Wednesday, October 8, 2025

Thrill of observing Comet C/2025 A6 (Lemmon)

Great exhibition of Nature in Anjanvel!
✪ Currently two comets can be observed through a small telescope
✪ Comet C/2025 A6 (Lemmon)- A guest arrived after 1396 years!
✪ Finally the sky is clear and how!
✪ Cloud, rain and then rain of dew in Ajnanvel
✪ Roar of water stream in silent night, clear sky and stars a plenty
✪ Mountains relaxing under the blanket of fog
✪ Blooming of glorious flowers and Sahyadri's magic
✪ Comet observation session and winter camps for children in Anjanvel, Maval

Hello. Currently, two comets can be observed through a small telescope: C/2025 R2 (SWAN) and C/2025 A6 (Lemmon). C/2025 R2 (SWAN) was found accidentally when it had come near the Sun. Now the sky is mostly clear as the monsoon is almost over.  These two comets can also be observed from city if the sky conditions are good. But my best and affectionate location for sky watching is Anjanvel near Lonavala! Yesterday I went there with my friend Gireesh Mandhale. We had taken two telescopes and one binacular with us. On the route, we witnessed some colossal mountain ranges of Sahyadri! Wonderful landscape near Hadashi lake. But there are clouds. And later on its is actually raining! Tikona fort is hidden behind the clouds! How about the sky watching, the question arises. 



 

 



We enjoyed mountain ranges and curvy roads! Blue water of Pawana dam backwater! Cloudsa  are there everywhere, but somewhere there is also blue sky! We reached Anjanvel. As it is a week- day, it is very silent and cozy. It is slightly chilly. The water stream roaring in Anjanvel campus! It soothes us. We spent some moments with the nature. Rahulji from Anjanvel, my friend Manoj Borse, Gireesh and others- we all had good conversation. Suddenly it started raining heavily! Now, the evening comet C/2025 R2 (SWAN) is out of question! At least we should get to observe other objects. But patience, we must have. For some time, electricity went off. Rain, darkness and roar of the stream! Mesmerizing moment.

We had a great dinner with friends. Finally the rain ceased. And now there is clear sky at some positions! Soon we have a good clear sky. Stars are popping up. The first session began and it belonged to the Moon and Saturn. Titan, Rhea and other two moons of Saturn were visible in Gireesh's 8 inch telescope. The rings appear straight like a line these days! Despite of vicinity of Moonlight, my 4.5 inch telescope showed Titan. Then we observed Albireo, 61 Cygnus (The star through which the parallax method of measuring star distance started), Zeta and Delta Lyrae binary stars near Vega. Wow! The sky is crystal clear! We also observed Andromeda galaxy under the blanket of Moonlight. We also observed Eta Cassiopeia binary star. Thus the first meeting with the dear ones started after the rainy season! And when the "near ones" are there, time flies quicky!

We decided to wake up at 4 am for the second comet and started to wind up. But we could not stop and continued. Pleiades cluster, Perseus double cluster and M- 34 clusters were the last objects observed. Now it is dew time! We captured photos of stars shining despite of Moonlight. We finally went to bed at 11:30. Now it is raining dew and its thudding is audible!


 

Gireesh's telescope and photo of the comet.


 

We woke up on time. We knew "how glorious" dawn sky is at Anjanvel" and we hurried to the telescope. It is chilling cold. The Moon has gone to the West. Jupiter is shining brightly near Castor- Pollux! Also Sirius and Canopus! Orion has inclined towards South- West. Cassiopeia also has inclined towards West. Bright Capella in Auriga. And Pleiades and Aldebaran. Zeta Taurii star near Aldebaran is clearly visible. Now, the first priority is finding the Comet C/2025 A6 (Lemmon)! Its brightness is 5.7 and it is near Tania Australis star in Ursa Major. I started finding it with bright and then faint stars. Its altitude in the sky is around 20 degrees from the horizon. It is not seen in the first attempt. Continued searching it through the binoculars and the 4.5 inch telescope. It must be having some extinction due to low altitude. 

Gireesh set up his 8 inch telescope and shortly he found it! Great! The comet is just like a patch of cotton! A piece of clouds. Just like Andromeda Galaxy we observed Yesterday. Faint, but clear. And then I also observed it through my telescope and the binocular also! We enjoyed watching it. After all, it is the guest arrived after 1396 years! 



Both these comets are mostly visible for next 15 days through a small telescope. Their position and visibility timing will keep on changing and it can be checked on sky- watching sites. Gireesh also took a photo of the comet. Slowly it is getting close to the Sunrise. We observed Jupiter and its four moons. Two of the moons were just close to it. We also met old friends- Pleiades, Orion nebula, Beehive cluster and M- 41 near Sirius. There are some newcomers also appearing in between. Despite of the Moon, the sky is excellent. It has plenty of dew now. We observed Winter Albiero binary star- 145 Canis Majoris. Then the bright Venus popped up. Currently it is on the far side behind the Sun and it is almost 93% illuminated. We observed its bright disk. We finally observed the Moon. Gireesh took some beautiful snaps. Slowly, the session had to conclude.

Experience of sky watching and even staying in Anjanvel is unique. Sahyadri mountain in the Monsoon and greenery! The roar of the stream deepens the peace. It just reminds us about Himalayan mountain rivers! We enjoyed the campus when it was daylight. Serene peace and calmness. While returning also, we saw mountains under the cap of fog. Beautiful ghat roads, flower blooming and mountains! In just one night, we had this all- heavy rain, crystal clear sky and then the rain of dew! In coming days, comet watching sessions will take place at Anjanvel. Also, there will be winter camps for children at Anjanvel between 27 to 29 October and 3 to 5 November (2 days 3 nights). There also I will conduct sky watching, fun- learn activities, activities related to science and maths and also I will conduct trekking and Yoga nidra meditation sessions. You can contact me for more information about the camps and about the comet observation sessions.

Thank you. You can share with your near ones. -Niranjan Welankar 09422108376. Date of writing: 8 October 2025.

 

अंजनवेलमधील निसर्गाचे नयनरम्य अविष्कार! 

धूमकेतू C/2025 A6 (Lemmon) बघण्याचा रोमांच

✪ दोन धूमकेतू सध्या छोट्या टेलिस्कोपने बघता येतात
✪ धूमकेतू C/2025 A6 (Lemmon)- १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा!
✪ सब्र का फल मिठा- अखेर झाले मोकळे आकाश!
✪ अंजनवेलमधला निसर्ग- ढग, पाऊस आणि दवाचा पाऊस
✪ निरव शांततेत ओढ्याची कोसळधार, नितळ आकाश आणि तारेच तारे
✪ सितारों की महफील में कर के इशारा
✪ धुक्याच्या दुलईत पहुडलेले पर्वत
✪ विविधरंगी फुलांचा बहर आणि सह्याद्रीची श्रीमंती
✪ अंजनवेलमध्ये धूमकेतू निरीक्षण सत्र आणि मुलांसाठी हिवाळी शिबिर


नमस्कार. सध्या आकाशामध्ये C/2025 R2 (SWAN) आणि C/2025 A6 (Lemmon) हे दोन धूमकेतू छोट्या टेलिस्कोपने बघता येण्यासारखे आहेत. सूर्याला वळसा घालून परत जाताना अगदी अचानक शोधला गेलेला स्वॅन आणि हा लेमन. पावसाळ्याचा शेवट जवळ आल्यावर आकाश काहीसं मोकळं झालं आहे.  पुण्यातूनही हे दोन्ही धुमकेतू आकाश चांगलं असेल तर दिसू शकतात. पण आकाश बघण्यासाठीचं उत्तम आणि आपुलकीचं ठिकाण म्हणजे मावळमधलं अंजनवेल! काल माझ्या मित्रासोबत- गिरीश मांधळे- दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलर घेऊन तिथे जायला निघालो. शाळा- कॉलेजच्या दिवसांमधली गाणी आणि शहर मागे पडल्यावर सुरू होणारा सह्याद्री! हिंजवडी- घोटावडे- कोळवण- जवन मार्गे अंजनवेल. वाटेतल्या हडशी तळ्यावरून दिसणारं रमणीय दृश्य! पर्वतांची हिरवी रांग! पण आज ढग आहेत. पुढे तर चक्क पाऊस पडतोय. तिकोना किल्ला ढगांमागे लपला आहे! आजच्या आकाश दर्शनाचं कसं होणार हा प्रश्न पडतोय. 

सगळीकडे पर्वतरांगा आणि नागमोडी रस्ता! पवना जलाशयाचं निळं पाणी! ढगांचं आक्रमण पण कुठे कुठे निळाई! अंजनवेलमध्ये पोहचलो. आठवड्याच्या मधला दिवस असल्यामुळे अतिशय रम्य शांतता आहे. हलकीशी थंडी आहे. अंजनवेल परिसरातला ओढा! त्याची गर्जना अंतर्मुख करतेय. काही क्षण तिथल्या निसर्गासोबत घालवले. अंजनवेलचे राहुलजी, मनोजजी बोरसे, गिरीश व इतर जणांसोबत गप्पा झाल्या. थोड्या वेळाने मोठा पाऊसच सुरू झाला! संध्याकाळी दिसणारा पहिला धुमकेतू C/2025 R2 (SWAN) तर गेला! बाकी बॉजेक्टस तरी बघायला मिळावेत. पण मन सांगतंय, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! काही क्षण दिवे गेले तेव्हाचा घनघोर अंधार, पाऊस, झर्‍याची कोसळधार! अंतर्मुख करणारा अनुभव.

गप्पांसोबतच आपुलकीचं जेवण पार पडलं. आणि अखेर पाऊस थांबला! आणि चक्क कुठे कुठे मोकळं आकाश दिसतं आहे. थोड्याच वेळात बर्‍यापैकी आकाश मोकळं झालं आणि सुरू झाली तार्‍यांची मांदियाळी. पहिलं सत्र गाजवलं चंद्र आणि शनिने. शनिचे टायटन, रिया व इतर दोन उपग्रह गिरीशच्या ८ इंची दुर्बिणीतून दिसले. सध्या अर्थातच एका रेषेसारखी दिसणारी कडी! चंद्रप्रकाश जवळ असूनही माझ्या ४.५ इंची दुर्बिणीतूनही टायटन दिसू शकला. नंतर अल्बिरो, ६१ सिग्नाय (ज्या तार्‍यामुळे पॅरालॅक्स पद्धतीने तार्‍यांचं अंतर मोजण्याची सुरूवात झाली तो तारा), अभिजीतजवळचे झीटा व डेल्टा लायरे जोडतारे बघितले. आणि आकाश किती म्हणजे किती मोकळं झालंय हे कळालं! चंद्रप्रकाशाची चादर पांघरलेली देवयानी आकाशगंगा म्हणजे एंड्रोमिडा गॅलक्सीही दिसली. ईटा शर्मिष्ठा जोडताराही बघितला. पावसाळ्यानंतरच्या ह्या आप्तांशी पहिली भेट सुरू झाली! "जवळची" मंडळी भेटली म्हणजे वेळ कसा जातो कळत नाही! त्यातच मित्रांची सोबत आणि गप्पा. 

पहाटे ४ वाजता उठून दुसरा धुमकेतू बघायचा असं ठरवून आवराआवर करायला सुरूवात केली. तरीही मोह आवरत नसल्यामुळे आकाश दर्शन सुरू राहिलं. आकाशातील सप्त माता- कृत्तिका तारकागुच्छ, पर्सियस डबल क्लस्टर व एम- ३४ क्लस्टर बघितले. दव सुरू झालं! चंद्र प्रकाश असूनही तळपणार्‍या तार्‍यांचे फोटो घेतले. आणि अखेरीस पहाटे ४ ला उठायचं ठरवून रात्री ११:३० ला निद्रेला शरण जायचा निर्णय घेतला. दवाचा पाऊस सुरू झाला आहे आणि छतावर टप टप आवाज येतोय!
 
पहाटे वेळेवर जाग आली. अंजनवेलमध्ये पहाटेचं आकाश "कसं आणि काय" असतं चांगलं माहिती असल्यामुळे लगेच तयार झालो! कडक थंडी! चंद्र पश्चिमेला कलला आहे! पुनर्वसू व प्रश्वाच्या मध्ये अर्थात् स्वर्गद्वारात पोहचलेला गुरू तेजाने तळपतोय! तिकडे व्याध आणि अगस्त्य! मृगही पश्चिमेकडे कललंय. शर्मिष्ठा मावळतीकडे झुकल्या आहेत आणि तेजस्वी ब्रह्महृदय- सारथीचा पंचकोन! आणि अर्थातच कृत्तिका- रोहिणी! रोहिणीतला झीटा टाउरी जोडतारा डोळ्यांनी छान दिसतोय. पण आता पहिले धुमकेतू C/2025 A6 (Lemmon) चा शोध! सप्तर्षी तारकासमूहामध्ये हा ५.७ तेजस्वितेचा धूमकेतू तानिया ऑस्ट्रेलिस तार्‍याच्या जवळ आहे. ठळक आणि अंधुक तार्‍यांच्या मदतीने त्याचा माग काढायला सुरूवात केली. त्याची क्षितिजापासूनची उंची साधारण २० अंश आहे. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात तो दिसला नाही. बायनॅक्युलर आणि साडेचार इंची टेलिस्कोपने शोध सुरू ठेवला. पण अजून क्षितिजापासून जास्त उंचीवर नसल्यामुळे त्याचं तेज थोडं कमी आहे. 

गिरीशने त्याचा ८ इंची टेलिस्कोप सेट केला आणि थोड्याच वेळात त्याला तो धुमकेतू सापडला! व्वा! कापसाचा जणू पुंजका! ढगाचा जणू तुकडा! काल देवयानी आकाशगंगा दिसली तिच्याच सारखा! अंधुक पण स्पष्ट दिसतोय. आणि लगेच माझ्या टेलिस्कोपमधूनही तो दिसला. बायनॅक्युलरमधूनही दिसला! व्वा! मनसोक्त त्याचं निरीक्षण केलं! शेवटी १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा ना तो! 

हे दोन्ही धुमकेतू पुढचे साधारण १५ दिवस तरी छोट्या दुर्बिणीतून दिसू शकतील. त्यांचं स्थान व दिसण्याची वेळ बदलत राहील व आकाश दर्शनाच्या साईटवर बघता येईल. धुमकेतूचं निरीक्षण करून झाल्यावर गिरीशने त्याचा मोठ्या दुर्बिणीतून फोटोसुद्धा घेतला. हळु हळु झुंजूमुंजू सुरू झालं! धुमकेतूनंतर गुरूचं दर्शन घेतलं! गुरू आणि त्याचे चार उपग्रह. दोन उपग्रह त्याला अगदी चिकटून दिसले. कृत्तिका, मृगातला तेजोमेघ, बीहाईव्ह क्लस्टर, व्याधाजवळ एम- ४१ तारकागुच्छ असे नेहमीचे आप्तही भेटले. त्यांना भेटताना मध्ये मध्ये भुरटे अतिथीसुद्धा येत आहेत! चंद्र प्रकाश असूनही आकाश किती स्वच्छ आहे! आणि तितकंच दव पडतं आहे! विंटर अल्बिरो अर्थात् १४५ कॅनिस मेजर जोडतारा बघितला. फटफटायला लागलं आणि तेजस्वी शुक्र दिसला. तो सध्या सूर्याच्या पलीकडे आहे व जवळ जवळ ९३% प्रकाशित आहे. त्याचं तेजस्वी गोल बिंब दिसलं. शेवटी परत एकदा चंद्राचं निरीक्षण केलं. गिरीशने काही सुंदर फोटोज घेतले. आणि हळु हळु पहाटेचं सत्र आटोपतं घेतलं.

अंजनवेलमध्ये आकाश दर्शन किंवा राहण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. पावसाळ्यातला सह्याद्री आणि हिरवाई! शांततेला आणखी गहन करणारी ओढ्याची गर्जना. हिमालयातल्या पहाडी नदीचीच आठवण व्हावी अशी गर्जना! दिवस उजाडल्यावर अंजनवेल परिसरातील निसर्गाचा आनंद घेतला. गहन शांतता आणि आल्हाद. परतीच्या वाटेवरही धुक्याच्या अवगुंठनातले डोंगर दिसले. सुंदर घाट रस्ता आणि फुलांचा बहर! एकाच रात्रीत ढग, मुसळधार पाऊस, निरभ्र आकाश आणि दवाचा पाऊस असा निसर्गाचा अविष्कार बघायला मिळाला! अंजनवेलमध्ये येत्या काही दिवसांमध्ये धुमकेतू निरीक्षण सत्र होणार आहे. त्याशिवाय अंजनवेलमध्ये २७ ते २९ ऑक्टोबर आणि ३ ते ५ नोव्हेंबर असे मुलांसाठी दोन शिबिर होणार आहेत (२ दिवस ३ रात्री). तिथेही मी आकाश दर्शन, मुलांचे फन- लर्न उपक्रम, विज्ञान व गणितातील गमती, ट्रेकिंग, योगनिद्रा अशी सत्रं घेणार आहे. त्याबद्दल आणि धुमकेतू निरीक्षणाच्या सत्राबद्दल माहिती हवी असेल तर संपर्क करू शकता.

धन्यवाद. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक ८ ऑक्टोबर २०२५.

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.