Showing posts with label science activities. Show all posts
Showing posts with label science activities. Show all posts

Thursday, June 19, 2025

Fun and experiment no. 50

Experiment 50. Air resistance

You must have seen this. When you empty a water bottle, water drops slowly with many bubbles. It happens due to air resistance. Air tries to enter the bottle and opposes free fall of water. Now, we will do a small experiment. Get a bottle completely filled up by water. Go to your plants and water them. Keep the bottle upside down. It will slowly get empty. You must have observed that if you keep it straight upside down, then water drops very slowly. If you keep it tilted, then water drops relatively fast. Now get a long straw, insert it in the bottle and bend its end near the lid of the bottle. Now do the same thing. This time, water will be emptied rapidly as air has its own passage to enter the bottle. 

Activity 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =?

This is our 50th activity! This is a simple calculation. What is the number we get when we add 1 + 2 + 3 + 4 +..... + 50? No, don't use a calculator. Also don't use proper sum. It is tedious. Just observe these numbers. From 1 to 50. Sum of all these numbers. Can you make pairs of these numbers? For example, 1 and 50, 2 and 49, 3 and 48, 4 and 47 and so on? Each pair has a value of 51 and there are 25 such pairs. So the answer will be 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275. 

In the same manner, you can also calculate sum of numbers 1 + 2 + 3 + 4.... + 100. Here, we have pairs such as 1 and 100, 2 and 99, 3 and 98 and so on. Value of each pair is 101 and 50 such pairs. So the total is 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. If you really do friendship with numbers, then they are magical! This completes our 50 experiments and 50 activities. Happy learning to all. 

प्रयोग 50. हवेचा विरोध

तुम्ही हे अनुभवलं असेल. जेव्हा आपण एखादी पाण्याची बाटली रिकामी करतो, तेव्हा पाणी हळु हळु बाहेर पडतं व बुडबुडे तयार होतात. हवेच्या विरोधामुळे हे होतं. हवा बाटलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करते व पाण्याला मुक्तपणे पडू देत नाही. आपण एक छोटा प्रयोग करू. पाण्याने पूर्ण भरलेली एक बाटली घ्या. तुमच्या रोपांजवळ जा व बाटली रिकामी करून पाणी द्या. बाटली उलटी केल्यावर हळु हळु ती रिकामी‌ होईल. तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं असेलच की, ती जर एकदम उलटी केली तर पाणी खूप हळु पडतं. ती जर तिरपी ठेवली तर पाणी तुलनेने लवकर पडतं. आता एक लांब स्ट्रॉ घ्या, तो बाटलीमध्ये टाका व बाटलीच्या झाकणाजवळ त्याचं टोक दुमडून ठेवा. आता हीच कृती परत करा. ह्यावेळी‌ पाणी वेगाने बाहेर पडेल, कारण हवेला बाटलीमध्ये जाण्याचा वेगळा मार्ग आपण दिला आहे. 

गंमत 50. 1+ 2 + 3 + 4 +….+ 50 =?

ही आपली 50 वी गंमत आहे! हे अगदी‌ सोपं गणित आहे. जेव्हा आपण 1 + 2 + 3 + 4 +..... + 50 अशी बेरीज करतो, तेव्हा आपल्याला कोणती संख्या मिळते? नाही, कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. प्रत्यक्ष बेरीजही करू नका. त्याला वेळ लागेल. ह्या संख्यांचं निरीक्षण करा. 1 ते 50 अशा त्या आहेत. त्या सर्वांची‌ बेरीज. त्या संख्यांच्या तुम्हांला काही जोड्या करता येतात का? उदाहरणार्थ, 1आणि 50, 2 आणि 49, 3 आणि 48, 4 आणि 47 व अशाच इतर? प्रत्येक जोडीचे मूल्य 51 आहे व अशा एकूण 25 जोड्या आहेत. म्हणून उत्तर हे असेल 25 X 51 = 25 X 50 + 25 = 1250 + 25 = 1275. 

अगदी ह्याच प्रकारे, तुम्ही ही‌ बेरीजही करू शकता- 1 + 2 + 3 + 4.... + 100. इथे, आपल्याला अशा जोड्या मिळातील- 1 आणि 100, 2 आणि 99, 3 आणि 98 व पुढे. प्रत्येक जोडीचे मूल्य 101 आहे व अशा 50 जोड्या. म्हणजे बेरीज ही‌ असेल- 50 X 101 = 50 X 100 + 50 = 5050. आकड्यांसोबत थोडी मैत्री केली की ते किती गमतीदार आहेत हे लक्षात येतं. तर आपले 50 प्रयोग व 50 गमती पूर्ण झाल्या आहेत. सर्वांना happy learning! 

Monday, June 16, 2025

Fun and experiment no. 47

Experiment 47. Balloon and chits

Take any old newspaper or any used paper. Make small pieces or chits. Now inflate a balloon. Tie it properly. Rub it to a napkin or blanket for 5 minutes. Now bring the balloon near the chits and the chits will be attracted to the balloon and they will stick to it! This happens due to static electricity. 

Activity 47. Who gets maximum chocklets?

You and your friends will play this simple game. If you have date of birth as 1st (1 May for example), then you are supposed to get one chocklet. If your friend has date of birth as 2nd (2 April for example), then he or she will get two chocklets. If someone has 3, then he will get 4 chocklets. If someone has 4, then he or she will get 8 chocklets. That means for every day, you will double the number. This way- 

1- 1
2- 2
3- 4
4- 8
5- 16
6- 32

Now check with yourself and your friends! Who will get the maximum number of chocklets? Who will be the most lucky and the most unlucky?


प्रयोग 47. फुगा आणि चिठ्ठ्या

कोणताही रद्दी किंवा वापरलेला कागद घ्या. त्यापासून छोटे तुकडे किंवा बारीक चिठ्ठ्या बनवा. एक फुगा फुगवा. तो योग्य प्रकारे बांधा. तो काही वेळ एका नॅपकीनसोबत घासा. आता फुगा त्या कागदी तुकड्यांजवळ आणा. ते तुकडे फुग्याकडे ओढले जातील व त्याला चिकटतील! हे स्थितीज विद्युतमुळे होतं. 

गंमत 47. सगळ्यांत जास्त चॉकलेटस कोणाला मिळणार?

तुम्ही व तुमचे मित्र मिळून हा खेळ खेळा. समजा तुमचा वाढदिवस एक तारखेला आहे, तर तुम्हांला एक चॉकलेट मिळेल. जर दुस-याचा वाढदिवस दोन तारखेला असेल, तर त्याला दोन चॉकलेटस मिळतील. कोणाचा वाढदिवस जर तीन असेल तर तिला चार चॉकलेटस मिळतील. कोणाचा चार असेल, तर तिला आठ चॉकलेटस मिळतील. म्हणजे दररोज आधीच्या दिवसापेक्षा दुप्पट चॉकलेटस मिळतील. अशा प्रकारे- 

1- 1
2- 2
3- 4
4- 8
5- 16
6- 32

तुमच्या वाढदिवसाला व तुमच्या मित्रांच्या वाढदिवसाला किती चॉकलेटस मिळतील ह्याचा विचार करा! कोण सगळ्यांत जास्त लकी असेल व कोण अनलकी असेल?

Sunday, June 8, 2025

Fun and experiment no. 39

Experiment 39. Powerful balloon

You know that a ballon is easily plop or flattened by a pin. But we will do this with as many as 15 pins. Yes, we will make bed of 15 pushpins! One pushpin will plop the balloon, but if the same balloon is pressed on the bed of 15 pushpins, they all will not be able to plop it! Arrange all the pushpins like a bed. Their wide part will be on the floor. They will look like inverted T shape. Their sharp side will be upside. Put them near each other. Make three rows of five pins. Do this. Put a balloon on them. It will not burst. Even if you press, it will not burst! This happens due to distribution of pressure on the surface of the balloon. As the pressure is spread over large area, its intensity reduces and so the balloon does get burst.

Activity 39. Using cooked rice a glue

This is a thing I had observed when I was a child. Observing is very vital for learning. When you do craft work, you need glue and fevicol etc. many times. But if they are not available, then you can do one thing. When rice is cooked in a cooker, then its pieces are very elastic and sticky. Take a few pieces. Even 10- 15 pieces would be sufficient. You can mix them and this mixture you can use as glue! You can stick pages together or even close an envelop! Do try this. And due to this very reason, the pieces of rice stick on the cooker are hard to wash off when they are dried! 


प्रयोग 39. पॉवरफुल फुगा!

तुम्हांला माहितीच आहे की, एक टाचणीसुद्धा फुग्याला सहजपणे फोडू शकते. आपण हीच गोष्ट 15 टाचण्या म्हणजे पुशपिन्स वापरून करूया.  त्यासाठी 15 पुशपिन्सचा एक गालिचा तयार करू. सगळ्या पिना उलट्या ठेवा. म्हणजे डोकं खाली व टोक वर. त्या सगळ्या एकमेकांजवळ ठेवा. पाच पिनांच्या तीन रांगा करा. आता एक फुगा पिनांवर ठेवा. तो फुटणार नाही. तुम्ही थोडं दाबलंत तरी तो फुटणार नाही! करून पाहा! हे होण्याचं कारण म्हणजे फुग्याच्या पृष्ठभागावर येणारा दाब हा जास्त क्षेत्रामध्ये पसरला जातो. त्यामुळे पृष्ठभागावर त्याची पातळी कमी होते. म्हणून फुगा फुटत नाही. 

गंमत 39. भाताच्या शीताचा डिंक

मी लहानपणी ह्या गोष्टीचं निरीक्षण केलं होतं. शिकण्यासाठी निरीक्षण करणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही क्राफ्टचं काम करता, तेव्हा तुम्हांला डिंक किंवा ग्ल्यूची गरज असते. एखाद्या वेळी तो जवळ नसतो. तेव्हा तुम्ही ही गोष्ट करू शकता. जेव्हा भात कूकरमध्ये शिजवला जातो तेव्हा त्याचं शीत अगदी पातळ व चिकट होतं. काही शीत घ्या- अगदी 10-15 शीतही चालतील. त्यांना एकत्र करून त्यांचं एक चिकट मिश्रण बनवा. ते तुम्ही डिंकासारखं वापरू शकता! तुम्ही अनेक पानं ते वापरून चिकटवू शकता किंवा लिफाफा बंद करू शकता! हे करून पाहा. ह्याच कारणामुळे कुकरला लागलेली कोरडी शीतं कुकर धुताना लवकर निघत नाहीत! मोठ्यांना शीत शब्दाचा दुसरा अर्थ विचारा व "शीतावरून भाताची परीक्षा" ह्या म्हणीचा अर्थ समजून घ्या.