Experiment 36. Moving fish
Take a thin plastic paper. Cut it in a shape looking like a fish. Create an eye on it. Cut the tail of the fish like < . Make such three fishes. Now we need to attach a piece of camphor in the tail of the fishes. Camphor is generally found in worship material. Now take these fishes to water! They will start floating and moving! The camphor attached in the tail of the fishes starts to dissolve in water and the surface tension on water nearby starts decreasing. Due to this difference in the surface tension, a movement is created. When I was a child, I had seen this experiment in one festival. If you too have seen and done such experiments, then do share. This experiment is taken from Maha- Shikshan youtube channel of Shri. Kishor Borphale sir.
Activity 36. Lift the ball without touching it!
Place one long clothe- mattress on the floor. Place a blanket on it. In the middle of the blanket, keep one ball. Now lift the ball without touching the blanket or the air on the blanket. It is very easy!
प्रयोग 36: फिरणारा मासा.
प्लास्टीकचा पातळ पेपर घेऊन त्यावर कात्रीने माशासारखा आकार कापा. त्यावर डोळा दाखवा. माशाची शेपूट < सारखी कापा. असे तीन मासे कापून तयार झाल्यावर त्यांच्या मागच्या शेपटीच्या < भागात कापराचा तुकडा अडकवायचा आहे. कापूर पूजेच्या साहित्यामध्ये असतं. असे बनवलेले मासे पाण्यात सोडा! ते लगेच फिरायला लागतील. माशाच्या मागच्या भागाजवळ लावलेला कापूर पाण्यात विरघळायला सुरूवात होते. त्यामुळे तिथला पाण्याचा पृष्ठीय ताण (सरफेस टेंशन) कमी होतो. आणि पाण्याच्या बलामध्ये फरक निर्माण झाल्यामुळे हालचाल तयार होते. लहानपणी मी एका आनंद नगरीमध्ये हा प्रयोग बघितला होता! तुम्हीही असे प्रयोग बघितले असतील व केले असतील तर मला कळवा. हा प्रयोग महा- शिक्षण युट्युब चॅनलवर श्री. किशोर बोरफळे सरांनीसुद्धा सांगितला आहे.
गंमत 36. हात न लावता चेंडू उचला!
एक मोठी खोलीभर पसरणारी सतरंजी अंथरा. त्यावर एक चटई ठेवा. चटईवर मध्यभागी एक चेंडू ठेवा. चटईला किंवा चटईच्या वरच्या हवेला स्पर्श न करता तो चेंडू उचला. हे खूप सोपं आहे!
Thursday, June 5, 2025
Fun and experiment no. 36
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Thanks for reading my blog! Do share with your near ones.