Experiment 46. Rising water
Take a bottle of glass. Take some water in one plate. Add any watercolour into it. Now, boil some water and fill the bottle. Now, empty the bottle. Keep it upside down on the plate. Observe what happens. Slowly you will see that water is rising in the inverted bottle. The colour will make it clear. As hot water was kept in the bottle, air in the bottle also got hot. When we put the bottle upside down, then the hot air lifts upwards and a sort of vacuum is created. Water rises to fill this up! Water has wonderful cohesive and adhesive properties. This experiment is shared by Mr. Kishor Borphale sir on his youtube channel Maha Shikshan. He has shared wonderful experiments there.
Activity 46. Observe sprouting
Firstly, discuss with elders. You or your neighbours will have some plants in the house. Observe the plants. Find one flowerpot that has some space. Now, with guidance from elders, you will seed a plant in this flowerpot. You can choose some plant which sprouts rapidly. For example, sunflower sprouts in two days. Groundnut also grows in a few days. You will sow the seed and water it as per requirement. You will observe it daily. Within 3-4 days, you will notice a sprout! Observe it carefully. Continue your observation for some days. Observing sprouts coming up is a great experience.
प्रयोग 46. चढणारं पाणी
एक काचेची बाटली घ्या. एका ताटलीत पाणी भरा. त्यामध्ये कोणताही वॉटरकलर टाका. आता, काचेच्या बाटलीमध्ये गरम पाणी घ्या. बाटली रिकामी करा. आताही बाटली उलटी करून ताटलीत ठेवा. काय होतं आहे, ह्याचं निरीक्षण करा. हळु हळु तुम्हांला दिसेल की, पाणी उलट्या बाटलीमध्ये चढत आहे. रंग असल्यामुळे हे स्पष्ट दिसेल. बाटलीमध्ये गरम पाणी ठेवल्यामुळे आतली हवाही तापते. बाटली उलटी केल्यावर गरम झालेली हवा वरच्या दिशेला जाते व आतमध्ये पोकळी (व्हॅक्युम) तयार होते. त्यामुळे ती पोकळी भरण्यासाठी पाणी वर चढतं! पाण्यामध्ये आश्चर्यकारक एकसंध राहण्याचे व चिकटण्याचे गुणधर्म आहेत. हा प्रयोग श्री. किशोर बोरफळे सरांनी त्यांच्या महा शिक्षण युट्युब चॅनलवर छान सांगितला आहे. त्यांनी तिथे खूप सुंदर प्रयोग सांगितले आहेत.
गंमत 46. बीज अंकुरे अंकुरे
पहिले मोठ्यांसोबत चर्चा करा. तुम्ही किंवा तुमच्या शेजा-यांकडे काही रोपं असतील. त्या रोपांचं निरीक्षण करा. ज्या कुंडीमध्ये थोडी जागा असेल अशी कुंडी शोधा. मोठ्यांच्या सांगण्यानुसार आता त्या कुंडीत तुम्हांला एक बी पेरायचं आहे. अगदी लवकर अंकुर येणारं बी तुम्ही निवडू शकता. उदाहरणार्थ, सूर्यफुलाच्या बीला दोन दिवसांमध्ये अंकुर येतो. शेंगदाण्यालाही लवकर अंकुर येतो. तुम्ही असं बी तिथे पेराल व गरजेनुसार पाणी द्याल. दररोज त्या कुंडीचं निरीक्षण करा. 3-4 दिवसांमध्ये तुम्हांला अंकुर आलेला दिसेल! लक्षपूर्वक त्याचं निरीक्षण करा. काही दिवस रोज हे निरीक्षण करा. बीला अंकुर येताना बघणं हा सुंदर अनुभव असतो.
Sunday, June 15, 2025
Fun and experiment no. 46
Thursday, June 12, 2025
Fun and experiment no. 43
Experiment 43. Game of air pressure and vacuum
Earlier we had done one simple experiment. We had set ablaze a candle and put a glass on it. After some time, the flame goes off as Oxygen is required for burning and once it is consumed, the flame cannot burn. We will do little more now. Take a tray or a steel plate. Put a tissue paper on it. Add some water. Now place the candle, set it ablaze and now put the glass. Once the flame goes off, then hold the glass and lift it. To your surprise, the tray will also be lifted. Even if you place two small objects on either sides, still the tray will be lifted with the glass. This happens due to vacuum and low pressure created in the glass. And combination of water and tissue paper do not allow air to leave thereby creating the vacuum suction.
Activity 43. Making a flute from a straw
Through our experiments, we have seen that even small things like sticks, paper, carton paper and straws can be very handy in experiments! Never discard them. They are very useful. We have used straw for many things- to pierce a potato, to transfer water etc. Here, we will do one more straw experiment. Cut a small part of the straw. By using scissor, make a small hole or small opening. Now play it like a flute. You can try by cutting at various lengths. You will observe that the smaller the length, the stronger will be the voice. You can also use it like a whistle to surprise your friends!
प्रयोग 43. पोकळी व हवेचा दाब
आधीच्या एका प्रयोगात आपण एक मेणबत्ती पेटवली होती व तिच्यावर एक ग्लास ठेवला होता. काही वेळाने ज्योत विझून जाते, कारण जळण्यासाठी तिला ऑक्सीजन लागतो. ऑक्सीजन वापरून संपला की ज्योत विझते. आता आपण त्याहून पुढचा प्रयोग करू. एक ट्रे किंवा ताटली घ्या. त्यावर टिश्यु पेपर ठेवा. त्यावर पाणी ओता. आता मेणबत्ती ठेवा, पेटवा व तिच्यावर ग्लास ठेवा. ज्योत विझल्यानंतर ग्लास हळुच उचला व त्याच्यासोबत चक्क तो ट्रे किंवा ती ताटलीही उचलली जाईल! तुम्ही ताटलीमध्ये दोन्ही बाजूंना छोट्या वस्तु ठेवल्या, तरी ग्लाससोबत ट्रे उचललेला राहील. हे होण्याचं कारण ग्लासमध्ये कमी दाब आणि निर्वात (व्हॅक्युम) तयार होतं. आणी पाणी व टिश्यु पेपरमुळे आतली हवा बाहेर जाऊ शकत नाही व त्यामुळे पोकळी शोषली जाण्याचा (व्हॅक्युम सक्शन) परिणाम तयार होतो.
गंमत 43. स्ट्रॉपासून बासरी
आपल्या प्रयोगांमध्ये आपण बघितलं आहे की, अगदी काड्या, कागद, पुठ्ठा व स्ट्रॉ अशा गोष्टींपासूनही आपण खूप प्रयोग करू शकतो! त्यांना कधीही फेकू नका. त्यांचा खूप उपयोग करता येतो. आपण स्ट्रॉचा उपयोग करून अनेक गमती केल्या आहेत. बटाट्यात तो खुपसला आहे, पाणी इकडून तिकडे नेलं आहे वगैरे. आता आपण अजून एक प्रयोग स्ट्रॉचा करू. स्ट्रॉचा एक भाग कापा. कात्री वापरून त्यामध्ये छोटं छिद्र किंवा फट तयार करा. तुम्ही आता ते बासरीसारखं वाजवू शकता. वेगवेगळ्या लांबीवर तुम्ही कापून बघू शकता. तुमच्या लक्षात येईल की, जितकी कमी लांबी, तितका मोठा आवाज येतो. तुम्ही त्याचा वापर शिट्टीसारखा करूनही मित्रांना दचकवू शकता.
Wednesday, June 11, 2025
Fun and experiment no. 42
Experiment 42. Refraction of light
This is a very easy and wonderful experiment. It is suggested by my daughter Advika. It can be easily done in a minute. Take a glass or a jar made up of glass. On a paper make a clear arrow. You can use colour and sketch pen for this, so that it is bold and large. See the paper through the glass. Now fill the water till half the glass or the jar and see the paper through the water! You will see that direction of the arrow has been changed! If it was towards right → , now it is towards left ← ! This happens due to refraction of light. When light passes through different mediums, it changes its directions. This principle is used in lenses and telescopes. You will also notice that at a particular distance away from the glass, the changed image is more clear. It is due to focusing of light on that point.
Activity 42. Observe your observation!
This is a simple activity. Take a plain paper. It should be totally blank- nothing written or drawn on it. Now write a small but sharp dot on the paper. Now gather your friends. Show them this paper and ask them what they see. 99% of the time they will tell that they see the dot. Now ask them again, do you see anything else? They will probably tell that rest of the page is empty!
This can also be done by putting a white dot on the blackboard in your school. Here, practically we can observe three things. Firstly, we can observe the empty blackboard or the empty paper. Secondly we can observe the dot. And thirdly we can also observe the observer- we and our action of observing! The more we observe, the more we know! So always observe your observation!
प्रयोग 42. प्रकाशाचे अपवर्तन (refraction)
हा अगदी सोपा आणि आश्चर्यकारक प्रयोग आहे. माझ्या मुलीने- अद्विकाने तो मला सांगितला. अगदी एका मिनिटात तो करता येतो. काचेचा एक ग्लास घ्या. एका कागदावर रंग किंवा स्केच पेन वापरून ठळक प्रकारे एक बाण काढा. आता तो कागद काचेच्या ग्लासमधून पाहा. आता अर्धा ग्लास पाण्याने भरा व तो कागद पाण्यामधून पाहा! बाणाची दिशा बदललेली दिसेल! जर तो बाण उजवीकडे → काढलेला असेल, तर तो पाण्यातून बघताना उलटा म्हणजे डावीकडे ← दिसेल! हे होण्याचं कारण म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन (refraction of light). जेव्हा प्रकाश वेगवेगळ्या माध्यमांमधून जातो, तेव्हा त्याची दिशा बदलते. ह्याच तत्त्वाचा उपयोग भिंगांमध्ये व दुर्बिणीत केला जातो. तुमच्या हेसुद्धा लक्षात येईल की, ग्लासपासून काही अंतरावरून बदललेली प्रतिमा सर्वांत जास्त स्पष्ट दिसते. तिथे प्रकाश फोकस होत असल्यामुळे असं होतं.
गंमत 42. तुमच्या निरीक्षणाचं निरीक्षण करा (Observe your observation)!
हे अगदी सोपं आहे. एक कोरा कागद घ्या. तो अगदी कोरा असला पाहिजे- त्यावर काहीही लिहीलेलं किंवा ड्रॉ केलेलं नको. आता त्या कागदावर एक छोटा पण स्पष्ट बिंदू (डॉट) काढा. तुमच्या मित्रांना बोलवा. त्यांना कागद दाखवा व विचारा की, त्यांना काय दिसतं आहे. 99% वेळेस ते म्हणतील की, त्यांना तो बिंदू दिसतोय. त्यांना परत विचारा की अजून काही दिसतंय का. कदाचित ते म्हणतील की, बाकीचा रिकामा कागद दिसतोय!
हीच गोष्ट शाळेतल्या काळ्या फळ्यावर खडूने पांढरा डॉट काढूनही करता येऊ शकते. इथे प्रत्यक्षात आपण तीन गोष्टींचं निरीक्षण करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण रिकामा फळा किंवा रिकामा कागद बघू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण तो बिंदू बघू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण निरीक्षण करणा-या निरीक्षकालाही बघू शकतो- आपण निरीक्षण करत आहोत, हेही बघू शकतो! आपण जितकं जास्त निरीक्षण करू, तितकं आपल्याला उलगडत जातं! त्यामुळे नेहमी तुमच्या निरीक्षणाचंही निरीक्षण करा!
Sunday, May 25, 2025
Fun and experiment no. 25
Experiment 25. Observation of flowing water
In the last experiment, we make holes to a bottle and observed when the water pours out and when it does not! Now we will observe one more thing. We need to have three holes at different height of the bottle. If you had done them, use the same bottle. Or take another old bottle. Make three holes at three different heights. Fill the bottle completely. Now when the lid is closed, water does not flow! But we want to observe its flow. So open the lid. Now water will pour out. But in different ways! Flow of water coming out depends on the height of the hole. That means pressure of the water column determines length of the flow. The hole where water has maximum pressure will pour water to longest distance! Relate this here- If you are staying at first floor or second floor on a multi- story building, tap water in your house will have more force than your friend staying at sixth or eight floor! Due to this very reason, lower floors need to use pressure control tools!
Activity 25. Memory game
For this, you need five or more persons. If possible, get 10 persons. Even elders can participate, it is very easy! Game is like this- The first person will say one word. The second will again say that word and add his own word. The third person will say first two words and add his or her third wor and so on! For example- I say Water, Ramesh says water, bottle. Reena says water, bottle and napkin. Isha says water, bottle, napkin and paper. Raj says water, bottle, napkin, paper and dish. Like this! Remember to remember and also remember to enjoy!
प्रयोग 25. वाहणा-या पाण्याचं निरीक्षण
आधीच्या प्रयोगात आपण एका बाटलीला छिद्रं करून त्यातून बाहेर येणारं व न येणारं पाणी बघितलं! आता आपण अजून एका गोष्टीचं निरीक्षण करू. त्यासाठी बाटलीमध्ये वेगवेगळ्या उंचीवर तीन छिद्रं करावी लागतील. जर तुम्ही तशी छिद्र आधी केली असतील, तर करायची गरज नाही. तीच बाटली वापरा. जर तशी केली नसतील तर दुसरी जुनी बाटली घेऊन वेगवेगळ्या उंचीवर तीन छिद्रं करा. बाटली पाण्याने भरा. जेव्हा झाकण बंद असेल तेव्हा पाणी वाहणार नाही! पण आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे. म्हणून झाकण उघडा. आता त्यामधून पाणी बाहेर पडायला लागेल. पण त्याचं स्वरूप वेगवेगळं असेल! बाहेर किती जोराने पाणी येतं हे छिद्राच्या उंचीवर अवलंबून असतं. म्हणजे पाण्यावर किती दाब आहे ह्यानुसार पाणी किती बाहेर येईल हे ठरतं. जिथे पाण्याचा दाब सर्वाधिक असतो- सर्वांत खालच्या छिद्रावर- तिथून पाणी सर्वाधिक लांब येईल! समजा तुम्ही एका उंच इमारतीत पहिल्या किंवा दुस-या मजल्यावर राहात असाल, तर तुमच्या घरात नळाला असलेला पाण्याचा जोर हा सहाव्या किंवा आठव्या मजल्यावर राहणा-या तुमच्या मित्रापेक्षा जास्त असेल! ह्याच कारणामुळे खालच्या मजल्यांना दाब नियंत्रणासाठी व्यवस्था करावी लागते!
गंमत 25. लक्षात ठेवायला लक्षात ठेवा!
ह्या खेळासाठी पाच जण लागतील. 10 जण मिळाले तर उत्तम! मोठेही खेळू शकतात, अगदी सोपा खेळ आहे हा! खेळ असा आहे- पहिला जण एक शब्द म्हणेल. मग दुसरी व्यक्ती तो पहिला शब्द म्हणेल व स्वत:चा दुसरा शब्द म्हणेल. त्यानंतर तिसरा पहिले दोन्ही शब्द सांगून त्याचाही तिसरा शब्द सांगेल आणि हे पुढे चालू राहील! उदाहरणार्थ- मी पाणी म्हणालो, रमेश म्हणेल पाणी, बाटली. रीन म्हणेल पाणी, बाटली, नॅपकीन. ईशा म्हणेल पाणी, बाटली, नॅपकीन आणि कागद. राज म्हणजे पाणी, बाटली, नॅपकीन, कागद आणि काच! असं! लक्षात ठेवायचं लक्षात ठेवा! आणि एंजॉय करायचंही लक्षात ठेवा!