Experiment 49. Making a lens from water
This experiment is told to me by my niece Aatmaja. For this, you will need a paperclip, a small pot (katori), any oil bottle, a spoon, a soap bottle, newspaper and clothe piece. Straighten the paperclip and bend it like "P or Hindi 9." Cover the bent paperclip with little oil. Don't let the oil dry. Do it quickly. Take the pot/ container and pour some soap in it. Add two drops of oil into it and stir it with the spoon. Now dip the bent paperclip in the mixture. There will be a thin lens of water in the bent "P" shape. Now by using this "P shape" let's read some paper or newspaper. Get it close to your eyes. If the lens does not stay on the paperclip for long, spread some more oil and dip it into the mixture again.
Activity 49. One more property of water!
You can even use water drop as a mini lens. Get some laminated page or put transparent plastic on some page. Now add a small drop of water on the text. If the drop is proper round shape, then it will surely zoom the text! It is a mini lens only! Due to its shape lens focus light rays and gives a magnified image. You know how to form bubbles. When air gets inside soap liquid, bubbles are formed. Check, can you use the bubbles also as lens.
प्रयोग 49. पाण्यापासून बनवलेले भिंग (लेन्स)
माझी पुतणी आत्मजाने हा प्रयोग मला सांगितला आहे. हे करण्यासाठी तुम्हांला एक पेपरक्लिप, एक छोटी वाटी, कोणतीही तेलाची बाटली, एक चमचा, एक साबणाची बाटली, वृत्तपत्र व जुनं फडकं लागेल. पेपरक्लिप ओढून सरळ करा व तिला वाकवा आणि “P किंवा ९” सारखा आकार बनवा. वाकवलेल्या पेपरक्लिपवर थोडे तेल टाका. तेल सुकू देऊ नका. लगेचच पुढची कृती करा. वाटी घ्या व त्यामध्ये थोडा साबण टाका. त्यामध्ये तेलाचे दोन थेंब टाका व चमचा वापरून ढवळा. आता त्या मिश्रणामध्ये ती पेपरक्लिप बुडवा. वाकवलेल्या क्लिपच्या “P किंवा ९” आकारामध्ये एक पातळ भिंग तयार होईल. हा “P किंवा ९” आकार वापरून आपण वृत्तपत्राचा मजकूर वाचूया. पेपरक्लिप तुमच्या डोळ्यांच्या जवळ धरून बघा. जर पेपरक्लिपवर भिंग (तेल साबणाचे मिश्रण) चिकटून राहिले नाही, तर आणखी तेल टाका व ते परत मिश्रणात ढवळा.
गंमत 49. पाण्याचा आणखी एक गुणधर्म!
पाण्याचा थेंब वापरूनही तुम्ही एक छोटं भिंग (लेन्स) बनवू शकता. लॅमिनेट केलेला पेपर घ्या किंवा एखाद्या पानावर पारदर्शक प्लास्टीक ठेवा. आता मजकुरावर पाण्याचा एक थेंब येईल असा प्लास्टीकवर किंवा लॅमिनेट केलेल्या कागदावर ठेवा. जर थेंब बरोबर गोलाकार असेल, तर तो नक्कीच मजकूर मोठा (झूम) करेल! हे एक छोटं भिंगच आहे! त्याच्या गोलाकारामुळे भिंगामधून प्रकाश किरण एका बिंदूवर आणले जातात व मोठी केलेली प्रतिमा मिळते. तुम्हांला साबणाच्या पाण्यामध्ये हवा भरून बुडबुडे बनवता येतात. तर अशा बुडबुड्यांचंही भिंग बनतं का, हे जरा तपासून बघा.
Wednesday, June 18, 2025
Fun and experiment no. 49
Monday, June 16, 2025
Fun and experiment no. 47
Experiment 47. Balloon and chits
Take any old newspaper or any used paper. Make small pieces or chits. Now inflate a balloon. Tie it properly. Rub it to a napkin or blanket for 5 minutes. Now bring the balloon near the chits and the chits will be attracted to the balloon and they will stick to it! This happens due to static electricity.
Activity 47. Who gets maximum chocklets?
You and your friends will play this simple game. If you have date of birth as 1st (1 May for example), then you are supposed to get one chocklet. If your friend has date of birth as 2nd (2 April for example), then he or she will get two chocklets. If someone has 3, then he will get 4 chocklets. If someone has 4, then he or she will get 8 chocklets. That means for every day, you will double the number. This way-
1- 1
2- 2
3- 4
4- 8
5- 16
6- 32
Now check with yourself and your friends! Who will get the maximum number of chocklets? Who will be the most lucky and the most unlucky?
प्रयोग 47. फुगा आणि चिठ्ठ्या
कोणताही रद्दी किंवा वापरलेला कागद घ्या. त्यापासून छोटे तुकडे किंवा बारीक चिठ्ठ्या बनवा. एक फुगा फुगवा. तो योग्य प्रकारे बांधा. तो काही वेळ एका नॅपकीनसोबत घासा. आता फुगा त्या कागदी तुकड्यांजवळ आणा. ते तुकडे फुग्याकडे ओढले जातील व त्याला चिकटतील! हे स्थितीज विद्युतमुळे होतं.
गंमत 47. सगळ्यांत जास्त चॉकलेटस कोणाला मिळणार?
तुम्ही व तुमचे मित्र मिळून हा खेळ खेळा. समजा तुमचा वाढदिवस एक तारखेला आहे, तर तुम्हांला एक चॉकलेट मिळेल. जर दुस-याचा वाढदिवस दोन तारखेला असेल, तर त्याला दोन चॉकलेटस मिळतील. कोणाचा वाढदिवस जर तीन असेल तर तिला चार चॉकलेटस मिळतील. कोणाचा चार असेल, तर तिला आठ चॉकलेटस मिळतील. म्हणजे दररोज आधीच्या दिवसापेक्षा दुप्पट चॉकलेटस मिळतील. अशा प्रकारे-
1- 1
2- 2
3- 4
4- 8
5- 16
6- 32
तुमच्या वाढदिवसाला व तुमच्या मित्रांच्या वाढदिवसाला किती चॉकलेटस मिळतील ह्याचा विचार करा! कोण सगळ्यांत जास्त लकी असेल व कोण अनलकी असेल?
Tuesday, June 10, 2025
Fun and experiment no. 41
Experiment 41. Make your own wind mill!
Wind mill, turbines or our own fans. They function on the same principle and same structure. They have three spades and air moves them and then they start rotating. Now we will make our own wind mill from paper. You need just a paper for this. Cut three pieces of papers with the size of 2 cm by 10 cm. They will be rectangular strips. Fold all of them. Now insert one folded strip into another. Put it at around half way. Now insert the third strip firstly in the second strip and then in the first strip. This is actually difficult to tell but simple to do. Many of your elders know this. Take their help. Within a minute your wind mill is ready. Of course, if you don’t get the trick of mingling them right, you may toil, like I had! But once the wind mill (चकरी) is ready, you can enjoy it. You can hold it on top of a pencil or pen and put below a moving fan. It will rotate fast. You can also throw it from some height and it will slowly fall and rotate beautifully. In fact, you can place it on a stick and burn a candle below it. Due to hot air, it will automatically start rotating. It can also be used to know direction of the wind. Do and enjoy.
Activity 41. Task for a minute!
This is task just for a minute. Only 60 seconds. Can you do it? Try. For this, you need to have wall- clocks with second- hand and minute- hand. Find one such clock. What you will do is just watch the second- hand for all 60 seconds. Yes, for entire the minute, just observe the second hand as it moves. Nothing else. This looks simple, but this is very difficult. Our mind cannot stay at one point for long. Within a few seconds, it flies! Try. Alternately, you can also do the same activity with a tap. Put one bucket under the tap and open it just a bit so that one drop comes after one second or so. Now keep on observing the drops. Don’t allow your mind to move. These simple activities are actually meditation techniques! Even elders can do it and benefit from it. It helps for focus of the mind.
प्रयोग 41. पवनचक्की तयार करा!
पवनचक्की, टर्बाईन्स किंवा आपला पंखा. ते सारख्याच तत्त्वाने व संरचनेसह काम करतात. त्यांना तीन पाते असतात व हवा त्यांना हलवते व ते फिरू लागतात. आता आपण कागदापासून पवनचक्की तयार करू. तिला भिंगरी किंवा चकरी असंही म्हणतात. त्यासाठी फक्त कागद लागेल. 2 सेंबी बाय 10 सेंमी आकाराच्या तीन पट्ट्या कापा. त्या आयताकार पट्ट्या असतील. त्यांना दुमडा (फोल्ड करा). दुमडलेली एक पट्टी आता दुस-या पट्टीच्या आत सरकवा व साधारण अर्ध्या अंतरावर ठेवा. आता तिसरी पट्टी पहिले दुस-या पट्टीत व नंतर पहिल्या पट्टीत सरकवा. हे करायला सोपं पण सांगायला अवघड आहे. मोठ्यांना हे येत असेल. त्यांची मदत घ्या. एका मिनिटात तुमची भिंगरी तयार होईल. अर्थात् जर कुठे त्या एकमेकांमध्ये गुंफायच्या हे नाही कळालं तर अवघड जाऊ शकतं. जसं माझं झालं होतं! पण ती होते तयार. आणि मग ती पेन्सिल किंवा पेनच्या टोकावर उचला आणि पंख्याच्या खाली धरा! ती खूप सुंदर फिरते! तुम्ही ती उंचावरून खाली सोडली, तर ती हळु गोल फिरत खाली पडते! तुम्ही ती एका काठीवर ठेवून खाली मेणबत्ती पेटवलीत तर ती उष्ण हवेमुळे फिरू लागेल. वा-याची दिशा जाणून घेण्यासाठीही ती वापरता येऊ शकते. करा व आनंद घ्या.
गंमत 41. फक्त एक मिनिटाचं काम!
हे अगदी एका मिनिटाचं काम आहे. फक्त 60 सेकंद! तुम्ही कराल का? हे करून पाहा. त्यासाठी फक्त एक असं घड्याळ हवं ज्यावर मिनिट काटा व सेकंद काटा आहे. असं घड्याळ शोधा. तुम्हांला इतकंच करायचं आहे की, सेकंद काट्याकडे 60 सेकंद लक्ष द्यायचं आहे. पूर्ण मिनिटभर फक्त हेच करायचं आहे. हलत असलेला सेकंद काटा पाहायचा! बाकी काही नाही. हे सोपं वाटतं, पण खूप अवघड आहे. आपलं मन एका जागी इतका वेळ राहूच शकत नाही. काही सेकंदांमध्येच ते दुसरीकडे जातं! प्रयत्न करून पाहा. त्यासारखीच गंमत म्हणजे तुम्ही नळातून टपकणारं पाणीही बघू शकता. एका नळाखाली एक बादली ठेवा. आणि नळ किंचित उघडून एक एक थेंब एक सेकंदाला पडेल असं करा. आता प्रत्येक थेंबाचं निरीक्षण करा. मनाला इकडे तिकडे जाऊ देऊ नका. ह्या सोप्या गमती वस्तुत: ध्यानाच्या टेक्निक्स आहेत! मोठेही हे करून बघू शकतात व त्याचा उपयोग करू शकता. मन एकाग्र होण्यासाठी ते उपयोगी आहे.
Wednesday, May 28, 2025
Fun and experiment no. 28
Experiment 28. Play of light and darkness
This is very simple. Find one such room that is closed and light does not enter it from anywhere. Open one window of that room in such a way that Sunlight should enter the room. Through the opening of the window, light should come only at a specific area. Observe what you see there. If in a dark room, there is a small lit space, then we observe dust particles there. Actually dust particles are everyhere. But they cannot be observed in light as they need contrasting background. They are also not visible in complete darkness. That's why they need both light as well as dark background to be visible. Dust particles reflect light, but we need a dark contrast to see that! And remember, we don't see anything, we actually see the LIGHT reflecting from it!
Activity 28. Have you seen stars in the day?
Similar to dust particles, we need light and darkness to observe rain drops in the night. In the light of lamps rain drops shine under the backdrop of darkness. Have you seen stars in the day? Except for one star, of course. One star is visible only in the day. But in the day, there are stars in the sky. But they are not visible as they need constrast. But a bright Moon is visible in day time also. And the third brightest object in our sky after the Sun and the Moon- Venus is also visible sometimes in the daylight. If we know its exact position in the sky, then we can see it as a tiny shining point in front of the blue sky!
प्रयोग 28. अंधार व प्रकाशाचा खेळ
हा प्रयोग अगदी सोपा आहे. एक अशी खोली शोधा जी बंद आहे आणि कुठूनही त्या खोलीत प्रकाश येत नाही. त्या खोलीची एक खिडकी थोडी उघडा. खिडकीतून सूर्यप्रकाश आत आला पाहिजे. झरोख्यातून फक्त एका मर्यादित जागेत प्रकाश पडेल अशी व्यवस्था करा. त्यावेळी तुम्हांला काय दिसतं ह्याचं निरीक्षण करा. अंधा-या खोलीत जर प्रकाशाची एक छोटी पट्टी असेल तर त्यात धुळीचे बारीक कण दिसतात. खरं तर सगळीकडे धुळीचे कण असतातच. पण ते प्रकाशात दिसत नाहीत कारण त्यांना विरुद्ध प्रकारची पार्श्वभूमी आवश्यक असते. आणि पूर्ण अंधारातही ते दिसू शकत नाहीत. म्हणून उजेड व अंधार दोन्ही असताना ते दिसतात. धुळीच्या कणांवरून प्रकाश परिवर्तित होतो पण तो बघायला अंधाराची पार्श्वभूमी लागते! आणि हो, आपल्याला कोणतीच वस्तु दिसत नाही तर त्या वस्तुवरून परावर्तित होणारा प्रकाश फक्त दिसत असतो!
गंमत 28. दिवसा तारे बघितले आहेत का?
धुळीच्या कणांप्रमाणेच रात्री पाऊस पडताना बघण्यासाठी हेच आवश्यक असतं. दिव्याखालच्या प्रकाशात पाऊस दिसतो व त्यामागे असलेल्या अंधारात पावसाचे थेंब चमकतात. तुम्ही कोणी दिवसा तारे बघितले आहेत का? एक तारा सोडून. एक तारा फक्त दिवसाच दिसतो. दिवसाही आकाशात सगळे तारे असतात. पण ते दिसत नाहीत, कारण त्यांच्यासाठी अंधार आवश्यक असतो. पण ठळक असलेला चंद्र अनेकदा दिवसा दिसतो. आणि सूर्य व चंद्राखालोखाल आपल्या आकाशातला तिसरा तेजस्वी असलेला शुक्र मात्र कधी कधी दिवसा दिसतो. त्याची नेमकी जागा माहिती असेल तर तो दिवसाही निळ्या आकाशात एका बिंदूसारखा चमकताना दिसू शकतो!
Friday, May 23, 2025
Fun and Experiment no. 23
Experiment 23. Make your own electric motor!
For this, you may need help from your friends or elders. Take three small ring- like magnets. Cut a paper to make the shape of a star or +. Place the paper between two magnets. On the upside magnet, place one nail upside down (sharp end of the nail will be upwards). When you lift the nail, both the magnets and the + size of the paper too will be lifted. Take a small pencil cell. Place the nail on its down side. Due to the magents, the nail also will be attached to the cell and the paper will slightly move. Take one small wire. Place the upside end of the wire in such a way that it would touch the top point of the cell. Then keep the third magnet on it. Now make the second end of the wire touch the lowest magnet. The nail will start to rotate and + shape paper will also rotate. Electric motor is generated due to joint effect of electricity and magnetic action. Michael Faraday invented this in 1820. This looks difficult, but you will do it when you try.
Activity 23. Make this electric motor in various forms
You can do this experiment in other ways also. Make a coil like structure of a copper wire. You can also form its spiral or heart like shape. When you attach the wire with the cell and two magnets are attached on two ends of the cell, then this motor is ready and the wire starts rotating.
प्रयोग 23. इलेक्ट्रिक मोटर तयार करा!
ह्या प्रयोगासाठी तुम्हांला मित्रांची किंवा मोठ्यांची मदत लागू शकते. तीन छोटे रिंगच्या आकाराचे चुंबक घ्या. कागदाला कापून त्याचा एक ता-यासारखा किंवा + सारखा आकार बनवा. दोन चुंबकांच्यामध्ये हा कागद ठेवा. वरच्या चुंबकावर एक खिळा उलटा ठेवा (खिळ्याचं टोक वरच्या बाजूने). खिळा उचलला तर दोन चुंबक व कागदाचा + आकारही उचलला जाईल. एक छोटा पेन्सिल सेल घ्या. त्याला तो खिळा खालच्या बाजूने टेकवा. चुंबकांमुळे सेलला तो खिळाही चिकटेल आणि कागद किंचित हलेल. एक छोटी तार घ्या. तारेचं वरचं टोक सेलच्या वरच्या बिंदूला स्पर्श करेल असं ठेवा. त्यावर तिसरं छोटं चुंबक ठेवा. आणि तारेच्या दुस-या टोकाचा स्पर्श खालच्या चुंबकाला करा. खिळा गोल फिरायला लागेल व + आकाराचा कागद फिरायला लागेल. वीज व चुंबकाचा एकत्रित परिणाम होऊन इलेक्ट्रिक मोटर तयार होते. हा शोध मायकेल फॅरडेने १८२० मध्ये लावला होता. हे अवघड वाटेल पण करून बघितलं तर जमेल.
गंमत 23. वेगवेगळ्या आकाराची इलेक्ट्रिक मोटर बनवा
हाच प्रयोग इतर प्रकारेही करता येईल. तांब्याच्या तारेची गुंडाळी करा. तारेचा तुम्ही सर्पिलाकार (Spiral) किंवा बदामाचा आकार (heart shape) सुद्धा बनवू शकता. सेलला तार व दोन टोकाशी दोन चुंबक जोडले तर मोटर तयार होते व तार गोल फिरते.
Tuesday, May 20, 2025
Fun and Experiment no. 20
Experiment 20. Miraculous balloon!
Find a very sharp straw. One which we use to clear our teeth. Add some liquid soap to its sharp end. Inflate one balloon. Now slowly insert the sharp end into the balloon! The balloon will not burst! In fact, slowly you can take out that sharp end from the other side, still the balloon will not burst! Its reason is that due to liquid soap, the balloon remains air- tight. The soap acts like the rubber and does not allow air to pass. Do with your friends and enjoy!
Activity 20. Make bubbles!
Now you already have liquid soap. Do you know the trick to make bubbles from the soap? You can use a small tube for this. Or you can take little soap water in your hand and blow some air into it. Try for some time and you will have the bubbles! Observe and enjoy them. Here also, the soap works as air barrier.
प्रयोग 20. जादुई फुगा!
एक टोकदार काडी घ्या. दातामध्ये अडकलेलं काढण्यासाठी आपण वापरतो पाहा, तशी. त्याच्या टोकाला थोडा द्रव साबण लावा (लिक्विड सोप). एक फुगा फुगवा. आता हळुवार काडीचं टोक फुग्यामध्ये खुपसा! फुगा फुटणार नाही! इतकंच काय, तुम्ही ते पुढे पुढे नेऊन दुस-या बाजूने बाहेर काढलं तरी फुगा फुटणार नाही! त्याचं कारण लिक्विड सोप चिकटल्यामुळे फुगा हवाबंद होतो. साबण रबराचं काम करतो व हवेला जाऊ देत नाही. मित्रांसोबत करून पाहा व आनंद घ्या!
गंमत 20. बुडबुडे बनवा!
आता साबण व पाणी तुमच्याकडे आहे. साबणाच्या पाण्यापासून बुडबुडे तयार करता येतात का? त्यासाठी वाटल्यास एका नळीचा वापर करा. किंवा हातामध्ये थोडं साबणाचं पाणी घेऊन त्यावर फुंकर मारा. थोडा प्रयत्न करा व बुडबुडे तयार होतील! निरीक्षण करा व आनंद घ्या! इथेही साबण हवेला अडवण्याचं काम करतो.
Thursday, May 8, 2025
Fun and Experiment no. 8
Experiment 8. One more thing creating sparks
Just like pebbles, there is one more thing which generates sparks! And you don't need much effort to do it. It almost happens on its own. You need darkness to experience this. In the night, just spread your blanket. After some time, fold it. While you fold it, there is static electricity in the blanket and you can clearly see sparks. For this, you need dry weather. If it is not automatically generated, you can rub and fold it again. You need total darkness to see it.
Activity 8. Using sparks
For this, you need help from elders. Pebble stone sparks or blanket sparks, you can use them to generate fire. Take a small piece of dry paper. Put it on one pebble stone. Then strike the other pebble stone over it. After some attempts, you can set it ablaze! Same with the blanket. But take care and do not do this alone. Do you know there is one more way to generate fire? You can use our Sun for this! Think. If you know, do it again with your friends.
प्रयोग 8. ठिणग्या तयार करणारी गोष्ट
गारगोटीप्रमाणेच अजून एक वस्तुही ठिणग्या तयार करते! आणि त्यासाठी फार प्रयत्नही करावा लागत नाही. आपोआप ठिणग्या तयार होतात. त्याचा अनुभव घेण्यासाठी अंधार लागेल. रात्र झाल्यावर तुमच्याकडे असलेलं ब्लँकेट पसरवा. थोड्या वेळाने त्याची घडी करा. तुम्ही घडी कराल तेव्हा त्यामध्ये स्थितीज विद्युत तयार होते आणि त्यामुळे तुम्हांला ठिणग्या दिसू शकतात. कोरड्या हवेत हे लवकर होतं. जर ठिणग्या आपोआप तयार झाल्या नाहीत तर तुम्ही तिची घडी परत करा, तिच्या एका भागाने दुस-या भागावर घासा. पूर्ण अंधार असेल तर ठिणग्या दिसतील.
गंमत 8. ठिणग्यांपासून आग
त्यासाठी तुम्हांला मोठ्यांची मदत लागेल. गारगोट्या किंवा ब्लँकेट वापरून तुम्ही आग पेटवू शकता. कोरड्या कागदाचा तुकडा घ्या. तो एका गारगोटीवर ठेवा. मग दुस-या गारगोटीने त्या गारगोटीला घासा. काही वेळ प्रयत्न केल्यावर तुम्ही तो कागदाचा तुकडा पेटवू शकता. आणि ब्लँकेट वापरूनही तुम्ही हेकरू शकता. पण हे करताना काळजी घ्या व एकट्याने करू नका. आग पेटवण्याचा आणखी एक मार्ग तुम्हांला माहिती आहे का? त्यासाठी तुम्ही सूर्याची मदत घेऊ शकता! विचार करा. जर तुम्हांला माहिती असेल तर मित्रांसोबत ते करून पाहा.
Wednesday, May 7, 2025
Fun and Experiment no. 7
Experiment 7. Pebble stone sparks
This is very easy experiment. Some of you have done this. Now it is time to show this to younger ones. Find some shining- white coloured pebble stones near your house. You can get help of your friends. Find 2-3 such stones. In the night, you can create sparks by rubbing one such stone with the other. If there is complete darkness in the room, you can clearly see sparks! Due to friction of the stones, heat is generated and for a fraction of a second, a spark is there. You can do this as many times as you want. This can also be used to generate fire in forest or in a camp.
Activity 7. How to create heat
Suppose you are outdoors in a winter night. It is very cold then. How you can keep yourself warm? Just like the pebbles, you can create some heat by pressing your hands on one another. Even if you very rapidly rub your body, it become hot. You can use this trick with your friends also! Think about some other ways of creating body warmth!
प्रयोग 7. गारगोटीच्या ठिणग्या
हा अगदी सोपा प्रयोग आहे. तुमच्यापैकी अनेकांनी केला असेल. आता तो लहानांसोबत करूया. तुमच्या घराजवळ शोधा व काही गारगोटीचे दगड घेऊन या. ते चमकणारे व पांढ-या रंगाचे असतात. तुम्ही मित्रांचीही मदत घेऊ शकता. 2-3 दगड तयार ठेवा. रात्रीच्या वेळी ते एकमेकांवर घासून तुम्ही ठिणग्या बनवू शकता. जर खोलीमध्ये पूर्ण अंधार केला असेल, तर तुम्हांला ठिणग्यांचा उजेड स्पष्ट दिसेला! गारगोटीच्या दगडांचं घर्षण होऊन उष्णता तयार होते व अगदी सेकंदाच्या थोड्या भागासाठी ठिणगी चमकते! पाहिजे तितक्या वेळी तुम्ही हे करून पाहू शकता. जंगलात किंवा कधी बाहेर तंबूत राहताना हे वापरून आगसुद्धा पेटवता येऊ शकते.
गंमत 7. उष्णता कशी निर्माण करायची?
समजा तुम्ही थंडीच्या रात्री बाहेर एका ठिकाणी आहात. तिथे खूप थंडी वाजते आहे. तुम्ही स्वत:ला गरम कसे ठेवाल? गारगोटीप्रमाणेच तुम्ही तुमचे हात एकमेकांवर चोळून उष्णता तयार करू शकता. तुम्ही खूप जोराने तुमच्या शरीरावर हात घासला तरी तो भाग गरम होतो. तुम्ही हीच गंमत मित्रांसोबतही करून बघू शकता! शरीराला गरम ठेवण्याचे इतरही मार्ग कोणते आहेत, ह्यावर विचार करा!