Tuesday, June 3, 2025

सायकल दिनानिमित्त आकाशवाणीवर मनोगत

नमस्कार. पावसाळ्यात निसर्गात सायकल चालवतानाचा आनंद खूप वेगळा! सगळीकडे हिरवागार परिसर, डोंगर, ढग, आणि पाऊस! झपाटलेलं वातावरण! रोमांचक असा अनुभव. खूप आतून शांत करणारा. अशा सायकल राईडस सुरू असताना आज जागतिक सायकल दिवस! सकाळी 23 किलोमीटरची राईड केली आणि आकाशवाणी परभणी केंद्र लावलं! "तिसरं चाक" कार्यक्रमात परभणीच्या चार सायकलिस्टसचं मनोगत होतं. मी आणि माझे तीन सायकल मित्रही- डॉ. पवन चांडक, डॉ. शिवा ऐथाल आणि विनोद शेंडगे सर हेही त्यात होते. हा कार्यक्रम परभणी आकाशवाणी केंद्राने सादर केला व तो राज्यभर प्रक्षेपित झाला. त्यामध्ये सगळ्यांचे सायकलिंगचे अनुभव, सामाजिक उपक्रम, आरोग्याचे वेगवेगळे पैलू, मोबाईल व्यसनमुक्ती, वाचन चळवळ, फिटनेस, ध्यान अशा अनेक मुद्द्यांची चर्चा झाली. ही संधी दिल्याबद्दल आकाशवाणी परभणी केंद्र व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार! ह्या 15 मिनिटांच्या कार्यक्रमाचं रेकॉर्ड इथे उपलब्ध आहे. 
 

होशवालों को खबर क्या... पेडलिंग क्या चीज़ है...
राईड कीजिए, फिर समझिए ज़िन्दग़ी क्या चीज़ है...

आणि हो, सर्वांना सायकल दिनाच्या शुभेच्छा! पण ह्या शुभेच्छा सायकल चालवून किंवा अन्य कोणताही दमवणारा व्यायाम करून द्यायच्या असतात असं शास्त्र आहे! माझ्या सायकलिंगचे फोटोज इथे बघता येतील. धन्यवाद. 

-निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्रे. पोस्ट लिहील्याचा दिनांक: 3 जून 2025.

No comments:

Post a Comment

Thanks for reading my blog! Do share with your near ones.