Experiment 12. Playing with cards this way!
Most of us have a set of 52 cards- Hearts, Diamonds, Clubs, and Spades. You have played many times. Now play them differently. You and your friends can do this together. You need to build a house of these cards. Maybe two- story or three- story. With your friends do this and check which surface is good for building this tower- only tile, mattress or with a wall. Also check for wind other factors. You know, if your house is ready and you shout loud in excitement, it may fall! You can divide cards among yourself and try it. Enjoy the fun as well as understand how better they are built. This also needs patience, team work, cheering each other and giving opportunities to those who can do it better.
Activity 12. Will you take up this challenge?
In a set of cards, there are 52 cards. Can you take up this challenge to create a house from all the cards? A wonderful six story castle! But it would not be easy. It can take hours and hours. Sometimes cards can fall down after completing three levels. So this is actually not only a skill game, but also a patience game! It teaches us to rise again after falling. It teaches determination. So are you ready?
प्रयोग 12. पत्त्यांसोबत खेळण्याची वेगळी पद्धत!
आपल्यापैकी अनेकांकडे पत्ते आहेत. आपण अनेकदा खेळतोसुद्धा. पण ह्यावेळी वेगळ्या प्रकारे खेळू. मुलं व त्यांचे मित्र- मैत्रिणी असे छोटे गट करून खेळू. एका कॅटमध्ये 52 पत्ते असतात. आपण ते वाटून घेऊ. सगळ्यांना मिळून किंवा वेगवेगळं असं पत्त्यांचं घर करायचं आहे. दुमजली किंवा तिमजली. मित्रांसोबत हे करून पाहा. हेसुद्धा पाहा की, असा बंगला बनवायला कोणती जागा चांगली असते- फरशीवर, चटईवर, सतरंजीवर की भिंतीला चिकटून असलेली जागा? आणि लक्ष असू द्या, जर तुमचा बंगला तयार झाला आणि आनंदाने तुम्ही ओरडलात, तरी तो पडू शकतो! पत्ते वाटून घ्या आणि प्रयत्न करा. त्याचा आनंद घ्याच, त्याबरोबर ते कुठे व कोणत्या स्थितीत चांगलं उभं राहतं, हेही समजून घ्या. हे करण्यासाठी संयम हवा, टीम वर्क हवं, एकमेकांना प्रोत्साहन देणं हवं व ज्यांना चांगलं जमतंय, त्यांना संधी देणंही हवं.
गंमत 12. तुम्ही हे चॅलेंज घ्याल का?
एका कॅटमध्ये 52 पत्ते असतात. तुम्ही सगळ्या पत्त्यांचा बंगला करण्याचं चॅलेंज घ्याल का? एक मोठा सहा मजली महाल होऊ शकतो! पण सहज उभा राहणार नाही. त्यासाठी कित्येक तास लागू शकतील. कधी तीन मजले झाल्यावर एकदम पत्ते पडतील. त्यामुळे हा फक्त कौशल्याचा खेळ नाहीय तर संयमाचाही आहे. चुकलं तरी परत प्रयत्न करत राहायचं, सतत प्रयत्न करत राहायचे, हे हा खेळ शिकवतो. मग आहात का तयार?
Monday, May 12, 2025
Fun and Experiment no. 12
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Thanks for reading my blog! Do share with your near ones.