Sunday, June 8, 2025

Fun and experiment no. 39

Experiment 39. Powerful balloon

You know that a ballon is easily plop or flattened by a pin. But we will do this with as many as 15 pins. Yes, we will make bed of 15 pushpins! One pushpin will plop the balloon, but if the same balloon is pressed on the bed of 15 pushpins, they all will not be able to plop it! Arrange all the pushpins like a bed. Their wide part will be on the floor. They will look like inverted T shape. Their sharp side will be upside. Put them near each other. Make three rows of five pins. Do this. Put a balloon on them. It will not burst. Even if you press, it will not burst! This happens due to distribution of pressure on the surface of the balloon. As the pressure is spread over large area, its intensity reduces and so the balloon does get burst.

Activity 39. Using cooked rice a glue

This is a thing I had observed when I was a child. Observing is very vital for learning. When you do craft work, you need glue and fevicol etc. many times. But if they are not available, then you can do one thing. When rice is cooked in a cooker, then its pieces are very elastic and sticky. Take a few pieces. Even 10- 15 pieces would be sufficient. You can mix them and this mixture you can use as glue! You can stick pages together or even close an envelop! Do try this. And due to this very reason, the pieces of rice stick on the cooker are hard to wash off when they are dried! 


प्रयोग 39. पॉवरफुल फुगा!

तुम्हांला माहितीच आहे की, एक टाचणीसुद्धा फुग्याला सहजपणे फोडू शकते. आपण हीच गोष्ट 15 टाचण्या म्हणजे पुशपिन्स वापरून करूया.  त्यासाठी 15 पुशपिन्सचा एक गालिचा तयार करू. सगळ्या पिना उलट्या ठेवा. म्हणजे डोकं खाली व टोक वर. त्या सगळ्या एकमेकांजवळ ठेवा. पाच पिनांच्या तीन रांगा करा. आता एक फुगा पिनांवर ठेवा. तो फुटणार नाही. तुम्ही थोडं दाबलंत तरी तो फुटणार नाही! करून पाहा! हे होण्याचं कारण म्हणजे फुग्याच्या पृष्ठभागावर येणारा दाब हा जास्त क्षेत्रामध्ये पसरला जातो. त्यामुळे पृष्ठभागावर त्याची पातळी कमी होते. म्हणून फुगा फुटत नाही. 

गंमत 39. भाताच्या शीताचा डिंक

मी लहानपणी ह्या गोष्टीचं निरीक्षण केलं होतं. शिकण्यासाठी निरीक्षण करणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही क्राफ्टचं काम करता, तेव्हा तुम्हांला डिंक किंवा ग्ल्यूची गरज असते. एखाद्या वेळी तो जवळ नसतो. तेव्हा तुम्ही ही गोष्ट करू शकता. जेव्हा भात कूकरमध्ये शिजवला जातो तेव्हा त्याचं शीत अगदी पातळ व चिकट होतं. काही शीत घ्या- अगदी 10-15 शीतही चालतील. त्यांना एकत्र करून त्यांचं एक चिकट मिश्रण बनवा. ते तुम्ही डिंकासारखं वापरू शकता! तुम्ही अनेक पानं ते वापरून चिकटवू शकता किंवा लिफाफा बंद करू शकता! हे करून पाहा. ह्याच कारणामुळे कुकरला लागलेली कोरडी शीतं कुकर धुताना लवकर निघत नाहीत! मोठ्यांना शीत शब्दाचा दुसरा अर्थ विचारा व "शीतावरून भाताची परीक्षा" ह्या म्हणीचा अर्थ समजून घ्या.

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.