Showing posts with label Science experiments. Show all posts
Showing posts with label Science experiments. Show all posts

Tuesday, June 3, 2025

Fun and experiment no. 34

Experiment 34. Colour and soap

Take some milk in one large plate. The plate should be half filled. Then add some oil paint colour. Some portion of the milk will be coloured. Now attach some liquid hand wash to a straw. Bring the straw near the colour. Immediately the colour will repel away. If you blow air onto the colour, then it will create a circle of colourless liquid. The reason for this is that hand wash or soap separates water from oil or dirt. Some components of the hand wash attract water and some repel the oil or the dirt particles. Precisely due to this reason, we use soap to remove dust and dirt! 

Activity 34. Reflection of a drawing!

Do you know that by using soap, we can make impressions. Even soap can be used to make a duplicate key. Can you make a copy of your writing without using a carbon paper? If you don't know the carbon paper, then ask elders! If you draw  by putting a page on a thin clear paper, then the drawing also gets printed on that thin paper. Or you can do this. Put plenty of ink on one paper and make it totally blue. Now place it on another paper. When you write on the other side of the blue paper, then it will be printed on the page that is below!


प्रयोग 34. रंग आणि साबण

एका मोठ्या ताटलीत अर्धी ताटली भरेल इतके दुध ओता. त्यामध्ये ऑईल पेंटचा रंग टाका. दुधाच्या काही भागाला रंग येईल. आता एका स्ट्रॉला थोडं लिक्विड हँड वॉश लावा. हँड वॉश लावलेलं टोक त्या रंगाच्या जवळ आणा. लगेच रंग बाजूला सरकेल. वरून फुंकर मारली तर आतमध्ये रंग नसलेल्या जागेचं वर्तुळ तयार होईल. हे होण्याचं कारण म्हणजे हँड वॉश किंवा साबण हा पाणी व तेल- धुळ ह्यांना वेगळं करतो. हँड वॉशमधले काही घटक पाण्याला आकर्षित करतात व तेलाला किंवा धुळीला दूर सारतात. ह्याच कारणामुळे आपण धुळ काढण्यासाठी साबण वापरतो! 

गंमत 34.  चित्राचं प्रतिबिंब!

साबणाचा वापर करून ठसे बनवता येतात हे तुम्हांला माहिती आहे का? अगदी डुप्लिकेट चावीसुद्धा बनवताना साबणाचा उपयोग होऊ शकतो. कार्बनचा पेपर न वापरता तुम्ही जे लिहीता त्याची प्रत तयार करू शकता का? कार्बन पेपर म्हणजे काय हा प्रश्न असेल तर मोठ्यांना उत्तर विचारा! को-या पातळ कागदावर दुसरं पान ठेवून तुम्ही पेन्सिलीने चित्र काढलं तर तेच चित्र तुम्हांला त्या पातळ कागदावरही उमटलेलं दिसेल. किंवा तुम्ही असंही करू शकता. एका कागदावर खूप शाई लावा व तो कागद अगदी निळा करा. आता तो दुस-या कागदावर ठेवा.  निळ्या केलेल्या त्या कागदाच्या दुस-या बाजूने तुम्ही लिहीलं तर ते खालच्या कागदावरही उमटेल!

Saturday, May 17, 2025

Fun and Experiment no. 17

Experiment 17. Long sprouts of potato

Potatoes need moisture and sunlight to develop sprouts. When potatoes are kept for long time, they develop sprouts. Remember, potatoes are stems. We do not eat fruit or flowers or leafs of this plant, but its stem. In this experiment, we will grow potatoes with long sprouts. Prepare a box with two small windows at one side. The box should be long. Keep a few potatoes inside the box at the dark side, opposite from the windows. Observe “eyes” of the potatoes. Apart from the two windows, the box should be dark and closed. Keep the window in the direction of the light coming from outside. After some days, the potatoes will develop sprouts and they will move towards the window as they get feed from the light. They can also develop a long tubular.

Activity 17. Jumbled words

Find meaning of these words- Locsh, nidan, dustne. These are jumbled words. Re-arrange these words and make proper words! Also you can form jumbled names. For example, Peeda is a jumbled form of Deepa. Also Jeshra is a jumbled form of Rajesh! Make such words and play with them. Now, prepare maximum words by using these alphabets- netusd. Examples- Student, used, net, to, dust etc.


प्रयोग 17. बटाट्याचे लांब जाणारे कोंब

बटाट्याला कोंब येण्यासाठी दमट वातावरण व सूर्यप्रकाशाची गरज असते. बटाटे खूप काळ तसेच ठेवले, तर त्यांना मोड येतात. बटाटा हा कंदमुळाचं खोड आहे हे लक्षात ठेवा. आपण त्या वनस्पतीचं फळ, फुलं किंवा पानं नाही तर खोड खातो. ह्या प्रयोगामध्ये आपण लांब मोड येणारे बटाटे पाहू. एक लांब खोकं‌ घ्या. एकाच बाजूला त्याला दोन छोट्या खिडक्या करा. खिडकीच्या उलट बाजूला काही बटाटे ठेवा. बटाट्याच्या "डोळ्यांचं" निरीक्षण करा. दोन खिडक्या सोडून बाकी खोकं बंद व अंधार असलेलं हवं. त्या खिडक्या प्रकाश येणा-या दिशेला ठेवा. काही दिवसांनी बटाट्यांना कोंब येतील व ते खिडकीच्या दिशेने असतील. प्रकाशापासून त्यांना पोषण मिळत असल्यामुळे त्या दिशेने कोंब फुटतात व वाढतात. त्याची लांबलचक वाढसुद्धा होऊ शकते.

गंमत 17. बेशिस्त अक्षरे!

ह्या शब्दांचा अर्थ शोधा- Locsh, nidan, dustne. हे जंबल केलेले म्हणजे क्रम मोडलेले शब्द आहेत. त्यांचा क्रम बदलून योग्य शब्द तयार करा. Peeda हा क्रम बदलून लिहीलेला Deepa शब्द आहे. तसंच Jeshra हा Rajesh चा जंबल केलेला प्रकार आहे. असे अजून शब्द तयार करा व त्यांच्यासोबत खेळा. शकाप्रर्यसू हा कोणता शब्द आहे? “लावरआ डाबकों" ह्याचा अर्थ काय होतो? आता ही अक्षरे वापरून शब्द बनवा- dustne. उदाहरणे- Student, used, net, to, dust etc. “आवरा" शब्दातली अक्षरे वापरून वर, आरा, राव, रव, आव असे शब्द बनवा. वेगवेगळी अक्षरं घेऊन हा खेळ खेळा!

Tuesday, May 13, 2025

Fun and Experiment no. 13

Experiment 13. How to make the spoon float?

Take two spoons. One plastic spoon and one steel spoon. Take a small bucket and fill it with water. Now put both the spoons in the water. Will they float? Steel spoon will not float. Plastic spoon will float as it is less dense than water. What can you do to make the steel spoon float? Think. One way is get a balloon. Pump it and then tie it to the steel spoon. After some attempts, you will be able to keep the steel spoon afloat. Are there other ways? Think and find.

Activity 13. Floating fruits and vegetables

Let’s do a small activity with fruits and vegetables. Take easily available fruits and vegetables such as mango, onion, cucumber, lemon, apple, flower, cabbage, gourd, carrot etc. You can also go to a vegetable store and check this. Some of them will float and some of them will not float! Even large and heavy fruits such as gourd and watermelon float on water! In fact, gourd is used as a safety tool when kids learn swimming! It works just like tyre- tube and helps for floating on water.

प्रयोग 13. चमचा कसा तरंगेल?

दोन चमचे घ्या. एक चमचा प्लास्टीकचा घ्या व एक स्टीलचा घ्या. एका छोट्या मगात पाणी घ्या व त्यामध्ये दोन्ही चमचे ठेवा. ते तरंगतील का? स्टीलचा चमचा तरंगणार नाही. प्लास्टीकचा चमचा तरंगेल, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. स्टीलचा चमचा तरंगावा म्हणून तुम्ही काय करू शकता? विचार करा. एक पर्याय म्हणजे एक फुगा फुगवा व तो स्टीलच्या चमच्याला बांधा. थोडा प्रयत्न केल्यावर तुम्हांला चमचा तरंगता ठेवता येईल. असे इतरही पर्याय आहेत का? विचार करा व शोधा.

गंमत 13. तरंगणारे फळ व भाज्या

फळं व भाज्या घेऊन एक सोपी गंमत करूया. आंबा, कांदा, काकडी, लिंबू, गाजर, सफरचंद, फुलकोबी, कोबी, भोपळा असे फळं व भाज्या घ्या. वाटलं तर भाजीच्या दुकानावर जाऊन हे करू शकता. काही फळं पाण्यात तरंगतील तर काही तरंगणार नाही! भोपळा व कलिंगड अशी मोठी व वजनदार फळंही पाण्यावर तरंगतात! किंबहुना, भोपळा तर पोहायला शिकताना सुरक्षा साधन म्हणून मुलं वापरतात! टायरट्युबप्रमाणेच तो काम करतो व पाण्यावर तरंगण्यासाठी मदत करतो.

Wednesday, May 7, 2025

Fun and Experiment no. 7

Experiment 7. Pebble stone sparks

This is very easy experiment. Some of you have done this. Now it is time to show this to younger ones. Find some shining- white coloured pebble stones near your house. You can get help of your friends. Find 2-3 such stones. In the night, you can create sparks by rubbing one such stone with the other. If there is complete darkness in the room, you can clearly see sparks! Due to friction of the stones, heat is generated and for a fraction of a second, a spark is there. You can do this as many times as you want. This can also be used to generate fire in forest or in a camp.

Activity 7. How to create heat

Suppose you are outdoors in a winter night. It is very cold then. How you can keep yourself warm? Just like the pebbles, you can create some heat by pressing your hands on one another. Even if you very rapidly rub your body, it become hot. You can use this trick with your friends also! Think about some other ways of creating body warmth!

प्रयोग 7. गारगोटीच्या ठिणग्या

हा अगदी सोपा प्रयोग आहे. तुमच्यापैकी अनेकांनी केला असेल. आता तो लहानांसोबत करूया. तुमच्या घराजवळ शोधा व काही गारगोटीचे दगड घेऊन या. ते चमकणारे व पांढ-या रंगाचे असतात. तुम्ही मित्रांचीही मदत घेऊ शकता. 2-3 दगड तयार ठेवा. रात्रीच्या वेळी ते एकमेकांवर घासून तुम्ही ठिणग्या बनवू शकता. जर खोलीमध्ये पूर्ण अंधार केला असेल, तर तुम्हांला ठिणग्यांचा उजेड स्पष्ट दिसेला! गारगोटीच्या दगडांचं घर्षण होऊन उष्णता तयार होते व अगदी सेकंदाच्या थोड्या भागासाठी ठिणगी चमकते! पाहिजे तितक्या वेळी तुम्ही हे करून पाहू शकता. जंगलात किंवा कधी बाहेर तंबूत राहताना हे वापरून आगसुद्धा पेटवता येऊ शकते.

गंमत 7. उष्णता कशी निर्माण करायची?

समजा तुम्ही थंडीच्या रात्री बाहेर एका ठिकाणी आहात. तिथे खूप थंडी वाजते आहे. तुम्ही स्वत:ला गरम कसे ठेवाल? गारगोटीप्रमाणेच तुम्ही तुमचे हात एकमेकांवर चोळून उष्णता तयार करू शकता. तुम्ही खूप जोराने तुमच्या शरीरावर हात घासला तरी तो भाग गरम होतो. तुम्ही हीच गंमत मित्रांसोबतही करून बघू‌ शकता! शरीराला गरम ठेवण्याचे इतरही मार्ग कोणते आहेत, ह्यावर विचार करा!