to Nature will be reclaimed by Nature. Therefore it is the time to wake up and be aware. We need to anticipate it and plan accordingly and also correct our lifestyle. 

Thank you. Can share with near ones. -Niranjan Welankar 09422108376. 30 September 2025.

 

पूर ओसरतोय, पण...

नमस्कार. महाराष्ट्रातल्या कित्येक जिल्ह्यांमध्ये आत्ता पूरस्थिती आहे. अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, संभाजीनगर आणि इतरही ठिकाणी. शेतक-यांसह सर्व जनतेचे हाल झाले आहेत. अद्यापही पुराचं सावट आहे. लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामधून सावरायला व पुन: उभं राहायला वेळ लागणार आहे. बदलत्या हवामानामध्ये व जीवनशैलीने भूप्रदेशामध्ये झालेल्या बदलांमुळे असे पूर व अशा आपत्ती वारंवार येणार आहेत. त्यासाठी सरकार, मदतकार्य करणार्‍या संस्था किंवा अगदी एनडीआरएफसुद्धा किती पुरेसे पडेल हा प्रश्न आहे. म्हणून एक संवेदनशील नागरिक म्हणून आपणही आपला सहभाग त्यात घेतला पाहिजे. पाण्याचा ओघ हळु हळु जातोय तसा सोबत देण्याचा व मदतीचा ओघ आपण वाढवला पाहिजे. त्यासाठी मी माझ्या बाजूने योगदान दिलं आहे. आपणही देऊ‌ शकता. आपल्याला योग्य वाटेल त्या किंवा आपल्या परिचयातल्या संस्थेसाठी आपण हे योगदान देऊ शकता. सोबतचा क्युआर कोड वापरून सेवा भारती, देवगिरी संस्थेला मदत करता येईल. तातडीची मदत आणि पुन: उभे राहण्यासाठीची मदत अशा दोन्ही प्रकारे संस्थेचं काम सुरू आहे.

अशी मदत छोटी असली तरी आपण सगळे जोडलेलो आहोत, एकमेकांचे आप्त आहोत हा भाव त्यात असतो. मदत करण्याबरोबरच ही वेळ स्वत:ला प्रश्न करण्याची आहे. फिटनेस व वित्ताच्या बाबतीत म्हणतात की, थोडा त्रास हा चांगला असतो. सगळंच अगदी आरामशीर नको. थोडे कष्ट हवेतच. Little bit of discomfort is very comfortable in the long run. तेच राहणीमानाच्या बाबतीतही आहे. आपण सोयीसाठी झाडं तोडले. मोकळी जमीन बांधकामाने भरून टाकली. छोटे नाले- नद्या बुजवल्या. कुठे तर समुद्रही मागे ढकलला. हे निसर्गावर आपण अतिक्रमण केलं. पण निसर्ग हे इशारे देऊन सांगतोय की, तोसुद्धा स्वत:ला रोखू शकत नाही. जे त्याचं आहे आणि आपण घेतलेलं आहे, ते तो परत "रिक्लेम" करणार. त्यामुळे ही वेळ जागरूक होण्याची व सावध होण्याची आहे.  भविष्यात हे होणार हे गृहित धरून नियोजन करण्याची आणि जीवनशैलीत तसे बदल करण्याचीही आहे. 

धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376. 30 सप्टेंबर 2025. 

 

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.