✪ नागपूरमध्ये विशेष मुलांसोबत भेट
✪ विशेष मुलांसोबत चालू असलेल्या कामाची ओळख
✪ स्वमग्न मुले की स्वमग्न आपल्या सगळ्यांचा समाज?
✪ ये शाम मस्तानी!
✪ मळभ हटताना
✪ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे
✪ गरज फक्त सोबत देण्याची
सर्वांना नमस्कार. नुकताच २ जून २०२२ रोजी नागपूरमध्ये एक सुंदर अनुभव घेता आला. तो अनुभव व त्यासंदर्भात मनात आलेले विचार आपण सर्वांसोबत शेअर करावेसे वाटले. नागपूरमध्ये विशेष मुलांना भेटण्याचा योग आला. काही कामामुळे नागपूरला जाण्य़ाचा योग आला व तिथल्या परिचितांची भेट घेण्याचं ठरवलं. मनमंदिर नेटवर्कमुळे जोडल्या गेलेल्या मंडळींना भेटायची उत्सुकता होती. त्यांनीही आनंदाने तयारी दर्शवली व आठ- दहा जण भेटण्याचं ठरलं. ह्या मंडळींमध्ये आकांक्षाताई देशपांडे होत्या, त्या ऑटीझम म्हणजे स्वमग्नता असलेल्या व डाउन्स सिंड्रोम असलेल्या मुलांसोबत काम करतात हे ऐकलं होतं. तेव्हा मनात विचार आला की, नुसतं भेटण्याच्या ऐवजी ह्या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का? मी मुलांसाठी जे फन- लर्न सेशन घेतो ते ह्या मुलांसाठी घेता येईल का असा विचार केला. आणि मी नागपूरमध्ये असण्याच्या दिवशी जूनमधलं ढगाळ वातावरण असलं तरी टेलिस्कोपमधून चंद्र बघता येईल, इतकं आकाश असेल, हेही लक्षात आलं. पण असं सेशन हे विशेष मुलांसोबत घेता येईल का, मनामध्ये शंका होती. हे नागपूरच्या डॉ. सीमाताईंना विचारलं व त्यांनी आकांक्षाताईंना विचारलं. आकांक्षाताईंसोबत मग पुढे बोलणं होत गेलं आणि एक एक गोष्ट ठरत गेली. फन- लर्नमधल्या सोप्या एक्टिव्हिटीज ही मुलं करू शकतील आणि टेलिस्कोपमधून चंद्रही बघू शकतील, असं ताईंनी सांगितलं. आनंदही झाला आणि खूप धाकधुकही वाटली की, ते मुलं तर करू शकतील, पण मला ते कंडक्ट करणं जमेल ना!
Showing posts with label ऑटीझम. Show all posts
Showing posts with label ऑटीझम. Show all posts
Wednesday, November 23, 2022
... अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे!
Subscribe to:
Posts (Atom)