Experiment 15. Colourful learning!
You know how to transfer water from on glass to another by using a cloth or napkin. Now extend this experiment a bit. Get blue and yellow water colours. You may need help of your friend for this. Now fill one glass with blue colour and one with yellow colour. Now place two clothes or napkins. One cloth or napkin from blue and yellow glass will be inserted in third vacant glass. After some hours, this glass will be gradually filled up with water and it will have mixing of blue and yellow colour! Which colour this will be? In the same way, you can mix other water colours and see which colours are formed. Remember that water is transferred due to capillary action and surface tension.
Activity 15. Using straws and small tubes
For transferring water to another container, you can also use a straw and small tubes. You can fold a straw in Z shape and put its one end in one glass and another end in the second glass. After little efforts, the straw will carry water. Just you need to keep it properly immersed in water- filled container. You can also pump from the straw or a small tube to transfer water. When you pump, you create vacuum and then the air is pulled and with air, the water is also pulled. In fact, when you drink fruity by a straw, you use this very method! By this method, even large amount of water can be transferred. For example, you can use pumping- just pulling air through your mouth- to transfer water from a tank to a field. When a medicine is taken out of a bottle through a syringe, then also the same method is used!
प्रयोग 15. रंगांसोबत शिकूया!
कपडा किंवा नॅपकीन वापरून एका ग्लासातून दुस-या ग्लासात पाणी कसं न्यायचं हे तुम्हांला माहिती आहे. आता हा प्रयोग थोडा बदलून करूया. निळा व पिवळा वॉटर कलर घ्या. त्यासाठी मित्रांची मदत लागली तर घ्या. आता एका ग्लासमध्ये निळा रंग भरा व एका ग्लासात पिवळा रंग भरा. दोन जुन्या कापडाचे तुकडे किंवा दोन रुमाल घ्या व ह्या दोन्ही ग्लासातलं पाणी तिस-या रिकाम्या ग्लासमध्ये जाईल अशी व्यवस्था करा. योग्य प्रकारे कापडाचे तुकडे किंवा रुमाल बुडवून ठेवल्यावर काही तासांनी पाणी हळु हळु तिकडे जाईल. आणि त्याचा रंग निळा व पिवळा अशा दोन्ही रंगांच्या मिश्रणातून बनेल! हा रंग कोणाता असेल? त्याच प्रकारे तुम्ही इतरही वॉटर कलर्स मिक्स करू शकता व नवीन रंग तयार करू शकता. हे मात्र लक्षात ठेवा की पाणी केशाकर्षण प्रक्रिया (capillary action) व पृष्ठीय ताणामुळे (surface tension) इकडून तिकडे जाते.
गंमत 15. स्ट्रॉ व छोट्या नळीचा वापर
एका पात्रातून दुस-या पात्रात पाणी नेण्यासाठी, तुम्ही छोटा स्ट्रॉ व छोट्या नळीचाही वापर करू शकता. स्ट्रॉला दुमडून Z असा आकार करू शकता व त्याचं एक टोक एका ग्लासमध्ये व दुसरं टोक दुस-या ग्लासमध्ये ठेवा. थोडे प्रयत्न करून बघितल्यावर स्ट्रॉ मधूनही पाणी जाईल. फक्त त्याला योग्य प्रकारे पाण्यात बुडवून ठेवावं लागेल. तुम्ही स्ट्रॉ किंवा छोट्या नळीच्या मदतीने श्वासाने पाणी ओढूनही (पंप करून) ते दुसरीकडे नेऊ शकता. तुम्ही फ्रूटी स्ट्रॉच्या मदतीने पिता तेव्हा हेच तर करता! ह्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी इकडून तिकडे नेता येतं. एका हौदात भरलेलं पाणी एखाद्या नळामधून पंप करून (श्वासाने ओढून) शेतामध्ये देता येतं. जेव्हा औषधाच्या बाटलीतून सिरींज लावून औषध काढलं जातं, तेव्हाही हीच पद्धत तर वापरली जाते!
Thursday, May 15, 2025
Fun and Experiment no. 15
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
Thanks for reading my blog! Do share with your near ones.