Experiment 47. Balloon and chits
Take any old newspaper or any used paper. Make small pieces or chits. Now inflate a balloon. Tie it properly. Rub it to a napkin or blanket for 5 minutes. Now bring the balloon near the chits and the chits will be attracted to the balloon and they will stick to it! This happens due to static electricity.
Activity 47. Who gets maximum chocklets?
You and your friends will play this simple game. If you have date of birth as 1st (1 May for example), then you are supposed to get one chocklet. If your friend has date of birth as 2nd (2 April for example), then he or she will get two chocklets. If someone has 3, then he will get 4 chocklets. If someone has 4, then he or she will get 8 chocklets. That means for every day, you will double the number. This way-
1- 1
2- 2
3- 4
4- 8
5- 16
6- 32
Now check with yourself and your friends! Who will get the maximum number of chocklets? Who will be the most lucky and the most unlucky?
प्रयोग 47. फुगा आणि चिठ्ठ्या
कोणताही रद्दी किंवा वापरलेला कागद घ्या. त्यापासून छोटे तुकडे किंवा बारीक चिठ्ठ्या बनवा. एक फुगा फुगवा. तो योग्य प्रकारे बांधा. तो काही वेळ एका नॅपकीनसोबत घासा. आता फुगा त्या कागदी तुकड्यांजवळ आणा. ते तुकडे फुग्याकडे ओढले जातील व त्याला चिकटतील! हे स्थितीज विद्युतमुळे होतं.
गंमत 47. सगळ्यांत जास्त चॉकलेटस कोणाला मिळणार?
तुम्ही व तुमचे मित्र मिळून हा खेळ खेळा. समजा तुमचा वाढदिवस एक तारखेला आहे, तर तुम्हांला एक चॉकलेट मिळेल. जर दुस-याचा वाढदिवस दोन तारखेला असेल, तर त्याला दोन चॉकलेटस मिळतील. कोणाचा वाढदिवस जर तीन असेल तर तिला चार चॉकलेटस मिळतील. कोणाचा चार असेल, तर तिला आठ चॉकलेटस मिळतील. म्हणजे दररोज आधीच्या दिवसापेक्षा दुप्पट चॉकलेटस मिळतील. अशा प्रकारे-
1- 1
2- 2
3- 4
4- 8
5- 16
6- 32
तुमच्या वाढदिवसाला व तुमच्या मित्रांच्या वाढदिवसाला किती चॉकलेटस मिळतील ह्याचा विचार करा! कोण सगळ्यांत जास्त लकी असेल व कोण अनलकी असेल?
Monday, June 16, 2025
Fun and experiment no. 47
Sunday, June 1, 2025
Fun and experiment no. 32
Experiment 32. Floating pencil
Take two pencils and two sticks of ice- cream. Take four ring magnets. Attach a stick to the sharp end of a pencil by using glue. Attach another stick on this stick in the same way on the other side. They should be attached firmly. On the other ends of both the sticks, keep two ring magnets each. Due to mutual attraction, the magnets would stay firm there. The pencil and two sticks would form a shape like Y. Now place the second pencil on floor with its sharp end in the air. Place the first pencil on the standing pencil. With little efforts, you can easily keep the second pencil standing on the first pencil. You can keep it floating and also move it. One pencil will be on the floor and another pencil will be hanging on it. The reason for this is the magnetic field created by the four magnets is more powerful than gravitation on the pencil. Just like the case when a pin attached to a magnet does not fall down due to gravitation.
Activity 32. Pencil totally in air!
You can do the same activity in another way. Place two ring magnets vertically on a thermocol piece. Keep the pencil inside four ring magnets, two on front side and two on back side. Then in a certain position and with proper arrangements, the pencil can actually float in the air. You can do this with a little effort. Due to magnetic forces of attraction and repulsion, the magnets get steadily positioned and they remain fix there. As a result, the pencil also gets fixed there.
प्रयोग 32. तरंगणारी पेन्सिल
दोन पेन्सिली आणि दोन आईस्क्रीमच्या काड्या घ्या. चार छोटी गोलाकार चुंबके घ्या. एक काडी पेन्सिलीच्या टोकाच्या बाजूला डिंकाने चिकटवा. त्या काडीवर दुसरी काडी पलीकडे राहील अशी चिकटवा. त्या घट्ट चिकटल्या पाहिजेत. दोन्ही काड्यांच्या दुस-या टोकांवर दोन- दोन चुंबके ठेवा. एकमेकांकडे ओढल्यामुळे ते चुंबक काड्यांवर चिकटून राहतील. पेन्सिल आणि दोन काड्यांची Y सारखी आकृती तयार होईल. आता दुसरी पेन्सिल पोटावर उभी करा. तिच्या टोकावर ह्या पेन्सिलीला धरा. थोडा प्रयत्न करून तुम्ही त्या पेन्सिलीला सहजपणे त्या पेन्सिलीच्या टोकावर तरंगत ठेवू शकता व हलवूसुद्धा शकता. एक पेन्सिल पोटावर उभी व तिच्या टोकावर तिरपी दुसरी पेन्सिल लटकलेली दिसेल. हे होण्याचं कारण म्हणजे चार चुंबकांमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं व चुंबकीय बल पेन्सिलीला खाली खेचणा-या गुरूत्वाकर्षणापेक्षा जास्त असतं. अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे चुंबकाला चिकटलेली टाचणी गुरूत्वाकर्षणामुळे खाली पडत नाही.
गंमत 32. हवेतली पेन्सिल!
हीच कृती तुम्ही अजूनही इतर प्रकारे करू शकता. थर्मोकॉलवर खाली दोन रिंग मॅग्नेटस उभी करून ठेवली व पेन्सिलीमध्ये समोर दोन व मागे दोन रिंग मॅग्नेटस ठेवली तर एका विशिष्ट स्थितीमध्ये व चुंबकांच्या योग्य अरेंजमेंटमध्ये पेन्सिल हवेत तरंगू शकते. थोडा प्रयत्न केला तर हे जमेल. एकमेकांच्या आकर्षण व प्रतिकर्षणाच्या (attraction and repulsion forces) बलांमुळे चुंबक एकमेकांपासून विशिष्ट जागेवर स्थिर होतात आणि त्यांच्यामध्ये असलेली पेन्सिलही स्थिर होते.
Monday, May 19, 2025
Fun and Experiment no. 19
Experiment 19. Cool fire!
For this experiment, you will need help of elder friends or siblings. Fine one liquid hand sanitizer. Take few drops out of it and place them on one hard paper. Spread the drops by using your finger. Then lift the hard paper by using a pincer. Carefully use match stick and burn the drops gently. You will see a blue flame. It will burn the sanitizer drops, but the paper would not burn! This happens due to the fact that hand sanitzer burns at low heat level. The alcohol has low boiling point and their flame is relatively cooler. It does not burn the paper, but only burns itself with almost invisible flame! Enjoy with care.
Activity 19. Speaking in only one language
This is not THAT easy! Your task is to choose any one language and speak in it for 1 minute i.e. 60 seconds! Do not use any word which is from another language! Try! Not easy! Whatever be your language, you are bound to use at least two words in other language. You can play this game with friends. When one will speak, others will check. You can play alternately. The one who uses the least foreign words will win!
प्रयोग 19. शीत ज्योत!
ह्या प्रयोगासाठी तुम्हांला मोठ्या ताई- दादांची मदत लागेल. एक पुठ्ठा घ्या. हँड सॅनिटायझर मिळवा. सॅनिटायझरचे काही थेंब एका पुठ्ठ्यावर फवारा. ते बोटाने पसरवा. तो पुठ्ठा सांडशी किंवा पकडीमध्ये उचलून धरा व त्यावर थेंबांना काडेपेटीने हलकेच पेटवा. निळी अंधुक ज्योत दिसेल व त्यामध्ये सॅनिटायझर जळेल पण पुठ्ठा जळणार नाही. असं होण्याचं कारण हे आहे की, सॅनिटायझरमध्ये असलेलं अल्कोहोल कमी तपमानाला जळतं. त्याचा उत्कलनांक कमी आहे. तपमान कमी असल्यामुळे पुठ्ठा जळत नाही. फक्त तेच जळतं आणि जवळ जवळ अदृश्य अशी ज्योत दिसते. काळजी घ्या आणि आनंद घ्या!
गंमत 19. एकाच भाषेत बोलायचं
एक मिनिट एकाच भाषेत बोलायचं. हे वाटतं तितकं सोपं नाहीय. कोणतीही सोपी भाषा घेऊन प्रयत्न करून पाहा. एक मिनिट म्हणजे 60 सेकंद. फक्त एक भाषा. एकही शब्द दुस-या भाषेचा आला नाही पाहिजे! सोपं वाटतंय? करून पाहा. हवं तर मित्रांसोबत हा खेळ खेळा. एक जण बोलेल व इतर जण तपासतील! हा एक खेळ होऊ शकतो. जितके शब्द दुस-या भाषेतले बोलाल ते नोट करा! सगळ्यांत कमी जो असे शब्द वापरेल तो जिंकेल! बघा, मीसुद्धा दुस-या भाषेतले किती शब्द लिहीलेत इथे!
Tuesday, May 6, 2025
Fun and Experiment no. 6
Experiment 6. Balancing act of your hand!
Lift a heavy bucket as compared to your age. Small children can lift fully filled bucket as per their capacity and walk ten steps. When we carry a heavy bucket in one hand, what happens with our other hand? Observe. When we carry a heavy object in our hand, then weight of the body in one direction increases and therefore walking becomes difficult. For balancing this weight, our hand is stretched wide! It makes walking easier! Our body knows centre of gravity and its balance!
Activity 6. Spilling water
Give water to plants in your trees. Or place water in your window for birds. When you carry water, observe it. When does it spills from the bucket? If the bucket is half- filled, does it spill out? If it is a small bucket, does it spill? And does it spill out of a mug? The larger the bucket, the more filled it is and the speed with which you take it- all these things make spilling happen. When mass and speed is more, the momentum increases. And therefore water comes out of the container. And due to this very reason, your cycle goes little ahead even when you have stopped pedaling.
प्रयोग 6. आडवा होणारा हात
वयाच्या मानाने अतिशय जड पाण्याची बादली उचला. लहान मुलाने/ मुलीने शक्य असेल त्यानुसार पूर्ण भरलेली बादली उचला व दहा पावलं चालून पाहा. एका हातामध्ये जड बादली घेतली असताना दुसरा हात कसा होतो ह्याचं निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही हातात जड वस्तू घेता तेव्हा शरीराचं एका बाजूचं वजन वाढतं. त्यामुळे चालणं कठीण होतं. वजन संतुलित करण्यासाठी दुसरा हात आडवा होतो व वजन पसरतं. त्यामुळे चालणं सोपं होतं. गुरूत्वमध्य व त्याचं संतुलन करणं तुमच्या शरीराला माहिती आहे!
गंमत 6. सांडणारं पाणी
तुमच्या घरातल्या झाडांना बादलीने पाणी द्या. किंवा पक्ष्यांसाठी खिडकीत छोट्या भांड्यामध्ये पाणी ठेवा. पाणी नेत असताना ते कधी हिंदकळून सांडतं? अर्धी बादली भरलेली असेल तर सांडतं का? लहान बादलीतलं पाणी सांडतं का? मग भरलेला असेल तरी त्यातलं पाणी सांडतं का? बादली जितकी मोठी, जितकी जास्त भरलेली आणि तुम्ही जितकी वेगाने ती न्याल तेवढं जास्त पाणी हिंदकळतं व सांडतं. वस्तुमान व वेग जितका जास्त असतो, तितका संवेग (momentum) जास्त होतो. त्यामुळे पाणी बाहेर येऊन सांडतं. आणि ह्याच कारणामुळे तुम्ही पेडल मारणं थांबवल्यावरही सायकल थोडी पुढे जाते.