Showing posts with label plants. Show all posts
Showing posts with label plants. Show all posts

Sunday, June 15, 2025

Fun and experiment no. 46

Experiment 46. Rising water

Take a bottle of glass. Take some water in one plate. Add any watercolour into it. Now, boil some water and fill the bottle. Now, empty the bottle. Keep it upside down on the plate. Observe what happens. Slowly you will see that water is rising in the inverted bottle. The colour will make it clear. As hot water was kept in the bottle, air in the bottle also got hot. When we put the bottle upside down, then the hot air lifts upwards and a sort of vacuum is created. Water rises to fill this up! Water has wonderful cohesive and adhesive properties. This experiment is shared by Mr. Kishor Borphale sir on his youtube channel Maha Shikshan. He has shared wonderful experiments there.

Activity 46. Observe sprouting

Firstly, discuss with elders. You or your neighbours will have some plants in the house. Observe the plants. Find one flowerpot that has some space. Now, with guidance from elders, you will seed a plant in this flowerpot. You can choose some plant which sprouts rapidly. For example, sunflower sprouts in two days. Groundnut also grows in a few days. You will sow the seed and water it as per requirement. You will observe it daily. Within 3-4 days, you will notice a sprout! Observe it carefully. Continue your observation for some days. Observing sprouts coming up is a great experience.

प्रयोग 46. चढणारं पाणी

एक काचेची बाटली घ्या. एका ताटलीत पाणी भरा. त्यामध्ये कोणताही वॉटरकलर टाका. आता, काचेच्या बाटलीमध्ये गरम पाणी घ्या. बाटली रिकामी करा. आताही बाटली उलटी करून ताटलीत ठेवा. काय होतं आहे, ह्याचं निरीक्षण करा. हळु हळु तुम्हांला दिसेल की, पाणी उलट्या बाटलीमध्ये चढत आहे. रंग असल्यामुळे हे स्पष्ट दिसेल. बाटलीमध्ये गरम पाणी ठेवल्यामुळे आतली हवाही तापते. बाटली उलटी केल्यावर गरम झालेली हवा वरच्या दिशेला जाते व आतमध्ये पोकळी (व्हॅक्युम) तयार होते. त्यामुळे ती पोकळी भरण्यासाठी पाणी वर चढतं! पाण्यामध्ये आश्चर्यकारक एकसंध राहण्याचे व चिकटण्याचे गुणधर्म आहेत. हा प्रयोग श्री. किशोर बोरफळे सरांनी त्यांच्या महा शिक्षण युट्युब चॅनलवर छान सांगितला आहे. त्यांनी तिथे खूप सुंदर प्रयोग सांगितले आहेत.

गंमत 46. बीज अंकुरे अंकुरे

पहिले मोठ्यांसोबत चर्चा करा. तुम्ही किंवा तुमच्या शेजा-यांकडे काही रोपं असतील. त्या रोपांचं निरीक्षण करा. ज्या कुंडीमध्ये थोडी जागा असेल अशी कुंडी शोधा. मोठ्यांच्या सांगण्यानुसार आता त्या कुंडीत तुम्हांला एक बी पेरायचं आहे. अगदी लवकर अंकुर येणारं बी तुम्ही निवडू शकता. उदाहरणार्थ, सूर्यफुलाच्या बीला दोन दिवसांमध्ये अंकुर येतो. शेंगदाण्यालाही लवकर अंकुर येतो. तुम्ही असं बी तिथे पेराल व गरजेनुसार पाणी द्याल. दररोज त्या कुंडीचं निरीक्षण करा. 3-4 दिवसांमध्ये तुम्हांला अंकुर आलेला दिसेल! लक्षपूर्वक त्याचं निरीक्षण करा. काही दिवस रोज हे निरीक्षण करा. बीला अंकुर येताना बघणं हा सुंदर अनुभव असतो.

Wednesday, June 4, 2025

Fun and Experiment no. 35

Experiment 35. Self- blooming flower

Cut old newspaper and make some flower shape like star shape. Cut the paper in such a way that flowers with six or eight petals will be formed. Make such three flowers. Fold them. All the petals will be closed and folded. Now keep these flowers in water. After keeping them in water, after some time the petals of the flowers will open up. The flowers will automatically bloom. Paper is made up of stem of plants containing capillary tubes and water transport tissues. They transport water. As the paper is also made up from the plants, the paper too contains them. When water enters these tissues, they expand and as a result, the flower automatically blooms. This experiment is taken from Maha- Shikshan youtube channel of Shri. Kishor Borphale sir.

Activity 35. Metal floating on water


Show a demonstration that two metallic objects float on water. Think, why they float on water? Recall our experiment about floating on water. Remember buoyancy or upthrust.


प्रयोग 35. आपोआप उमलणारे फूल

वृत्तपत्राचा कागद कापून स्टार शेप प्रमाणे काही फुलांचे आकार तयार करा. सहा किंवा आठ पाकळ्या होतील असा कागद कापा. अशी तीन फुलं तयार करा. त्या पाकळ्या दुमडा. सगळ्या पाकळ्या दुमडलेल्या असतील व फूल बंदिस्त होईल. ही फुलं पाण्यामध्ये ठेवा. पाण्यावर ठेवल्यावर थोड्या वेळाने आपोआप फुलांच्या पाकळ्या उमलतील. कागदामध्ये वनस्पतीच्या खोडामधील केशनलिका व जलवाहिन्या असतात. जलवाहिन्या पाणी नेण्याचं काम करतात. आणि वनस्पतींपासून कागद बनवला असल्यामुळे कागदामध्येही त्या जलवाहिन्या असतात. जलवाहिन्यांमध्ये पाणी गेल्यामुळे त्यांचं प्रसरण होतं व फूल उमलतं. हा प्रयोग महा- शिक्षण युट्युब चॅनलवर श्री. किशोर बोरफळे सरांनी सांगितला आहे.

गंमत 35. पाण्यावर तरंगणारा धातु

पाण्यावर धातुच्या दोन वस्तु तरंगतात ह्याचे प्रात्यक्षिक दाखवा. त्या का तरंगत असतील ह्यावर विचार करा. आपण पाण्यावर तरंगण्याबद्दल एक कृती आधी‌ केली होती. ती आठवा. तरंगशक्ती (प्लावकता Buoyancy or upthrust) आठवा.